बेळगाव : जिल्हा सफाई समितीच्या वतीने चन्नम्मा सर्कल येथे आज शनिवारी (4 मे) आयोजित अनिवार्य मतदान जनजागृती बाईक जथा कार्यक्रमास जिल्हा स्वीप समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी मंजुरी दिली. यावेळी बोलताना जेपीएमचे सीईओ राहुल शिंदे म्हणाले की, जिल्हाभर स्वीप …
Read More »जगदीश शेट्टर यांच्या विजयासाठी स्थानिक नेते लागले जोमाने कामाला
किरण जाधव यांनी घेतली बैठक : शेट्टरांना निवडून देण्याचे केले आवाहन बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी बेळगाव शहर परिसरातील नेते आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. ‘आपकी बार 400 पार’ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी चंग बांधला आहे. त्या अनुषंगाने बेळगावमधील स्थानिक …
Read More »९ मे रोजी शिवजयंती; परंपरेनुसार शनिवारी चित्ररथ मिरवणूक
बेळगाव : बेळगावमध्ये अक्षय तृतीयेच्या आदले दिवशी म्हणजेच वैशाख द्वितीयेला पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षीही गुरुवार दि. ९ मे रोजी शिवजयंती साजरी होणार असून शनिवार दि. ११ मे रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. …
Read More »माजी महापौरांचा महाप्रचार आणि समितीचा घातला आचार…
महाराष्ट्र एकीकरण समितीचा बट्याबोळ करायचा विडाच जणू काही लोकांनी उचललेला दिसतो. मराठी माणसाचा घात मराठी माणूसच करू शकतो हेच खरे. एवढी वर्ष गटतट म्हणून समितीचा उद्धार करणाऱ्या लोकांनी आता उघड उघड राष्ट्रीय पक्षांचे जोडे उचलण्याची सपारीच घेतली आहे. एरवी समितीसाठी किती काम करतो, आपण मराठी कसे, समितीनिष्ठ कसे हे …
Read More »चलवेनहट्टीत ब्रम्हलिंग मंदिरचा पहिला वर्धापन दिन
बेळगाव : चलवेनहट्टी येथे श्री ब्रम्हलिंग मंदिरचा पहिला वर्धापन दि. ४ व ५ मे असा दोन दिवस साजरा होणार आहे. दि. ४ रोजी वेगवेगळ्या गावचे हारीपाठ होणार आहेत तसेच आठ वाजता तुरमुरी येथील प्रसिद्ध किर्तनकार बाळू भक्तिकर यांचे रात्री ८-०० किर्तन होणार आहे तसेच किर्तन सोहळा संपल्यावर नंतर गावातील …
Read More »डॉ. सरनोबत दाम्पत्याकडून जगदीश शेट्टर यांचा सत्कार
बेळगाव : शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर व भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत परिवारातर्फे बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांना संपूर्ण पाठिंबा व्यक्त करण्याबरोबरच त्यांचा चांदीची तलवार देऊन सत्कार करण्यात आला. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज शुक्रवारी सकाळी आपल्या प्रचार दौऱ्याप्रसंगी नियती …
Read More »जरांगे- पाटील यांच्या बेळगाव सभेला सांगलीहून कार्यकर्ते उपस्थित
बेळगाव : काल बेळगाव येथील धर्मवीर संभाजी उद्यान येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला त्यांचं संबोधन ऐकण्यासाठी सांगलीहून कार्यकर्ते उपस्थित होते. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीत आपणही योगदान द्यावं व बेळगावातील युवा कार्यकर्त्यांकडून सीमाप्रश्नी माहिती घेऊन महाराष्ट्रातील युवावर्ग सीमावासीयांच्या पाठीशी उभा करावा यासाठी हे कार्यकर्ते उपस्थित होते. सीमाप्रश्न सोडवणुकीच्या …
Read More »महाराष्ट्रा स्वतःच्या अस्तित्वासाठी जागा हो…
करताय ना महाराष्ट्र दिन साजरा? खूप आनंदोत्सव असेल तुमच्याकडे. संस्कृतीचा जल्लोष असेलच की? आणि हो विसरलोच हुतात्मा स्मारकावर जाऊन नमन केला की नाही? आठवणीने करा बर का. जमलच थोडा वेळ तर त्या स्मारकाच्या बाजूला असणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या नकाशाखाली काही नावे कोरली आहेत ती सुद्धा वाचा.. जास्त वेळ नाही लागणार …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारासाठी सीमाभागात येवू नये; म. ए. समितीची विनंती
बेळगाव : 2 मे रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरुद्ध भाजपचा प्रचार करण्यासाठी येत आहेत, एकनाथ शिंदे सीमासमन्वय मंत्री त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा कधी सीमाभागात मराठी भाषिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आला नाही, युवकांवर खोटे खटले दाखल झाले, तुरुंगात घालण्यात आले, मराठी भाषिकांची विविध प्रकारे …
Read More »संघर्ष करायची तयारी ठेवली तर सीमाप्रश्न सहा महिन्यात सोडवू : मनोज जरांगे- पाटील
बेळगाव : सीमाप्रश्न सोडविण्यासाठी मराठ्यांच्या प्रत्येक घरातील माणसाने पुढे येणे गरजेचे आहे. तुम्ही एकजूट दाखवली. संघर्ष करायची तयारी ठेवली तर हा प्रश्न सहा महिन्यात सोडवून देण्याची जबाबदारी आपली आहे. मी एकदा शब्द दिला तर मागे घेणार नाही. पण, त्यासाठी प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची तयारी करावी लागेल, असे मराठा आरक्षण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta