बेळगाव : मच्छे येथे घडलेल्या खून प्रकरणातील संशयिताला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. महेंद्र राजू तळवार (वय १९ रा. गंगा गल्ली, मच्छे) असे जामीन मिळालेल्या संशयिताचे नाव आहे. मयत प्रतीक एकनाथ लोहार (रा. अनगोळ) आणि या खून प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण उर्फ छोट्या बाबू बळगण्णावर यांच्यामध्ये क्रिकेटवरून वाद झाला. …
Read More »बेळगावातील प्रसिध्द चित्रकाराला फसविणारा अटकेत
बेळगाव : पर्यटन मंत्रालयाचा महासंचालक असल्याची बतावणी करून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलेल्या तोतया अधिकारी अनिरुध्द होशिंग याला नागपूर पोलिसांनी लखनौ येथून अटक केली असून प्रसिध्द चित्रकार विकास पाटणेकर यांना अयोध्या येथील श्री राम मंदिराचे चित्रांचे काम देतो म्हणून फसवणूक केली आहे. यवतमाळ आणि नागपूर येथील अनेक उद्योजकांना आपण पर्यटन …
Read More »वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावात अवतरली!
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील लाखो लोकांचे स्वप्न अखेर साकार झाले. बेळगाव रेल्वे स्थानकावर मंगळवारी बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्स्प्रेस दाखल झाली आणि मोठ्या संख्येने जमलेल्या बेळगावकरांनी एकच जल्लोष केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील वंदे भारत एक्स्प्रेसने देशभरात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. बेळगावलाही ही एक्स्प्रेस यावी अशी अनेकांची इच्छा होती. …
Read More »वर्दीची रिक्षा पलटी तीन विद्यार्थी जखमी
बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षा पलटी झाल्याने तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मच्छे येथे घडली आहे. बेळगाव खानापूर रोडवर दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पिरनवाडी येथील इंग्लिश मिडीयम शाळेतून मच्छेकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला अपघात झाला …
Read More »हरगापूर गडाचे नामकरण ‘वल्लभगड’ करण्याची मागणी
बेळगाव : हरगापूर गडाचे नांव तात्काळ बदलून ‘वल्लभगड’ असे करण्यात यावे, अशी मागणी हुक्केरी तालुक्यातील हरगापूर गडावरील रहिवाशांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आज सकाळी मोठ्या संख्येने आलेल्या हरगापूर गडावरील नागरिकांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात …
Read More »युवा कर्नाटक भीमसेनेच्या वतीने बेळगावात निदर्शने
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कुकडोळी गावातील दलित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीत जाण्यासाठी काही सवर्ण शेतकरी प्रतिबंध करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी युवा कर्नाटक भीमसेनेच्या वतीने आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. कुकडोळी गावातील सर्व्हे नं.16,17,18,19,11 या दलित समाजातील शेतकर्यांच्या जमिनी आहेत, काही सवर्ण जमीनदार त्यांना आपल्या …
Read More »बेळगावात गुन्ह्यांची संख्या आधीच्या तुलनेत कमी : गृहमंत्री जी. परमेश्वर
बेळगाव : आम्ही बेळगावातील गुन्ह्यांची संख्या गांभीर्याने घेतली असून, मागील गुन्ह्यांच्या तुलनेत सध्या गुन्ह्यांची संख्या कमी झाली आहे, असे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले. बेळगाव शहरात आज पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री परमेश्वर म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यात महामार्ग आणि इतर रस्त्यांवर होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे, बेळगाव परिसरात जमीन, मालमत्ता वादातून …
Read More »दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात काँग्रेस सरकार अपयशी : अरविंद लिंबावळी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्यातील काँग्रेस सरकारला साफ अपयश आले आहे. राज्य सरकारने मंजूर केलेला दुष्काळी निधी अपुरा असून, आणखी निधी देऊन तातडीने दुष्काळ निवारण कामांना सुरवात करावी अशी मागणी माजी मंत्री भाजप नेते अरविंद लिंबावळी यांनी केली. माजी मंत्री भाजप नेते अरविंद लिंबावळी यांच्या …
Read More »मराठी विद्यानिकेतन बेळगावतर्फे अनाथांना कपडे व दिवाळीच्या फराळाचे वाटप
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगावतर्फे दरवर्षी गरजू अनाथांना दिवाळीच्या फराळाचे व कपड्यांचे वाटप करण्यात येते. यावर्षीही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गरीब, अनाथ, उपेक्षित व कष्टकऱ्यांच्या घरीही दिवाळीचा आनंद साजरा व्हावा, विद्यार्थ्यांना समाजातील तळागाळातील लोकांची ओळख व्हावी. त्यांच्या विषयी सहानुभूती निर्माण व्हावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे समाजभान सतत जागृत राहावे यासाठी …
Read More »एंजल फाउंडेशन आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा उत्साहात पार
बेळगांव : एंजल फाउंडेशन आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत जवळपास त्यांना स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. महिला विद्यालय येथील गिताबाई हेरेकर येथील सभागृहात ही भव्य रांगोळी स्पर्धा पार पडली. यावेळी विजेत्यांना ट्रॉफी रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेमधील प्रथम क्रमांक साक्षी अनवेकर, द्वितीय क्रमांक प्रियांका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta