Friday , June 5 2026
Breaking News

बेळगाव

शिवारातील पार्ट्यांवर निर्बंध घाला; शेतकर्‍यांची मागणी

  बेळगाव : शहापूर, वडगाव, अनगोळ, जुनेबेळगाव, येळ्ळूर, धामणे तसेच परिसरातील शिवारात रात्री 8 ते 11 पर्यंत दारू, सिगारेट त्याचबरोबर खाण्यासाठी इतर पदार्थ आणून शेतात घोळका करून बसतात व पार्टी करून झाल्यानंतर कचरा शेतात इतरत्र टाकून दारूच्या बाटल्या फोडून काचा पसरवून जातात. शहापूर शिवार धामणे आदी परिसरात जुगार खेळ रंगात …

Read More »

वडगावसह उपनगरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव्याप

  बेळगाव : वडगावसह उपनगरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव्याप वाढलेला आहे. वारंवार मागणी करून देखील महानगरपालिका मोकाट कुत्र्यांचे बंदोबस्त करण्यात अयशस्वी ठरत आहे. संभाजीनगर वडगाव येथे पाच वर्षाच्या बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला आहे. नागरिकांच्या जागरूकतेमुळे मोठा अनर्थ टळला. तथापि वारंवार मागणी करून देखील महानगरपालिकेने मोकाट कुत्र्यांवर कारवाई केली नसल्यामुळे नागरिकांत …

Read More »

‘दक्षिण’साठी रमाकांत कोंडुसकरांना जनतेचा वाढता पाठिंबा

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून दक्षिण मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले रमाकांत कोंडुसकर यांना जनतेचा वाढता पाठिंबा दिसून येत आहे. दक्षिण विधानसभा मतदार संघातील जनतेच्या प्रतिक्रियांचा कानोसा घेताना बहुसंख्य नागरिकांनी रमाकांत कोंडुसकर यांना पसंती दर्शविली आहे. रमाकांत कोंडुसकर यांच्यासंदर्भात बहुसंख्य नागरिकांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत समितीमधून रमाकांत …

Read More »

मदन बामणे यांचा उमेदवारी अर्ज समितीकडे दाखल

  बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे युवा नेते मदन बाबुराव बामणे यांनी दक्षिण मतदार संघात विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज शहर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. मदन बामणे हे मागील 23 वर्षांपासून समितीमध्ये कार्यरत आहेत तर मागील 20 वर्षांपासून शहर समितीचे कार्यकारिणी सदस्य आहेत. आजपर्यंत समितीने पुकारलेल्या प्रत्येक लढ्यात …

Read More »

दौलत सहकारी साखर कारखान्यात अडलेली रक्कम नवहिंद व सह्याद्री संस्थेने परत मिळविली!

  बेळगाव (प्रतिनिधी) : दौलत सहकारी साखर कारखाना यांची लेसी कंपनीने तासगाव शुगर मिल्स लिमिटेड तारण गहाण कर्जबाबतचा लढा नवहिंद व सह्याद्री पतसंस्थेने सर्वोच्च न्यायालयात जिंकला. सुमारे 35 कोटी 76 लाख रकमेचे धनादेश 31 मार्च 2023 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित दोन्ही संस्थेकडे सुपूर्द केले. दौलतमध्ये अडकून पडलेली रक्कम नवहिंद पतसंस्थेस …

Read More »

विद्याभारती अखिल भारतीय सर्वसाधारण सभेला आजपासून प्रारंभ

  बेळगाव : बेंगलोर चन्नेनहळ्ळी येथील जनसेवा विद्याकेंद्र शाळेच्या विद्याअरण्य सभागृहात विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानच्या तीन दिवशीय सर्वसाधारण सभेला प्रारंभ झाला. विविध राज्यातून 350 हून अधिक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. तीन दिवसीय सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, म्हैसूर चाणक्य विद्यापीठाचे कुलगुरू …

Read More »

समितीकडे शिवाजी सुंठकर यांचा अर्ज सादर

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी माजी महापौर समितीचे नेते शिवाजी सुंठकर यांनी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. समितीचे समितीचे नेते ऍड. राजाभाऊ पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, समिती चिटणीस ऍड. एम. जी. पाटील, चिटणीस मनोहर संताजी यांनी अर्जाचा स्वीकार केला आहे. कॉलेज रोडवरील बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

आर. आय. पाटील यांचा समितीकडे उमेदवारी अर्ज दाखल

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघासाठी मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. आय. पाटील यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. ऍड. राजाभाऊ पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, चिटणीस ऍड. एम. जी. पाटील, चिटणीस मनोहर संताजी यांनी अर्जाचा स्वीकार केला आहे. शुक्रवार दिनांक ७ रोजी कॉलेज रोडवरील तालुका …

Read More »

हिरेबागेवाडी येथे 14 किलो वजनाचे चांदीचे दागिने जप्त

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यात होत असलेल्या बेकायदेशीर कृत्यांची गंभीर दखल घेत वाहनांची तपासणी केली जात आहे. याच अनुषंगाने काल गुरुवारी एका तपासणी अंतर्गत हूपरी (महाराष्ट्र) येथून हुबळीला घेण्यात येत असलेली सुमारे 14 किलो 111 ग्रॅम चांदीचे दागिने हिरे बागेवाडी जवळ जप्त …

Read More »

भाजप स्थापना दिन साजरा

  बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्या 44 व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून गुडशेड रोडवरील भाजप कर्नाटक राज्य ओबीसी युवा मोर्चाचे सचिव किरण जाधव यांच्या संपर्क कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना किरण जाधव यांनी, ‘ मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता असून देश सेवेसाठी मी कटिबद्ध आहे. प्रथम राष्ट्र ही संकल्पना माझ्या …

Read More »