Sunday , April 19 2026
Breaking News

गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमीतर्फे एक दिवशीय 1800 रेटिंग खालील ओपन रॅपिड चेस टूर्नामेंटचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमी यांच्यावतीने आणि बेलगाम डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन यांच्या सहकार्याने बेळगाव नगरीत एक दिवशीय 1800 रेटिंग खालील ओपन रॅपिड चेस टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी भाग्यनगर, पहिला क्रॉस येथील रामनाथ मंगल कार्यालयात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
ही स्पर्धा 7 वर्षांखालील, 9 वर्षाखालील, 11 वर्षाखालील, 13 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील वयोगटात घेतली जाणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी 500 रुपये असून विविध गटातील विजेत्यांना एकूण 75 हजार रुपयांची बक्षिसे याशिवाय विजेत्यांना एकूण 55 स्मृतीचिन्ह, 71 पदके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांना पार्टीसिपंट सर्टिफिकेट दिले जाणार आहे. स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक आणि उपस्थित पालकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

स्पर्धा परीक्षक म्हणून आकाश मडीवाळर ( एफए), पूर्णिमा उपलाविकर (आयए), भरत चौगुले (आयए), सक्षम जाधव (एसएनए), शाहरुख कुराणे (एसएनए) आणि विपिन यादव (एसएनए) हे काम पाहणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्याला 10 हजार रुपये रोख आणि चषक, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 7 हजार पाचशे रुपये रोख आणि चषक तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 5500 रोख आणि चषक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील चौथ्या ते पंधराव्या क्रमांकाच्या विजेत्याला अनुक्रमे 4 हजार रुपये रोख आणि पदक, 3 हजार पाचशे रुपये लोकांनी पदक, 3 हजार रुपये रोख आणि पदक, 2500 रुपये रोख आणि पदक, 2 हजार रुपये रोख आणि पदक, 1500 रुपये रोख आणि पदक, 1200 रुपये रोख आणि पदक, 1 हजार रुपये रोख आणि पदक, 900 रुपये रोख आणि पदक, 900 रुपये रोख आणि पदक, 800 रुपये रोख आणि पदक तसेच 700 रुपये रोख आणि पदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. त्याशिवाय 16 ते 25 व्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी 600 रुपये रोख आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. बेस्ट यंगेस्ट प्राईज म्हणून 6 वर्षाखालील एका मुलाचा आणि एका मुलीचा चषक देऊन सन्मान केला जाणार आहे. याशिवाय बेस्ट अनरेटेड, बेस्ट बिलो 1600, 18 वर्षांवरील बेस्ट वुमन, बेस्ट अदर स्टेट, बेस्ट बेळगाव डिस्ट्रिक्ट, 50 वर्षांवरील बेस्ट वेटरन, स्पेशिअली एबल्ड प्लेयर्स आणि बेस्ट गोल्डन स्क्वेअर अशी पारितोषिकेही दिली जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी सक्षम जाधव मोबाईल क्रमांक 7899425214, प्रशांत अणवेकर मोबाईल क्रमांक 9535308451, महेश निटुरकर मोबाईल क्रमांक 8147350134, निलेश भंडारी, मोबाईल क्रमांक 8951045371, अक्षता पाटील मोबाईल क्रमांक 8951409037 अथवा शिवराज सुतार मोबाईल क्रमांक 7558699897 यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *