Sunday , December 21 2025
Breaking News

बेळगाव

शिवरायांचा आदर्शातून व्यक्तीमत्व विकास घडवा : शिवसंत संजय मोरे

  राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप सोहळा उत्साहात संपन्न शिनोळी (प्रतिनिधी) : कार्वे पाटणे फाटा येथील व्ही. के. चव्हाण पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप सोहळा दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अर्जुन पाटील होते. यावेळी उपाध्यक्ष …

Read More »

माधुरी जाधव फाउंडेशनतर्फे निराधार वृद्धावर अंत्यसंस्कार

  बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात दुर्धर आजारावर उपचार सुरू असलेल्या एका वृद्धाचे शुक्रवार (दि.३१) जानेवारी रोजी निधन झाले. माधुरी जाधव फाउंडेशनतर्फे माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्या वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दामोदर चांदाळ (वय ७०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. दामोदर चांदाळ हे गेल्या २८ वर्षांपासून रामदुर्ग (ता. बेळगाव) येथील हॉटेल अलंकारमध्ये …

Read More »

मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेश उत्सव महामंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत दुर्घटनेत मृत झालेल्या कुटुंबीयांना मदत

  बेळगाव : यंदाच्या वर्षी गणेश उत्सव दरम्यान शेवटच्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीत कपलेश्वर उडान पुलावरती दुर्घटनेत मृत पावलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आज देण्यात आली. मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री. रमाकांत दादा कोंडूस्करांच्या नेतृत्वाखाली आवाहन करण्यात आलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बेळगाव येथील विविध गणेश मंडळांनी आर्थिक …

Read More »

महाकुंभमेळ्याला गेलेले ५२ यात्रेकरू बेळगावला परतले…

  बेळगाव : २६ जानेवारी रोजी खाजगी बसने प्रयागराज कुंभमेळ्याला गेलेले बेळगाव येथील यात्रेकरू सुखरूप घरी परतले आहेत. बेळगावातील राणी चन्नम्मा सर्कल येथे दोन्ही खासगी बसने आलेले भाविक दु:खात घरी परतले. एका भाविकाने सांगितले की, २६ तारखेला आम्ही बेळगावहून प्रयागराज येथील कुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी गेलो. तिथे आमची खूप अडचण झाली. …

Read More »

जीएसएसचे प्राचार्य अरविंद हलगेकर सेवानिवृत्त तर नविन प्राचार्य म्हणून प्रा. अभय सामंत यांची निवड

  बेळगाव : जीएसएस कॉलेजचे प्राचार्य श्री. अरविंद हलगेकर हे प्राध्यापक, जीवशास्त्राचे समन्वयक, एन. सी. सी. अधिकारी असे अनेक पदावर कार्य करून 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना निरोप देताना एस के इ. चे पदाधिकारी, दक्षिण म. शि. मंडळ या संस्थेचे श्री. विक्रम पाटील, …

Read More »

शेतकरी, महिला, सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : डॉ. सरनोबत

  बेळगाव : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला देशाचा अर्थसंकल्प अतिशय उत्तम असून शेतकरी, महिला, सामान्य माणूस आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा सचिव व सुप्रसिद्ध डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शनिवारी …

Read More »

जिल्हा रुग्णालयात आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू…

  बेळगाव : जिल्हा रुग्णालयात बाळंतिणींच्या मृत्यूचे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आज आणखी एका बाळंतिणीला मृत्यूने कवटाळले. बेळगाव तालुक्यातील करडीगुद्दी गावातील गंगव्वा (३१) नावाच्या महिलेचा बेळगाव जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ३१ जानेवारी रोजी तिचे सिझेरियन झाले. त्यावेळी तिची प्रकृती व्यवस्थित होती. मात्र आज दुपारनंतर तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर डॉक्टरांनी …

Read More »

दागिने चोरांना अटक, ९.६० लाखांचे दागिने जप्त

  मुडलगी : घरफोडी प्रकरणी कुलघोड पोलिसांनी दोघांना अटक करून एक ऑटो रिक्षा व ९.६ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. राघवेंद्र रामू रेवणकर (22) आणि ओंकार दयानंद जाधव (21, रा. गोकाक नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गोकाका तालुक्यातील कौजलगी गावात एका घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद …

Read More »

वाचनातून आपल्याला शब्द भांडाराचे ज्ञान होते : प्रा. स्वरूपा इनामदार

  बेळगाव : कविता करताना वाचन खूप आवश्यक आहे, वाचनातून आपल्याला शब्द भांडाराचे ज्ञान होते. आजूबाजूच्या जगातून अनुभवातून परिस्थितीतून कवितेचे विषय मिळतात, चार शब्द जोडून कविता तयार होत नाही तर ती परत परत वाचावी त्याचा अर्थ पहावा वास्तविक जगाकडे डोळसपणे पहावे, चांगल्या गोष्टींचे श्रवण करावे अनुभवातून खूप काही शिकता येते …

Read More »

सरस्वतीनगर येथे घरफोडी; दागिने, रोकड लंपास झाल्याचा अंदाज

  बेळगाव : घरातील मंडळी बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना सरस्वतीनगर, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी येथे आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी अंदाजे 250 ग्रॅम सोने, 40,000 रुपये रोख आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी डल्ला मारलेले घर अँथनी डिक्रूझ यांच्या मालकीचे असून ते सध्या …

Read More »