बेळगाव : मागील तीन-चार महिन्यांपासून बेळगाव शहर व परिसरात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून बेळगाव शहरातील दुकाने त्याचप्रमाणे व्यावसायिक आस्थापनांवरील मराठी व इंग्रजी भाषेतील फलक हटवण्याचे किंवा काळा रंग लावून मिटविण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे असे प्रकार घडत असताना पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. या बेकायदेशीर कारवायांवर तात्काळ …
Read More »पंडित नेहरू पदवी पूर्व कॉलेजमध्ये मुलांच्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन
बेळगाव : शहापूर येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन ए. के.पी फौंडर्सचे श्री. राम भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड हे होते तर अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे संचालक पी. आर. गोरल हे होते. श्री. राम …
Read More »दक्षिणकाशी कपिलेश्वर येथे श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सवाचे आयोजन
बेळगाव : दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात यंदा १२ नोव्हेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी जयंतीच्या मुख्य दिवशी अभिषेक, श्री काळभैरव जन्मोत्सव, महाआरती, महापूजा, प्रसाद वाटप तसेच सायंकाळी …
Read More »बॉक्साईड रोडला कचऱ्याचा ढीग; भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर
बेळगाव : बॉक्साईड रोड परिसरात रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग साचल्यामुळे या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. कुमारस्वामी लेआऊट ते हिंडलगा रोड पर्यंतच्या रस्त्याला जणू कचरा डम्पिंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या परिसरातील लोक आपल्या घरातील सुका आणि ओला कचरा महानगरपालिकेच्या कचरा उचल घंटागाडीकडे देणे ऐवजी रस्त्याच्या कडेला आणून …
Read More »करवेच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती घेणार पोलिस आयुक्तांची भेट!
बेळगाव : महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने कन्नड सक्ती तीव्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुकाने तसेच व्यवसायिक आस्थापनांवरील फलकांवरून कन्नड संघटना भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारी आदेशानुसार व्यवसायिक फलकांवर 60% कन्नड भाषा व 40% इतर भाषेत मजकूर लिहावा असा आदेश असताना देखील कन्नड संघटना पोलीस संरक्षणात …
Read More »प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन ८ फेब्रुवारी रोजी
बेळगांव : येथील प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. ‘प्रगतिशील ‘च्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी ही माहिती दिली. खानापूर रोड, (रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ) येथील श्री तुकाराम महाराज सामाजिक व सांस्कृतिक भवन येथे हे संमेलन होणार आहे. …
Read More »जेष्ठ पत्रकार प्रकाश परुळेकर यांचे दुःखद निधन
बेळगाव : मूळचे लोंढा येथील आणि सध्या बेळगावच्या टिळकवाडी परिसरात वास्तव्यास असलेले जेष्ठ पत्रकार प्रकाश श्रीपाद परुळेकर (वय ६७) यांचे सोमवारी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि विवाहित कन्या असा परिवार आहे. पत्रकारितेची खास शैली आणि मार्गदर्शक नीटनेटकेपणा आणि रुबाब हे त्यांचे विशेष गुण उठून दिसायचे. …
Read More »बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब जोल्ले तर उपाध्यक्षपदी राजू कागे
बेळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत जारकिहोळी पॅनेलला मोठे यश मिळाले आहे. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची नव्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली असून आमदार राजू कागे यांचीही उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवड प्रक्रिया आणि सभेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर नूतन अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले व …
Read More »होसुर येथील युवकावरील हल्ल्याप्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात
बेळगाव : होसुर मठ गल्ली परिसरातील एका युवकावर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून सागर पांडुरंग सालगुडे (वय 37, रा. होसुर बसवण गल्ली, शहापूर, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक व्यवहाराच्या वादातून प्रसाद जाधव याच्यावर सागर पांडुरंग सालगुडे याने धारदार शस्त्राने …
Read More »काव्यगंधात रंगले रसिक श्रोतेगण : चारोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शब्दगंध कवी मंडळ संघाचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा बेळगाव : येथील शब्दगंध कवी मंडळ संघाचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने उत्स्फूर्त चारोळी लेखन स्पर्धा, “काव्यगंध” हा कवितांचा कार्यक्रम आणि काव्यसंग्रह प्रकाशन अशा विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात नंदिनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta