Monday , December 8 2025
Breaking News

बेळगाव

येळ्ळूर येथे कुणबी-मराठा नोंदीसाठी जागृती रॅलीत संपन्न; मराठा समाज एकवटला

  येळ्ळूर : कर्नाटक सरकारच्यावतीने 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत जातीनिहाय जनगणना करण्यात येणार आहे. यावेळी मराठा समाजाने ‘धर्म- हिंदू, जात मराठा, पोट जात- कुणबी, मातृभाषा- मराठी आणि व्यवसाय- शेती’, अशी नोंदणी करून शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळवून आपला विकास करून घ्यावा, यासाठी शिवसेना चौक विराट गल्लीतून सर्व मराठा …

Read More »

जायंट्स ग्रुप बेळगाव मेन तर्फे आयोजित गणेश उत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 23 सप्टेंबर रोजी

  बेळगाव : जायंट्स ग्रुप बेळगाव मेन तर्फे आयोजित गणेश उत्सव स्पर्धेचा निकाल (सुंदर श्रीमूर्ती आणि सुंदर देखावा) जाहीर झालेला आहे. दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी या स्पर्धेचा बक्षीस समारंभ पंडित नेहरू विद्यालय, अळवाण गल्ली शहापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. बक्षीस समारंभ संध्याकाळी ठीक पाच वाजता करण्यात येणार आहे. …

Read More »

जातनिहाय जनगणनेबाबत जनजागृती; सकल मराठा समाजातर्फे आज मेळावा

  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या शैक्षणिक आणि सामाजिक सर्वेक्षण पत्रकात मराठा समाजातील लोकांनी धर्म, जात, पोटजात आणि मातृभाषा कशाप्रकारे नमूद करावी यासंदर्भात सकल मराठा समाज आणि मराठा समाजातील नेते मंडळींकडून जनजागृती करण्यात येत आहे. या अनुषंगाने मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांनी आज कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, गुडशेड रोड यासह …

Read More »

तुमची मेहनत आणि मनाची निष्ठा हेच खरे गुरु आहेत : रणजीत चौगुले

  बेळगाव : तुमची मेहनत आणि मनाची निष्ठा हेच खरे गुरु आहेत; धाडस करा, दिवसात छोटी छोटी उद्दिष्टे ठेवा आणि सातत्याने प्रयत्न करत रहा, यश तुमच्या पावलावर येईल, असे प्रतिपादन सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले यांनी केले. दि. बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बेळगाव यांच्या वतीने सभासदांच्या …

Read More »

इंग्रजी, कॉन्व्हेंट शाळांना हिंदू सणांची सुट्टी सक्तीची करावी : श्रीराम सेना

  बेळगाव : सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून राष्ट्रीय सणांचा तिरस्कार करणाऱ्या शहरातील इंग्रजी आणि कॉन्व्हेंट शाळांवर कारवाई करावी. तसेच दसरा सणासह हिंदूंच्या अन्य सणांची सुट्टी या शाळांसाठी सक्तीची करावी, अशी मागणी बेळगावच्या श्रीराम सेनेने बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. श्रीराम सेनेचे उत्तर कर्नाटक राज्याध्यक्ष रवीदादा कोकीतकर यांच्या …

Read More »

जय किसान भाजी मार्केटची इमारत पाडण्याची मागणी!

  बेळगाव : जय किसान खासगी भाजी मार्केटची परवानगी रद्द झाल्यानंतरही इमारत न पाडल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी संघटनांनी आज बेळगाव महानगरपालिकेसमोर आंदोलन केले. जोपर्यंत ही इमारत तोडली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. जय किसान खासगी भाजी मार्केटची इमारत बांधण्याची परवानगी रद्द झाली आहे, तरीही …

Read More »

पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीला शिक्षा

  बेळगाव : पत्नीचा दारू पिऊन मानसिक व शारीरिक छळ करून नाक कापल्याप्रकरणी आरोपी पती सुरेश परशुराम नाईक (वय 38 रा. शेंडसगळ, महाराष्ट्र) याला बेळगाव न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. आरोपी सुरेश हा त्याची पत्नी सुनीता (वय 35 रा. कागवाड, कर्नाटक) हिचा रोज दारू पिऊन शारीरिक व मानसिक छळ करीत होता. …

Read More »

दुचाकी चोरट्यांना हिरेबागेवाडी पोलिसांकडून अटक

  बेळगाव : बेळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या दोन दुचाकी जप्त करत दोघा दुचाकी चोरांना  हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. एकूण 4 लाख 10 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. बेळगाव शहरात वाढते चोरीचे प्रकार लक्षात घेत बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे …

Read More »

सर्वापित्री अमावास्ये निमित्त उद्या रविवारी श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

  बेळगाव : सर्वापित्री अमावास्ये निमित्त उद्या रविवारी दि. 21 रोजी पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता आणि दुपारी बारा वाजता तैलभिषेक करण्यात येणार आहेत. शनी कथा वाचन, शनी शांती आणि तीळ होम यांचेही आयोजन करण्यात आले आहे. दुपारी अभिषेक …

Read More »

येळ्ळूर येथे मराठा समाजाच्या वतीने आज महत्वपूर्ण बैठक

  बेळगाव : सकल मराठा समाजाच्या हितासाठी उद्या रविवार दि. 21/09/2025 रोजी सायंकाळी ठीक 5.00 वा. मराठा मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला पाठिंबा देऊन सदर मेळाव्यात बहुसंख्येने उपस्थित राहण्यासाठी आज शनिवार दि. 20/09/2025 रोजी सायंकाळी 7.00 वा. चांगळेश्वरी मंदिर येथे सर्व पक्षीय मराठा समाजातील …

Read More »