Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

आरटीओ चलनाच्या नावाने ‘एपीके’ फाईल; तरुणाच्या खात्यातून पावणेपाच लाखांवर डल्ला

    चिकोडीतील प्रकार; व्हॉट्सॲपवर आलेल्या फाईलवर क्लिक करणे पडले महागात चिकोडी : आरटीओ चलनाच्या नावाखाली मोबाईलवर ‘एपीके’ फाईल पाठवून बँक खात्यातील रक्कम लंपास करण्याचा सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा समोर आला आहे. चिकोडी येथील एका युवकाच्या बँक खात्यातून सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४ लाख ८३ हजार रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाइन पद्धतीने …

Read More »

ॲनिमियामुक्त भारतासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा पुढाकार

  आरोग्य तपासणी शिबिरात २२० नागरिकांची तपासणी बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे हॅपीहार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने नियाज़ हॉटेल येथे ‘ॲनिमियामुक्त भारत व सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिर’ आयोजित करण्यात आले. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे आणि विविध आजारांचे लवकर निदान करणे, हा शिबिराचा प्रमुख उद्देश होता. सकाळच्या सत्रात झालेल्या या शिबिराला …

Read More »

तारांगणचा कलाविष्कार कार्यक्रम शनिवारी

  बेळगाव : महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारे व त्यांच्या विकासासाठी कार्यरत असलेले तारांगण, निधी कामत, नेत्रा मेणसे, डॉ. प्रा. मनीषा नाडगौडा यांच्यावतीने कलाविष्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता महात्मा फुले रोडवरील दैवज्ञ मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केला आहे. …

Read More »

बेळगावात एकदिवसीय ‘श्री लीलामृत’ ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात

  बेळगाव : जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज (दक्षिणपीठ, नाणीजधाम) यांच्या कृपाशीर्वादाने आणि पीठाचे उत्तराधिकारी प. पू. कानिफनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने श्रावण मासानिमित्त येळ्ळूर सेवा केंद्राच्या वतीने एकदिवसीय ‘श्री लीलामृत’ ग्रंथ सामुदायिक पारायण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. येळ्ळूर सेवा केंद्रातील ब्रह्मदेव मंदिरात आयोजित या धार्मिक सोहळ्याची सुरुवात सेवा …

Read More »

बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांचे येळ्ळूर गावच्या वतीने अभिनंदन

  येळ्ळूर : श्री. प्रकाश निकम यांनी बेळगाव शहराचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणे ही संपूर्ण बेळगाव नगरीसाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक आणि उत्साहवर्धक बाब असल्याची भावना येळ्ळूर गावातील नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. सन २०१४ मध्ये बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी म्हणून …

Read More »

इस्कॉनमध्ये उद्या जन्माष्टमीचा महोत्सव

  बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)द्वारा श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने शुक्रवारी साजरी केली जात आहे. त्यानिमित्त इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिर फुलांनी सजवण्यात आले असून मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या मंडपावरही रोषणाई करण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजल्यापासून मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत जन्माष्टमी चा कार्यक्रम चालणार आहे. मंदिरात पहाटे …

Read More »

गोकुळाष्टमी, वैभव लक्ष्मीच्या खरेदीने बाजारपेठ फुलली

  गणेशोत्सवाच्या साहित्याचीही लगबग; गणपत गल्लीसह प्रमुख बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडी बेळगाव : श्रावण महिन्याचा शेवटचा शुक्रवार, वैभव लक्ष्मी व्रताची सांगता आणि गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत गुरुवारपासूनच खरेदीची मोठी लगबग सुरू झाली. सकाळपासूनच महिला आणि नागरिकांची गर्दी वाढल्याने गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार यासह प्रमुख बाजारपेठांना उत्सवी स्वरूप प्राप्त …

Read More »

तीन महिन्यांपासून अतिथी शिक्षकांचे मानधन रखडले

    जून-जुलै-ऑगस्टचे वेतन थकीत; आर्थिक अडचणींचा सामना, सणासुदीपूर्वी मानधन देण्याची मागणी बेळगाव : सरकारी शाळांमधील रिक्त शिक्षकांच्या जागांवरील अध्यापनाचा भार सांभाळणाऱ्या अतिथी शिक्षकांचे गेल्या तीन महिन्यांपासून मानधन रखडले आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला तीन महिने उलटूनही जून, जुलै आणि ऑगस्टचे मानधन मिळाले नसल्याने अतिथी शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मानधन …

Read More »

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर व मनपा आयुक्तांकडून विसर्जन मार्गांची पाहणी

  बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक मार्गांवरील विविध नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी महापौर प्रीती कामकर आणि महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी गुरुवारी शहरातील प्रमुख मार्गांची पाहणी केली. महापौर, मनपा आयुक्त व कर्मचाऱ्यांनी प्रारंभी कपिलेश्वर तलाव परिसरात पूजा केली. त्यानंतर महापौर प्रीती कामकर यांनी राणी चन्नम्मा चौक, …

Read More »

दिनेश मुधाळे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची घेतली भेट; शुभम शेळके यांनी फोनवरून मांडली सीमावासीयांची व्यथा

  मुंबई : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे उपाध्यक्ष तथा भालकी तालुकाध्यक्ष दिनेश मुधाळे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेऊन सीमाभागातील मराठी जनतेची व्यथा आणि गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाची वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनीही देशपांडे यांच्याशी …

Read More »