Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

विद्याभारती राज्य अथेलिटिक्स स्पर्धेत संत मीरा शाळेच्या खेळाडूंचे यश

  बेळगाव : गुलबर्गा येथील चंद्रशेखर पाटील क्रीडांगणावर नुकत्याच झालेल्या विद्याभारती राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या अथलेटिक खेळाडूंनी 3 सुवर्ण 4 रौप्य 2 कास्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत प्राथमिक गटात ईश्वरी कुलकर्णी हिने लांब उडीत कास्यपदक तर माध्यमिक गटात संचित धामणेकरने लांब …

Read More »

‘गृहज्योती’ लाभार्थ्यांमध्ये संभ्रम; अनेक भागांत पडताळणीच नाही!

  ३१ ऑगस्ट अंतिम मुदत; कर्मचारी न पोहोचल्याने लाभ बंद होण्याची भीती, नागरिकांची धावपळ बेळगाव : कर्नाटक सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘गृहज्योती’ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणी मोहिमेला वेग आला असला, तरी हेस्कॉमच्या कार्यक्षेत्रातील अनेक भागांमध्ये अद्याप कर्मचारीच पोहोचले नसल्याने हजारो लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका बाजूला घराघरांत जाऊन पडताळणी सुरू …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे “ॲनिमिया मुक्त बेळगाव” अभियानांतर्गत ६ वे ॲनिमिया तपासणी शिबिर यशस्वी

  बेळगाव : समाजाच्या आरोग्यविषयक सेवेसाठी राबविण्यात येत असलेल्या “ॲनिमिया मुक्त बेळगाव” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांनी एम.एन.आर.एस. कन्नड माध्यम शाळा, महांतेश नगर येथे ६ वे ॲनिमिया तपासणी शिबिर यशस्वीरित्या आयोजित केले. हा उपक्रम हॅपी हार्ट फाउंडेशन यांच्या सहकार्याने पार पडला. या शिबिरात एकूण ३६७ विद्यार्थ्यांची …

Read More »

“खासबागचा राजा” गणेशोत्सव मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर

  बेळगाव : शहरातील प्रसिद्ध “खासबागचा राजा” गणेशोत्सव मंडळाने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन कार्यकारिणीची घोषणा केली आहे. मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, नवीन कार्यकारिणीनुसार राहुल शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शिवराज जाधव उपाध्यक्ष, अमित उचगावकर कार्याध्यक्ष, तर विशाल सनदी उपकार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. मंडळाच्या …

Read More »

महात्मा गांधी संस्थेच्या कथा, कथन स्पर्धा उत्साहात संपन्न

  कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी कथा, कथन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष अॅड नामदेव मोरे उपस्थित होते. प्रा पी व्ही नाकाडी यांच्या हस्ते फोटो …

Read More »

कृष्णा नदीच्या पुरामुळे कुडची-उगारखुर्द जोडणारा पूल पुन्हा पाण्याखाली; वाहतूक पूर्णपणे बंद

    बेळगाव : जिल्ह्यात काही भागांत मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पावसाची उघडीप अशी परिस्थिती असताना, सातत्याने होत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे जामखंडी–मिरज राज्य महामार्गावरील कुडची–उगारखुर्द संपर्क पूल रविवारी पुन्हा एकदा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. रायबाग …

Read More »

मंत्री सतीश जारकीहोळींची कालव्यांची पाहणी; शेतकऱ्यांना पाणीटंचाई भासू देणार नाही, अधिकाऱ्यांना सूचना

    बेळगाव (वार्ता) : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी विविध सिंचन कालव्यांची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी कालव्यांचे प्रभावी व्यवस्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रविवारी सकाळी हुक्केरी तालुक्यातील हिडकल …

Read More »

कवयित्री स्मिता किल्लेकर यांच्या ‘गंध मातीचा’ काव्यवाचनाने रसिक मंत्रमुग्ध

  शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे कवी समजून घेताना उपक्रमाचे आठवे पुष्प बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गंध मातीचा’ या कवयित्री सौ. स्मिता दीपक किल्लेकर यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम आणि उपस्थितांचे खुले कवी संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. मराठी विद्यानिकेतन …

Read More »

ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत आयोजित ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. यावेळी कार्यवाह सुरेंद्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात किशोर काकडे यांनी आपल्या …

Read More »

बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती वैचारिक पद्धतीने साजरी

  मच्छे : येथील श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वैचारिक वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष श्री. सुशील धामणेकर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर आयोजित चर्चासत्रामध्ये संतोष जैनोजी, विनायक चौगुले, केतन चौगुले, संदीप वाघोजी …

Read More »