Monday , July 27 2026
Breaking News

बेळगाव

श्री मंगाईनगर रहिवासी संघटनेतर्फे लसीकरण शिबिर संपन्न

  बेळगाव : वडगाव येथील श्री मंगाईनगर रहिवासी संघटनेतर्फे आयोजित डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर आज शुक्रवारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. सध्याच्या पावसाळी दिवसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून श्री मंगाईनगर येथील धामणेकर हॉल येथे आज सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा सुमारे 350 …

Read More »

धर्मवीर संभाजी नगर वडगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

    अध्यक्षपदी विनायक मोरे, उपाध्यक्ष सचिन बांदिवडेकर व कार्याध्यक्ष प्रसाद यळ्ळूरकर बेळगाव : धर्मवीर संभाजी नगर वडगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक श्री गणेश मंदिर सभागृहात झाली. यामध्ये नूतन अध्यक्ष म्हणून विनायक मोरे, उपाध्यक्ष म्हणून सचिन बांदिवडेकर व कार्याध्यक्ष म्हणून प्रसाद यळ्ळूरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. …

Read More »

उद्या दि. 28 जुलैपासून शाळा पूर्ववत सुरू : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान उद्या शुक्रवारपासून (28 जुलै) जिल्ह्यातील सर्व शाळा नेहमीप्रमाणे सुरू होतील, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कळविले आहे.

Read More »

गृहलक्ष्मी नोंदणीसाठी लॉगिनचा गैरवापर; दोघांविरोधात तक्रार दाखल

  बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी ग्राम वन केंद्राच्या लॉगिन आयडीचा वापर करून लोकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगावमधील चव्हाट गल्ली येथे जनता ऑनलाइन केंद्र चालवणारे अद्रिश आर.टी. आणि मुतगा ग्राम वन एक केंद्रातील किरण चौगला यांच्याविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात …

Read More »

आंतरराज्य चोरट्यांना अटक; 55.60 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

  गोकाक : गतवर्षी गोकाक तालुक्यात अनेक ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात गोकाक सर्कल पोलिसांना यश आले असून, आंतरराज्य चोरट्यांना अटक करून 55.60 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. गत वर्षी 11-11-2022 रोजी विवेकानंद नगर येथील प्रकाश लक्ष्मण टोलीन्नावर यांच्या घरातून तसेच 23-5-2023 रोजी तवग गावातील श्री बिरेश्वर …

Read More »

उद्यमबाग पोलिसांचा राक्षसी प्रताप; अपंग व्यक्तीला मारहाण

  बेळगाव : खानापूर -बेळगांव रस्त्यावर एका अपंग व्यक्तीवर उद्यमबाग पोलिसांनी अमानुषपणे लाथा बुक्क्यांनी मारहाण करत क्रूरतेचा कळस गाठला आहे. इतकेच करून हे खाकीतील हैवान शांत बसले नाहीत तर त्या अपंग तरुणाला रस्त्याच्या मध्यभागी आणून झोपविले. पोलिसांच्या या कृत्याचा विडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. मंगळवारी रात्री घडलेली घटना उशिराने उघडकीस …

Read More »

ग्रामीण भागातील नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करण्याच्या सूचना

  ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव व बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी सचिव अंजुम परवेझ बेळगाव : महाराष्ट्रातून नद्यांची आवक, पर्जन्यमान, जलाशयाची पातळी आणि पाण्याचा विसर्ग यावर लक्ष ठेवून पूर व्यवस्थापन अत्यंत शास्त्रीय आणि प्रभावी पद्धतीने करता येते. तेव्हा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर लक्ष ठेवावे, अशी सूचना ग्रामविकास व पंचायत …

Read More »

ग्रा. पं. सदस्यांनी दिले कासवाला जीवदान!

  बेळगाव : रस्त्यावर सापडलेल्या कासवाला जीवदान देताना सामाजिक कार्यकर्ते व ग्रा. पं. सदस्यांनी त्याला सुखरूपपणे गावच्या तलावात सोडल्याची घटना आज गुरुवारी सकाळी कंग्राळी बुद्रुक येथे घडली. याबाबतची संक्षिप्त माहिती अशी की, कंग्राळी बुद्रुक येथे आज सकाळी वेशीच्या वस्तीकडे जाणाऱ्या ग्रा. पं. सदस्य सुरेश राठोड यांच्या गाडीसमोर एक कासव आले. …

Read More »

मुतगा येथील एका खाजगी ऑनलाईन केंद्राला टाळे

  बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणी प्रक्रियेसाठी ऑनलाईन केंद्रामध्ये गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध खाजगी तसेच काही सरकारी ऑनलाईन केंद्रांवर पैसे आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून या अंतर्गत आज मुतगा येथील एका खाजगी ऑनलाईन केंद्राला टाळे ठोकण्यात आले आहेत. खाजगी ऑनलाईन सेंटर वरून ग्राम वन केंद्राची आय …

Read More »

कृषी अधिकाऱ्यांनी केली बळ्ळारी नाला पुराची पहाणी

  बेळगाव : येळ्ळूर रस्त्यापासून सुरु होणारा बळ्ळारी नाला परिसरात आठ दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने मोठी पूर परिस्थिती निर्माण होऊन परिरातील अनगोळ, शहापूर, वडगाव, माधवपूर, जूनेबेळगाव, हालगा, अलारवाड, बेळगावसह इतर शिवारात पूर आल्याने शेतकऱ्यांच्या भातपीकांसह इतर पीकं पाण्यात असल्याने संपूर्ण शेतकरी चिंतेत आहे. याला मुख्य कारण बळ्ळारी नाल्याची खुदाई न …

Read More »