Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगाव

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल, पुणे 2026 महोत्सवात बेळगावच्या पाच सावित्रींच्या लेकींची निवड

  बेळगाव : क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरु करुन महिलांसाठी स्त्रीशिक्षणाचे द्वार खुले करुन देण्याचे पवित्र कार्य केले. उभयतांच्या या उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा प्रचार, प्रसार व भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्याच्या उदात्त हेतूने पुण्यामध्ये संविधान दुत आदरणीय विजय वडवेराव यांच्या पुढाकारातून …

Read More »

उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित देशमुख

  बेळगाव : उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित २५ व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. उचगाव येथे १८ जानेवारीला हे संमेलन होणार आहे. उचगाव मराठी साहित्य अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले आहे. अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर यांनी ही …

Read More »

सीआरपीएफ वाहनाची दुचाकीला धडक; बैलूर येथील शेतकरी ठार

  बेळगाव : जांबोटी ते बेळगाव मुख्य रस्त्यावर नावगे क्रॉस येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. बैलूर (ता. खानापूर) येथील रहिवासी नामदेव गुंडू नाकाडी (वय ६७) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता ते आपल्या दुचाकीवरून (केए २२, एचएच १०३८) बैलूर येथून बामनवाडी …

Read More »

कडोलीत मराठी साहित्य संघातर्फे २५ डिसेंबर रोजी “काव्यातरंग” कविसंमेलन

  बेळगाव : कडोली (ता. बेळगाव) येथील मराठी साहित्य संघातर्फे गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता “काव्यातरंग” कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. मराठी साहित्य संघाच्या श्री. कलमेश्वर वाचनालयात हे कविसंमेलन होईल. या कविसंमलेनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी आपली एक कविता सोमवार दि. २२ डिसेंबर पर्यंत श्री. गिरीधर गौंडवाडकर …

Read More »

हलगा – मच्छे बायपास कामाविरोधात शेतकरी संघटनेतर्फे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र

  बेळगाव : हलगा – मच्छे बायपासच्या कामाविरोधात शेतकरी संघटनेतर्फे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच भूसंपादन आणि अनधिकृत बांधकाम सुरू केल्याबाबत चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. बायपास करण्याचा निर्णय घेतल्यापासून या भागातील शेतकरी सातत्याने कामाला विरोध करत आहेत. …

Read More »

शहाजी महाराजांच्या समाधिस्थळाच्या स्मारकासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद

  बेळगाव : अथणी शहरातील शिवाजी चौकात रविवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अथणी व अथणी तालुका मराठा समाज संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे त्यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित नव्हते. …

Read More »

आंबेवाडी गावचे जवान मयूर धूपे यांचे कॉम्बॅट ट्रेनिंगदरम्यान अपघाती निधन

  बेळगाव : आंबेवाडी गावचे रहिवासी असलेले भारतीय सेनेतील जवान मयूर लक्ष्मण धूपे यांचे कॉम्बॅट ट्रेनिंगदरम्यान झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले. देशसेवेच्या कर्तव्यावर असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. शहीद जवान मयूर लक्ष्मण धूपे यांचे पार्थिव उद्या सकाळी बेळगाव येथे आणण्यात येणार असून, मिलिटरी हॉस्पिटल बेळगाव …

Read More »

डॉल्फिन ग्रुपचे मास्टर्स जलतरणपटूंची उत्कृष्ट कामगिरी

  बेळगाव : सिंधुदुर्ग जलतरण संघटनेच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने सिंधुदुर्ग चिवला बीच येथे सागरी जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बेळगावच्या गोवावेस व अशोक नगर येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आबा स्पोर्ट्स क्लबच्या सानिध्याखाली सराव करत असणाऱ्या डॉल्फिन ग्रुपचे मास्टर्स जलतरणपटूंची उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. …

Read More »

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वेदा खानोलकर हिला रौप्य पदक

  बेळगाव : नुकत्याच दिनांक 12 ते 17 डिसेंबर रोजी दिल्ली येथील तालकटोरा आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात 69 व्या नॅशनल स्कूल गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद स्पोर्ट्स क्लबची जलतरणपटू व जी. जी. चिटणीस स्कूलची विद्यार्थिनी कुमारी वेदा वैभव खानोलकर हिने कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना 4 x …

Read More »

समाज सारथी सेवा संघाची येळ्ळूरमध्ये स्थापना

  येळ्ळूर : येळ्ळूर मधील समान विचार आणि ध्येय असलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत, गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक किंवा सामुदायिक समस्या सोडवण्यासाठी तसेच कल्याणकारी कार्य करण्यासाठी एक संघटित शक्ती निर्माण करण्याचा उद्देश ठेवून गावामध्ये समाज सारथी सेवा संघाची स्थापना केली आहे. संघटनेच्या माध्यमातून सामूहिक ध्येय साध्य करणे, समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणे …

Read More »