Friday , June 5 2026
Breaking News

बेळगाव

एपीएमसी व्यापारी बंधूंचा रमाकांत कोंडुसकर यांना जाहीर पाठिंबा

  बेळगाव : बेळगावमधील अत्यंत चुरशीने निवडणूक लढविला जाणारा मतदार संघ म्हणून दक्षिण मतदार संघाची ओळख निर्माण झाली आहे. या मतदार संघात राष्ट्रीय पक्षांना ‘टफ फाईट’ देण्यासाठी तोडीस तोड असाच उमेदवार निवडणे गरजेचे आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली दक्षिण विनसभा मतदार संघातून रमाकांत कोंडुसकर यांनी उमेदवारी मागितली असून रमाकांत कोंडुसकर …

Read More »

शिवसेना सीमाभागतर्फे शिव पुण्यतिथी गांभीर्याने

  बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभाग (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने आज गुरुवारी सकाळी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी गांभीर्याने आचरणात आणण्यात आली. शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्याद्वारे बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभाग (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने शिव पुण्यतिथी गांभीर्याने आचरणात आणण्यात आली. यावेळी …

Read More »

शिवजयंती चित्ररथ महामंडळाची नियोजन बैठक रविवारी

  बेळगाव : शहर व उपनगरात शिवजयंती साजरी करण्याबाबत तसेच शिवजयंती चित्ररथ मिरवणूक संदर्भात कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासाठी रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता बैठक आयोजित केली आहे. रविवारी सकाळी 10 वाजता धर्मवीर संभाजीराजे चौकातील दुर्गादेवी मंदिर जत्तीमठ येथे होणार …

Read More »

माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर यांचा समितीकडे अर्ज दाखल

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे इच्छुक म्हणून निलजी येथील रहिवासी माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र चुडामणी मोदगेकर यांनी अर्ज केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते ऍड. राजाभाऊ पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी अर्जाचा स्वीकार केला आहे. गुरुवार दिनांक 6 …

Read More »

हॉकी बेळगावतर्फे १० एप्रिलपासून हॉकी प्रशिक्षण शिबिर

  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव सारख्या ठिकाणी अनेक हॉकीपटूंनी आपल्या अप्रतिम कौशल्याने आणि तल्लख प्रतिभेने ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र अलीकडे हॉकी खेळाची क्रेझ आणि उत्साह कमी झाला असून बेळगावने हॉकीसाठी असलेली ख्याती गमावली आहे. ही खेती पुन्हा मिळविण्यासाठी आणि तरुणांना केवळ हॉकी खेळण्यासाठीच नव्हे तर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त …

Read More »

समिती उमेदवारीसाठी रमाकांत कोंडुसकर उद्या अर्ज दाखल करणार

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे नेते रमाकांत कोंडुसकर हे विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव दक्षिण मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता समितीकडे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विनंती अर्ज दाखल करणार आहेत. बेळगाव दक्षिण मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीला विजयी होण्यासाठी तगड्या उमेदवाराची गरज आहे. रमाकांत कोंडूसकर निवडणूक …

Read More »

बेळगाव दक्षिण, उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार निश्चित?

  बेळगाव : उमेदवार जाहीर करण्यात अव्वल असणाऱ्या काँग्रेस पक्षाने दुसऱ्या उमेदवार यादीच्या घोषणेची तयारी केली असून बेळगावमधील दक्षिण आणि उत्तर मतदार संघाच्या उमेदवाराची निवड केल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. बेळगाव दक्षिणमध्ये प्रभावती चावडी आणि उत्तरमध्ये राजू सेठ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अद्याप …

Read More »

समितीकडे आर. एम. चौगुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे इच्छुक म्हणून मन्नुर येथील आर. एम. चौगुले यांनी आज अर्ज केला आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस ऍड. एम. जी. पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी यांनी अर्जाचा स्वीकार केला आहे. बुधवार दिनांक पाच रोजी अर्ज …

Read More »

नवहिंद सोसायटीच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध – चेअरमन प्रकाश अष्टेकर

  अधिकार ग्रहण समारंभ उत्साहात संपन्न येळ्ळूर : येथील ‘नवहिंद सोसायटी’ आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. सर्व स्तरातील घटकांना आर्थिक मदत करून जनमाणसात आपले स्थान प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहीन, असे विचार नूतन चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर यांनी अधिकार ग्रहण समारंभात मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक श्री. पी. ए. …

Read More »

प्रचार परवानगीसाठी लागणार अत्यावश्यक कागदपत्रे

  बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांकडून होणारे प्रचार, जाहीर सभा, ध्वनिक्षेपकांचा वापर, प्रचार कार्यालयांचा प्रारंभ आदींच्या परवानगीसाठी अर्ज करावा लागणार असून सदर परवानगीसाठी इच्छुक उमेदवाराला किंवा त्याच्या प्रतिनिधीला 48 तास आधी हा अर्ज करावा लागेल. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देखील निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक विभागाकडून जाहीर …

Read More »