बेळगाव : येत्या 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव उत्तर व बेळगाव दक्षिण मतदार संघातून म. ए. समितीतर्फे निवडणूक लढविण्याऱ्या इच्छुकांनी देणगी व अनामत रक्कमेसह आपले अर्ज रामलिंगखिंड गल्ली, रंगूबाई पॅलेस येथील शहर म. ए. समितीच्या कार्यालयात दि. 4 ते 6 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते 1 व सायंकाळी …
Read More »101 जणांची कमिटी निवडणार ग्रामीणचा समिती उमेदवार; कमिटीत प्रत्येक गावच्या प्रतिनिधीचा समावेश
तालुका समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी म. ए. समितीकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया रविवारी आयोजित बैठकीत जाहीर करण्यात आली. उमेदवार निवड करताना प्रत्येक गावच्या सदस्याचा समावेश असलेल्या 101 जणांच्या सदस्यांची निवड करून कमिटीची स्थापना केली जाणार आहे. कमिटीने जाहीर केलेला उमेदवारच समितीचा अधिकृत उमेदवार असणार आहे. मराठा …
Read More »निवड कमिटीची होणार स्थापना : कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार
शहर म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : बेळगाव दक्षिण व बेळगाव उत्तर या दोन्ही मतदारसंघांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार निवडीची प्रक्रिया जाहीर केली. 4 ते 6 एप्रिलदरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत रामलिंगखिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेस येथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार …
Read More »ग्रामीण शिक्षण अभियान मोहिमेद्वारे ‘ऑपरेशन मदत’ गटाकडून क्रीडा साहित्याचे वाटप
बेळगाव : ‘ग्रामीण शिक्षण अभियाना’च्या माध्यमातून सरकारी प्राथमिक शाळेतील मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपतर्फे बेळगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील कर्ले गावातील सरकारी शाळेतील मुला-मुलींना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. मार्चमध्ये परीक्षा झाल्यानंतर मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न न राहता या लहान मुला-मुलींमध्ये मैदानी खेळांची आवड …
Read More »दक्षिण मतदारसंघात स्वतःचे संघटन असलेला उमेदवार गरजेचा
बेळगाव : समितीचा बालेकिल्ला समजला जाणारा मतदारसंघ म्हणजे बेळगाव दक्षिण. मात्र नेत्यातील दुहीमुळे समितीला हा बालेकिल्ला गमवावा लागला आहे. राष्ट्रीय पक्षाच्या मुजोरशाहीला कंटाळलेले कार्यकर्ते आता पुन्हा समितीच्या मुख्य प्रवाहात येऊ पाहत आहेत. विविध संघटना समितीकडे वळत आहे. त्यामुळे समितीचा परीघ वाढत चालला आहे. समितीचे बाळ वाढले आहे. मराठी माणूस …
Read More »जायंट्स मेनचा आज अधिकारग्रहण
अध्यक्षपदी सुनिल मुतगेकर तर सचिवपदी लक्ष्मण शिंदे यांची निवड बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन या संघटनेच्या २०२३ सालच्या पदाधिकारी आणि संचालकांचा अधिकारग्रहण सोहळा आज रविवार दि. ०२ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. जायंट्स मेनची स्थापना १९८६ ला झाली असून यावर्षी या संघटनेने ३६ वर्षे पूर्ण केली आहेत. …
Read More »डॉ. शिवाजी कागणीकर यांना “जायंट्स भूमिपुत्र” पुरस्कार जाहीर
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कट्टनभावी, निंगेनहट्टी, गुरामहट्टी कडोली वगैरे ग्रामीण परिसरात विविध प्रकारची दोन लाख झाडे लावणारे व इतरत्रही असेच वृक्षारोपण व संवर्धन करणारे, तसेच ज्यांनी तलाव, विहिरी व बंधाऱ्याची निर्मिती करून ही भूमी ओलिताखाली आणली ज्यामुळे माणसेच नव्हे तर पशुपक्षीही सुखावले. नरेगा या योजनेमधून सर्वांना काम मिळवुन देणारे …
Read More »भीषण अपघातात नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू
मुडलगी : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगीजवळ कार आणि टँकरच्या समोरासमोर झालेल्या धडकेत नवविवाहित दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील हळ्ळूर गावाजवळ कार आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन नवविवाहित दाम्पत्याचा लग्नाच्या दहाव्या दिवशी मृत्यू झाला. महाराष्ट्रातील इंद्रजीत मोहन दम्मनगी (27) आणि कल्याणी इंद्रजीत दम्मनगी (24) यांचा मृत्यू झाला. नवविवाहित जोडपे शनिवारी कारमध्ये …
Read More »सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा हलगा येथील शिक्षक प्रकाश पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
बेळगाव : विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यामध्ये उत्तम मार्गदर्शन करून त्यांच्या भावी आयुष्यात मोलाचा वाटा उचलणारे शिक्षक म्हणजे प्रकाश पाटील होय. खानापूर तालुक्यासारख्या दुर्गम भागातील शाळांमध्ये 25 वर्ष शिक्षकी पेशा सांभाळून त्यांनी हलगा येथील प्राथमिक शाळेमध्ये पाच वर्षे आपली सेवा बजावली आहे. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते, …
Read More »धर्मस्थळ संघातर्फे पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय ग्रंथालयाला 1 लाखाची देणगी
बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय शहापूर आणि श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी योजना शाखा बेळगाव यांच्या समन्वयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम विकास प्रकल्पाचे बेळगावचे संचालक श्रीमान प्रदीप शेट्टी यांनी पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयातील वाचनालय इमारतीसाठी धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेअंतर्गत 1 लाखाची देणगी उपलब्ध करून दिले. या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta