Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

क्रेडाई शिष्टमंडळाने घेतली जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांची भेट

  बेळगाव : क्रेडाई बेळगाव संस्थेच्या शिष्टमंडळाने शनिवारी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष पी. एस. हिरेमठ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सर्वप्रथम बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. संजीव पाटील यांचे अभिनंदन व स्वागत केले. त्यानंतर त्यांना क्रेडाईच्या …

Read More »

बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन उद्या

  बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन सोमवार दिनांक १ ऑगस्ट रोजी आहे. वर्धापन दिनानिमित्त पत्रकार संघाच्या कुलकर्णी गल्ली येथील पद्मावती चेंबर्स येथील पत्रकार भवन येथे सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. दत्ता नाडगौडा हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. वर्धापन …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम प्राइड सहेलीची नीता किड्सला भेट

  बेळगाव : प्राइड सहेलीच्या सेक्रेटरी जिग्ना शहा यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त नीता किड्समध्ये छोट्या मुलांच्या rhymes अँड स्टोरी टेलिंगच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. नीता किड्स वर्ल्डमध्ये साधारण 30 छोटी मुले आहेत. या मुलांच्यातील कलागुणांना समोर आणण्यासाठी या स्पर्धा अध्यक्ष आरती शहा यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. …

Read More »

अंत्यविधीस चक्क वानराची हजेरी!

  बेळगाव : शहापूर स्मशाभूमीत अंत्यविधीच्या वेळी चक्क एका वानराने हजेरी लावली. इतकेच नव्हे तर ते वानर भावुक देखील झाले. हिंदू धर्मात वानराला बजरंगबली मारुतीरायचे प्रतिरूप मानले जाते. आज शनिवार आणि मृत व्यक्तीचे नाव देखील मारुती असल्यामुळे शहापूर स्मशानभूमीत घडलेला प्रकार चांगलाच चर्चेत आहे. याबाबत समजलेली हकीकत अशी की, जोशी …

Read More »

बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्ष माळू मजुकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

  बेळगाव : बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्ष माळू मजुकर काँग्रेस पक्षात प्रवेश केले आहेत. हिंडलगा येथे युवा काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी आयोजित “युथ जोडो बुथ जोडो” कार्यक्रमात माळू मजूकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँग्रेस शाल घालुन पक्षात स्वागत करून घेतले. माळू मजुकर हे महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

बैलहोंगलजवळील बैलवाड क्रॉसजवळ दोन दुचाकींमध्ये अपघात; एक ठार

  बेळगाव : बैलहोंगलजवळील बैलवाड क्रॉसजवळ दोन दुचाकींमध्ये अपघात होऊन दुचाकीस्वारांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सौंदत्ती येथील गडीगेप्पा कल्लाप्पा हवालदार (62) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सौंदत्तीहून नेगीनहाळ येथे जात असताना त्याच मार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला त्यांची धडक बसल्याने हा अपघात झाला. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होत असलेल्या गडीगेप्पाचा जागीच मृत्यू …

Read More »

प्रगतिशील लेखक संघातर्फे उद्या प्रेमचंद जयंती

  बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रेमचंद यांची जयंती रविवार दि. ३१ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता साजरी करण्यात येणार आहे. यावेळी वक्ते म्हणून ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्रा. संजय बंड उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे राहातील. गिरीश कॉम्प्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी …

Read More »

जिल्हा प्रशासनाच्या विरोधात २ ऑगस्ट रोजी कित्तूर बंद

बेळगाव : कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या राजवाड्याची प्रतिकृती तयार करण्याचा निर्धार सरकारने घेतल्याने राणी कित्तूर राणी चन्नम्मा अभिमानी आनंद व्यक्त करत होते. कित्तूर येथील किल्ल्याशेजारी राजवाड्याची प्रतिकृती तयार करण्याची मागणीही होत होती. मात्र कित्तूर तालुक्यातील बच्चनकेरी गावात राजवाडा निर्माण करण्यासंदर्भात स्वामीजी आणि चन्नम्मा अभिमान्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकरणी बेळगाव …

Read More »

प्रवीण नेट्टारू हत्येच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

बेळगाव : राज्यात खुनाच्या घटना वाढत असल्याने पीएफआय, सीआयएफ आणि एसडीपीआय या समाजकंटक संघटनांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात आज आंदोलन केले. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे येथे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नेट्टारू यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ आज शनिवारी बेळगावच्या कोल्हापूर सर्कल परिसरात अभाविप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कर्नाटकातील लोक किती असुरक्षित …

Read More »

पोस्टमन विक्रम फडके यांचा निवृत्ती निमित्त सन्मान

  बेळगाव : गेली 39 वर्षे पोस्ट खात्यात प्रामाणिक आणि तत्पर सेवा बजावलेले शहापूर पोस्ट कार्यालयातील पोस्टमन विक्रम जनार्दन फडके यांचा आज शनिवारी निवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी फडके यांनी बजावलेल्या प्रामाणिक आणि तत्पर सेवेबद्दल त्यांचे कौतुक व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. शहापूर पोस्ट कार्यालयात पोस्टमास्टर एम. एम. …

Read More »