बेळगाव : दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी मराठी विद्यानिकेतनचे सचिव, द.म.शि. मंडळाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, सीमा चळवळीतील कार्यकर्ते दिवंगत अनंत जाधव यांची आदरांजली सभा पार पडली. दिनांक १ सप्टेंबर रोजी अनंत जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. अनंत जाधव हे मराठी विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक सचिव होते. मराठी विद्यानिकेतन …
Read More »“बेळगावच्या राजा”ची जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती
बेळगाव : बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथील ‘बेळगावचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेश मूर्तीची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महाआरती केली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी, गणेशोत्सव हा तरुणांसाठी आणि नागरिकांसाठी एकता, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव आहे, असे सांगितले. त्यांनी सर्व नागरिकांना शांतता आणि सलोख्याने हा सण …
Read More »बेळगावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; अनोळखी हिंदू वृद्धेवर अंत्यसंस्कार
बेळगाव : बेळगावात हिंदू-मुस्लिम एकतेचा आदर्श दर्शवित माजी महापौर विजय मोरे यांच्या पुढाकारातून अनोळखी हिंदू वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बेळगावात माणुसकी आणि जातीय सलोख्याचा एक आदर्श प्रसंग समोर आला आहे. बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मागील १० ते १५ दिवसांपासून उपचार घेत असलेल्या एका अनोळखी हिंदू वृद्ध महिलेचे काल निधन झाले. …
Read More »अमली पदार्थांच्या विक्रीप्रकरणी शहापूर पोलिसांकडून एकाला अटक
बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. शहापूर पोलीस ठाण्याने बुधवारी समर्थ नगर येथे केलेल्या कारवाईत विनायक रामा चारटकर नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १५.९८ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे ३० हजार रुपये आहे. पोलिसांनी आरोपीकडून …
Read More »श्रीमूर्ती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज : पोलीस आयुक्त भूषण बोरसे
बेळगाव : बेळगाव शहरात शनिवारी श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी, त्याचबरोबर श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पाडावी याबाबत संपूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, शनिवारी बेळगाव …
Read More »बेळगावात सकल मराठा समाजाचा आनंदोत्सव!
बेळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे पाच दिवसापासून उपोषणाला बसले होते. त्यांच्या या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल बेळगाव सकल मराठा समाजाच्यावतीने धर्मवीर संभाजी चौक येथे आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील …
Read More »संत मीरा शाळेला तिहेरी मुकुट; बालिका आदर्शही विजेता
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला- मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा इंग्रजी शाळेने तिहेरी मुकुट संपादन केला तर बालिका आदर्श शाळेने विजेतेपद पटकाविले. प्राथमिक मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने लिटल स्कॉलर शाळेचा 7-0 असा …
Read More »राजहंसगड – देसूर रस्त्यावर खड्डे…
राजहंसगड : राजहंसगड – देसुर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, या खड्ड्यामुळे येथील नागरिक व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राजहंसगड गावच्या वेशीत असलेल्या ब्रिज जवळ मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून या खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना येत नसल्याने अपघात घडत आहेत, त्यामुळे येथील …
Read More »उद्या बेळगावात सकल मराठा व मराठी क्रांती (मूक) मोर्चाच्यावतीने आनंदोत्सव!
बेळगाव : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अभूतपूर्व असे यश मिळाले आहे. त्यामुळे मराठा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याची वाट मोकळी झाली आहे. बेळगावातील मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता. या आंदोलनाला मिळालेल्या यशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 …
Read More »बेळगावात 5 रोजी जिल्हास्तरीय ‘जय गणेश श्री -2025’ शरीरसौष्ठव स्पर्धा
बेळगाव : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्स या संघटनेतर्फे येत्या शुक्रवार दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता ‘जय गणेश श्री -2025’ किताबाच्या पहिल्या जिल्हा पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे भरविली जाणारी ही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta