Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

यापुढेही समरसेन पाटील यांनी सामाजिक कार्याला वाहून घ्यावे; प्रा. विक्रम पाटील

  बेळगाव : शिक्षक वेगळा आणि कार्यकर्ता वेगळा असतो. सुरुवातीला समरसेन पाटील यांनी लोकांना बरोबर घेऊन महत्त्वाचे शैक्षणिक कार्य केले. त्यांनी स्वतःचे घर सांभाळत, शाळा सांभाळत, सामाजिक कार्य‌ केले. निवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घ्यावे, असे प्रतिपादन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील यांनी केले. मच्छे (तालुका बेळगाव) …

Read More »

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे बोरगाव सर्कल रुंदीकरण कामाला विलंब; माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार -वडर यांचा आरोप

  निपाणी (वार्ता) : बोरगाव सर्कल रुंदीकरण व्हावे यासाठी राज्य सरकारकडून २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. २४ जानेवारी २०२६ ला लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कामाचे उद्घाटन करण्यात आले. पण ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे बोरगाव सर्कल रुंदीकरण कामास विलंब होत असल्याचा आरोप माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार -वडर यांनी …

Read More »

जीएसएसच्या स्वायत्ततेतील पहिल्या पदव्युत्तर बॅचचा निकाल जाहीर

  पदव्युत्तर विभागांची उल्लेखनीय कामगिरी बेळगाव ::साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीच्या गोविंदराम सेक्सरिया विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), बेळगाव येथे स्वायत्ततेअंतर्गत शिक्षण घेतलेल्या पहिल्या पदव्युत्तर (एम.एस्सी.) बॅचचा निकाल गुरुदेव रानडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात जाहीर करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी एस.के.ई. सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा. एस. वाय. प्रभू होते. प्रमुख पाहुणे म्हणून एस.के.ई. सोसायटीचे सचिव …

Read More »

कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेमध्ये युवा समिती आणि राज्य विकास मराठी संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण

  बेळगाव : बेळगावमधील कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य विकास मराठी संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांनी सर्वांचे स्वागत करून, युवा समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले. अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की, युवा समितीच्या वतीने मराठी शाळा टिकाव्या, …

Read More »

बेळगावात जीवनविद्या मिशनतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

  बेळगाव : “संस्कार, शिक्षण आणि शिकवण या तीन गोष्टी जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. संस्कारासाठी सत्संगाची आवश्यकता असून, गुरुचे मार्गदर्शन लाभल्यावरच जीवनाची खरी प्रगती होते. गुरूला शरण जाणे म्हणजेच खरी गुरुपौर्णिमा होय,” असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनच्या बेळगाव शाखेचे प्रमुख भाई शंकरराव बांधकर यांनी केले. जीवनविद्या मिशनच्या शास्त्रीनगर उपकेंद्राच्या वतीने मंगळवारी …

Read More »

शिवशंभूच्या वाद्यपूजनाने गणेशोत्सवाची नांदी

  बेळगाव : सीमाभागातील गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी ढोल-ताशा पथकांकडून वाद्यपूजन व सरावाचा शुभारंभ उत्साहात आणि पारंपरिक शिस्तीने केला जातो. याच परंपरेनुसार श्री शिवशंभू ढोल-ताशा पथक, चव्हाट गल्ली, बेळगाव यांच्या वतीने जालगार मारुती मंगल कार्यालय, चव्हाट गल्ली बेळगाव येथे वाद्यपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ढोल, ताशा आणि इतर वाद्यांना दैवी …

Read More »

गॅस ग्राहकांना मोठा इशारा! १४ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी करा; अन्यथा गॅस पुरवठा बंद होण्याची शक्यता

  मोबाईलवर कंपन्यांचे संदेश; आधार, बँक पासबुक व गॅस बुकसह तातडीने पडताळणीचे आवाहन बेळगाव : सरकारकडून विविध कल्याणकारी योजनांची फेरपडताळणी सुरू असतानाच आता घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठीही ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. गॅस कंपन्यांनी ग्राहकांच्या मोबाईलवर संदेश पाठवून १४ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले असून, मुदतीत प्रक्रिया पूर्ण न …

Read More »

शर्यतीच्या बैलाचा विहिरीत पडून मृत्यू ; बडस ईनाम येथे दुर्दैवी घटना

  बडस ईनाम : बडस ईनाम गावात एका दुर्दैवी घटनेत युवा शेतकरी कल्लाप्पा भीमाना पाटील यांचा सुमारे चार लाख रुपये किमतीचा शर्यतीचा बैल विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्लाप्पा पाटील यांच्या घरातून बैल अचानक दोर तोडून बाहेर पडला आणि सैरावैरा पळू लागला. त्याला आवरण्यासाठी …

Read More »

लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिपद नाकारल्याने चन्नम्मा चौकात कार्यकर्त्यांचे आंदोलन

  बेळगाव : कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारानंतर महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना पुन्हा मंत्रिपद देण्याची मागणी करत बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी राणी चन्नम्मा चौकात आंदोलन छेडले. मंत्रिमंडळात लक्ष्मी हेब्बाळकर यांना स्थान मिळावे, तसेच बेळगाव जिल्ह्याला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, या मागणीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र आले. आंदोलनादरम्यान …

Read More »

लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने समर्थकांचा संताप; हिरेबागडेवाडी टोलवर महामार्ग रोको

    बेळगाव : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना स्थान न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी सोमवारी बेळगावजवळील हिरेबागडेवाडी टोल नाक्यावर तीव्र आंदोलन छेडले. समर्थकांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करत रस्ता रोखल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आंदोलनकर्त्यांनी काँग्रेस हायकमांड तसेच राज्य नेतृत्वाविरोधात जोरदार …

Read More »