Saturday , December 20 2025
Breaking News

बेळगाव

मारुती गल्लीत दुकानाला आग; लाखों रुपयांचे साहित्य जळून खाक

  बेळगाव : शहरातील मारुती गल्ली येेेथील एका स्टेशनरी दुकानाला मंगळवारी रात्री आग लागून लाखो रुपयांच्या मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. शहरातील मारुती गल्लीतील तळघरातील एका स्टेशनरी दुकानाला भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आग विझवल्याने ती पसरण्यापासून रोखली.

Read More »

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना आवाहन

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने परिसरातील तसेच तालुक्यातील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की प्रतिवर्षी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये सीमाभागात दहावी परीक्षेत मराठी विषयात सन 2022-23 सालात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला रोख रक्कम व स्मृतिचषक देण्यात येतो, त्याचबरोबर येळ्ळूर …

Read More »

येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन साजरा

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचा 24 वा वर्धापन दिन सोसायटीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. पाटील हे होते. सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. पाटील व उपाध्यक्ष रघुनाथ मुरकुटे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर …

Read More »

…म्हणे राममंदिराच्या ध्वजांवरही कन्नडच पाहिजे : करवेची हास्यास्पद मागणी

  बेळगाव : उठसुठ मराठीद्वेषाची गरळ ओकणाऱ्या कानडी संघटनांनी आता राममंदिरासारख्या सर्व हिंदूंच्या श्रद्धा-जिव्हाळ्याच्या मुद्यालाही प्रसिद्धीसाठी लक्ष्य केले आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवरामगौडा गटाने आज राममंदिर मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त फडकावलेल्या ध्वजांवर हिंदी मजकूर असल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. बेळगावातील चन्नम्मा चौकात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवरामगौडा गटाने आज निदर्शने केली. सोमवारी अयोध्या राममंदिरात …

Read More »

शिवसेनेच्या वतीने बेळगावात बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

  बेळगाव : शिवसेना सीमाभाग बेळगावतर्फे आज मंगळवारी सकाळी शांताई वृद्धाश्रम, बामणवाडी येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सानिध्यात हिंदू हृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवसेना सीमाभाग बेळगावतर्फे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी बामणवाडी येथील शांताई वृद्धाश्रमाला मिक्सर, ट्यूबलाइट्स आणि मिठाई भेटीदाखल देण्यात आली. सदर भेटीचा स्वीकार …

Read More »

युवा समितीच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

  बेळगाव : सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने दिवंगत शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. टिळकवाडी येथील कावळे हॉस्टेल येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेला …

Read More »

टीजेएसबी बेळगाव शाखेत कारसेवकांचा हृद्य सत्कार

  बेळगाव : अयोध्येत होणार्‍या श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून ठाणे जनता सहकारी बँकेच्या बेळगाव शाखेत दि. 22 रोजी बेळगावातील काही कारसेवकांचा हृद्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कारसेवक सर्वश्री कृष्णानंद कामत, रमेश चिकोर्डे, गजेश नंदगडकर यांचा स्तकारमूर्तीत समावेश होता. क्लस्टर हेड प्रमोद देशपांडे यांनी स्वागत केले. ते …

Read More »

कला गुणांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असते : वाय. पी. नाईक

  बेळगाव : रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही कौतुकाची बाब आहे. यातून सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळते. महिला वर्ग अधिकाधिक सहभागी झालेल्या आहेत. अशा स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने आत्मविश्वास निर्माण होतो. श्रीप्रभू रामाची हुबेहूब प्रतिकृती विविध रंगछटातून साकार करण्यासाठी कल्पकता वापरून चांगला प्रतिसाद मिळाला. हेच या स्पर्धेचे खरं यश आहे, असे …

Read More »

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

  बेळगाव : आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय रामलिंगखिंड गल्ली येथे हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. आज बाळासाहेबांचा जन्मदिवस योगायोगानं काल अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली आणि बाळासाहेबांचा एक संकल्प पूर्ण झाला, पण त्याचं बेळगांव सह संयुक्त महाराष्ट्राच …

Read More »

सौंदत्ती डोंगरावर शाकंभरी पोर्णिमा यात्रेची प्रशासनाकडून जय्यत तयारी

  बेळगाव : सालाबादप्रमाणे या वर्षीही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या शाकंभरी पोर्णिमा यात्रेसाठी कर्नाटक महाराष्ट्र गोवा आंध्र प्रदेश तसेच केरळ येथून सलग आठ दिवस भक्तांची प्रचंड गर्दी होणार आहे. यावर्षी तब्बल आठ ते दहा लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर यात्रा काळात उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त …

Read More »