Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगाव

नारायण बरमणी प्रकरणावरून भीमप्पा गडाद यांचा पोलीस प्रशासनावर हल्लाबोल

  बेळगाव : धारवाडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नारायण बरमणी यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी हात उचलल्याच्या घटनेचा निषेध करत भीमप्पा गडाद यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव येथील पत्रकार परिषदेत त्यांनी पोलीस विभागाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या एका मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान नारायण बरमणी यांच्यावर हात उचलून त्यांना धमकावले होते, …

Read More »

सातारा संमेलनात सीमा प्रश्नाचा ठराव घेण्याचे आश्वासन

  बेळगाव : सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बेळगाव सीमा प्रश्नी ठराव घेण्याचे ठोस आश्वासन अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी दिले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठवलेल्या पत्रात जोशी यांनी आश्वासन दिले आहे या अगोदर बेळगाव मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पत्र घेण्याची …

Read More »

बृहन महाराष्ट्र मंडळ शतक महोत्सवी वर्ष, बेळगावात ‘हे बंध रेशमाचे’ संगीत नाटकाचे आयोजन

  बेळगाव : महाराष्ट्र बाहेर विखुरलेल्या मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी कार्यरत असलेले बृहन महाराष्ट्र मंडळ यावर्षी शतक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. शतक महोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या बेळगाव शाखेच्या वतीने बुधवार दिनांक 24 रोजी सायंकाळी 5 वाजता कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात भरत नाट्य संशोधन मंदिर पुणे प्रस्तुत तुफान गाजलेल्या ‘हे …

Read More »

बी. के. मॉडेल हायस्कूल शतक महोत्सवात उद्या खासदार जगदीश शेट्टर व डॉ. गुरुराज करजगी

  बेळगाव : शिक्षण क्षेत्रात शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शतक महोत्सव कार्यक्रमात उद्या सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता नामवंत शिक्षणतज्ज्ञ डॉ. गुरुराज करजगी यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अकादमी ऑफ क्रिएटिव्ह थिंकिंगचे चेअरमन डॉ. गुरुराज करजगी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, …

Read More »

गौरवशाली शिक्षण परंपरेच्या बळावर भारत विकसित व शक्तिशाली राष्ट्र : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

  बेळगाव : भारताला लाभलेल्या प्राचीन व गौरवशाली शिक्षण परंपरेच्या बळावरच आज देश विकसित आणि शक्तिशाली राष्ट्र म्हणून जागतिक पातळीवर पुढे येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले. कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी खासदार व केएलई …

Read More »

कॅपिटल वन एकांकिका रसिकांसाठी नाटकाची जणू पर्वणीच

  बेळगाव : उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहित करण्याबरोबरच बेळगावची नाट्य परंपरा अखंड ठेवण्यासाठी कॅपिटल वन तर्फे कॅपिटल वन करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी मोठ्या दिमाखात दोन दिवसीय कॅपिटल वन करंडकाचे अनावरण करण्यात आले. शनिवारी जिल्हा मर्यादित शालेय गटात स्पर्धा पार पडली. बेळगाव मधील बालकलाकारांसह महाराष्ट्रातील विविध कलाकारांचा अभिनय आणि …

Read More »

मराठी शिक्षणाची मशाल ग्रामीण भागात पेटती ठेवणारी प्रखर ज्वाला म्हणजे कै. श्री. एम. डी. चौगुले व्याख्यानमाला 

  बेळगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन पोहोचावे, या उदात्त हेतूने गेली अकरा वर्षे सातत्याने सुरू असलेल्या मण्णूर येथील “कै. एम. डी. चौगुले सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान आणि मातोश्री सौहार्द सहकारी संघ नियमित, मण्णूर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रा. सौ. छाया अरविंद …

Read More »

गणेशपूर येथे विहिरीमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; एचईआरएफ टीमचे सहकार्य

    बेळगाव : गणेशपूर बेळगाव येथील रहिवासी अलका बसवंत पाटील (वय 52 वर्ष) रा. पाटील गल्ली गणेशपूर या महिलेचा मृतदेह आज सकाळी एका विहिरीमध्ये आढळून आल्याची माहिती कॅम्प पोलीस स्थानकाला मिळाली. ही बाब लक्षात येतात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कॅम्प पोलीस स्थानकातून एच. ई. आर. एफ.-हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फौंडेशनच्या …

Read More »

राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने चालविलेले कार्य कौतुकास्पद : आमदार मारुतीराव मुळे

  राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित वधु-वर मेळाव्याला उदंड प्रतिसाद बेळगाव : मुला-मुलींची वेळेत लग्न लावणे एक महत्त्वाची सामाजिक समस्या होऊन बसली आहे. राज्यभरातील मराठा समाजातील परिस्थितीची आम्हाला चांगली जाणीव आहे. मुला मुलींची वेळेत लग्न एक चिंतेचा विषय बनला आहे. अशावेळी वधू वर मेळावे आणि सामुदायिक विवाह सोहळे एक पवित्र …

Read More »

कंग्राळ गल्ली येथे पल्स पोलिओ कार्यक्रम…

  बेळगाव : येथील कंग्राळ गल्ली बुथ क्रमांक 13 मध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी साडेआठ वाजता करण्यात आले. पाच वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ लसीचे दोन थेंब देण्यात आले. पोलिओपासून संरक्षण मिळावे यासाठी सरकारच्या वतीने विशेष दक्षता घेऊन लसीकरण करण्यात येत आहे. उद्घाटनाचा हा कार्यक्रम येथील सावित्री बिल्डिंग …

Read More »