बेळगाव : काँग्रेसने सावरकरांची प्रतिमा लावण्यास विरोध दर्शविल्यानंतर भाजप आता गणेशोत्सवात सावरकरांचे भावचित्र लावण्यास पुढे सरसावला आहे. बेळगावातही सावरकरांचे चित्र लावण्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवादरम्यान सर्व गणेश मंडळांमध्ये सावरकरांची प्रतिमा लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याच मुद्द्यावर बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अभय यांनी गणेशोत्सवादरम्यान …
Read More »‘ना नफा ना तोटा’ अथर्व फाउंडेशनची दुसरी लॅब बेळगावात सुरु
बेळगाव : अथर्व फाउंडेशन या संस्थेच्या वतीने गेल्या वर्षी गणेश चतुर्थीला सोमवार पेठ टिळकवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या लॅबोरेटरीला मिळालेला प्रतिसाद आणि शहरी विभागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन अथर्वच्या वतीने कडोलकर गल्ली बेळगाव येथे रविवारी आणखी एक रक्त-लघवी कलेक्शन केन्द्राचा प्रारंभ करण्यात आला. उत्तर विभागाचे आमदार अनिल बेनके व …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्यांकडून स्मशानभूमी झाली स्वच्छ
बेळगाव : येळ्ळूर येथील मुख्य स्मशानभूमी गेली कित्येक महिने अस्वच्छ होती. यामुळे याठिकाणी गावातील भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता. व डासांचा पैदास वाढला होता. याची दखल घेऊन येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन स्मशान स्वच्छता केली. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्राम …
Read More »कुस्तीपटू लक्ष्मी पाटील यांना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून अभिनंदन!
बेळगाव : हरियाणा येथे २४ ते २७ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या फेडरेशन चषक – हरियाणा रोटक २०२२ या ५४ किलो गटातील कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार्या हलगा बस्तवाड गावातील लक्ष्मी संजय पाटील हिचे बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मीबाई हेब्बाळकर यांनी अभिनंदन केले. लक्ष्मीच्या धाडसाचे आणि शौर्याचे कौतुक करून आमदार हेब्बाळकर …
Read More »“आजादी का अमृत महोत्सव” साजरा
बेळगाव : आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सगळीकडे आजादी का अमृत महोत्सव हा सगळीकडे साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जायंटस प्राईड सहेली व व जायंट्स परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने भातकांडे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये एक ऑगस्ट ते सहा ऑगस्ट पर्यंत देशभक्तीवर गायन, भाषण, चित्रकला, फॅन्सी …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायतकडून चांगळेश्वरी मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची कमतरता झाली दूर…
बेळगाव : येळ्ळूर येथील ग्राम देवता श्री चांगळेश्वरी मंदिर परिसरात गेली कित्येक वर्षाची मागणी आज ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी केली पूर्ण येळ्ळूर येथील चांगळेश्वरी मंदिर समोर पिण्याच्या पाण्याचे फिल्टर मशीनचे आज उद्घाटन झाले. चांगळेश्वरी मंदीरला बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांना यात्रा काळात व इतर दिवशी पिण्याच्या पाण्याची कमतरता …
Read More »मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाची कार्यकारिणी जाहीर
बेळगाव : कोरोनाचा कहर कमी झाल्याने यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाची 2022- 23 ची कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे ती खालील प्रमाणे असेल. अध्यक्ष- रमाकांत कोंडुस्कर, कार्याध्यक्ष-रणजित चव्हाण पाटील, उपाध्यक्ष-रमेश पावले, सतीश गोरगोंडा, रमेश कळसन्नवर, शिवराज पाटील, सागर पाटील, चंद्रकांत कोंडुस्कर, स्वागताध्यक्ष-मदन बामणे, …
Read More »देवराज अरसू यांची 107 वी जयंती बेळगावात उत्साहात
बेळगाव : सामाजिक समतेचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री डी. देवराज अरसू यांची 107 वी जयंती बेळगावात आज उत्साहात साजरी करण्यात आली. बेळगाव शहरात आज, शनिवारी जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, मागासवर्गीय कल्याण विभाग, महानगर पालिका आणि देवराज अरसू विकास महामंडळ यांच्या सहयोगाने सामाजिक समतेचे प्रणेते माजी मुख्यमंत्री देवराज अरसू यांच्या …
Read More »जन्माष्टमी महोत्सवाची सांगता
बेळगाव : आंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने गेल्या आठवडाभर चाललेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाची शनिवारी दुपारी सांगता झाली. काल मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव संपन्न झाल्यानंतर इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा अविर्भाव दिन आज शनिवारी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रभुपाद यांच्यासाठी आज श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात विशेष पूजेचे आयोजन …
Read More »शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे मराठा समाजाला किरण जाधव यांच्याकडून आवाहन
बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने शासनाच्या विविध समाजोपयोगी योजनांसंदर्भात जागृती करण्यासाठी मराठा समाजाचे नेते किरण जाधव, गुणवंत पाटील, सुनील जाधव, अक्षय साळवी, राजन जाधव यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे मराठा समाजाला आवाहन केले आहे. कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळाचे अध्यक्ष मारुतीराव मुळे व मराठा समाजाचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta