Monday , April 20 2026
Breaking News

बेळगाव

मराठा समाजातील युवकांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे : प्रकाश कालकुंद्रीकर

  बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मराठा सेवा संघ बेळगांव जिल्ह्याच्या वतीने मराठा उद्योजकांसाठी माईंड पॉवर सेमिनार आयोजित केले होते. सुप्रसिध्द माईंड ट्रेनर विनोद कुराडे, माईंड ट्रेनर व मोटिवेशनल (कोल्हापूर) हे वक्ते उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे महादेव पाटील, यश कम्युनिकेशनचे संचालक प्रकाश …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये साने गुरुजी पुण्यतिथी साजरी

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये 11जून रोजी साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील शिक्षिका माया पाटील उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. साने गुरुजी यांच्या जीवनकार्याचा आढावा देत शिक्षण, स्वातंत्र्याचा लढा, साने गुरुजींचे साहित्य, त्यांची राष्ट्रसेवा देण्याची स्थापना याबद्दल प्रमुख पाहुण्या …

Read More »

बेळगावात अनेक अवैध धंद्याच्या विरोधात पोलिसांची कारवाई

  बेळगाव : बेळगाव शहर पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री आणि अवैध जुगाराविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. विविध ठिकाणी छापे टाकून १४ आरोपींना अटक करण्यात आली असून, यात गांजा, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २१,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या …

Read More »

बेळगावच्या चित्रकाराची चित्रे फ्रान्समधील पुस्तकात…

  बेळगाव : क्रॉसड ग्लान्सीस हे पुस्तक नुकतेच फ्रान्समध्ये प्रकाशित झाले असून त्यामध्ये जगभरातील निवडक दहा चित्रकारांची माहिती आणि चित्रे असून त्यामध्ये बेळगावचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार विकास पाटणेकर यांचा समावेश आहे. फ्रान्समधील प्रख्यात प्रकाशन संस्था युलेसेसने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. पेट्रा वॉटर्स यांनी या पुस्तकाचे संपादन केले असून पुस्तक …

Read More »

सेंट अँथनी चर्च येथे 13 रोजी वार्षिक फेस्तचे आयोजन…

  बेळगाव : फिश मार्केट, कॅम्प, बेळगाव येथील सेंट अँथनी चर्च येथे शुक्रवार दि. 13 जून 2025 रोजी सेंट अँथनी यांचे वार्षिक फेस्त साजरे होत असून भक्तांनी फेस्तमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सेंट अँथनी वार्षिक फेस्तप्रसंगी बेळगाव शहराच्या विविध भागातून आणि शहराच्या आसपासच्या गावांमधून हजारो यात्रेकरू …

Read More »

वटपौर्णिमेच्यानिमित्ताने अन्नपूर्णेश्वर नगर येथील सान्सी महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम…

  बेळगाव : वटपौर्णिमा अर्थात सुवासिनींनी वडाला पुजण्याचा दिवस. आजच्या दिवशी सावित्रीने स्वतःचा पती सत्यवानाचे प्राण प्रत्यक्ष यमाकडून परत आणले. अशी आख्यायिका आपल्या हिंदू धर्मात सांगितली जाते. तिचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या देशातील लाखो स्त्रिया आजच्या दिवशी वटसावित्रीचा उपवास करतात. वडाला सात प्रदक्षिणा घालतात आणि हाच पती जन्मोजन्मी मिळू दे, …

Read More »

बेळगावच्या निर्मात्यांनी साकारलेली मनोरंजनाची अफलातून ट्रीट “ऑल इज वेल” 27 जूनला चित्रपटगृहात

  बेळगाव : मैत्री … ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पड‌द्यावर येत्या २७ जूनला ‘ऑल इज वेल’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सहकुटुंब अनुभवायला …

Read More »

बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी निलंबित पोलिसांच्या निर्णयाविरोधात अभाविपचे आंदोलन

  बेळगाव : बेंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांना जबाबदार धरून त्यांच्या निलंबनाच्या राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत, तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज बेळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले. आज बेळगावातील आर.पी.डी. सर्कल येथे अखिल भारतीय विद्यार्थिनी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी अभाविपचे राज्य कार्यकारिणी सदस्य मंजुनाथ …

Read More »

शेतातील विहिरीत बुडून पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू; अथणी येथील घटना

  अथणी : बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील चिक्कुड गावात ५ वर्षाच्या मुलाचा शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनोज गिद्दप्पा वड्डर (वय ५) असे त्या मृत मुलाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, मनोज घराबाहेर खेळत असताना नजीकच असलेल्या विहिरीजवळ गेला अन् पाय घसरल्याने तोल जाऊन …

Read More »

जायंट्स आय फौंडेशन आणि जायंट्स मेन यांच्यावतीने नेत्रदान जनजागृती फलक!

  बेळगाव : जायंट्स आय फौंडेशन आणि जायंट्स मेन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक नेत्रदान दिनाचे औचित्य साधून सदाशिवनगर स्मशानभूमीत नेत्रदान जनजागृती फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांचे स्वागत सचिव विजय बनसुर यांनी केले तर प्रास्ताविक माजी अध्यक्ष शिवराज पाटील यांनी जायंट्स आय फौंडेशनच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. प्रमुख …

Read More »