बेळगाव : बेळगावमधील माळमारुती पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणार्या वंटमुरी कॉलनी, श्रीनगर आणि काकती येथील 745 एकर क्षेत्र वन विभागाला देण्यात आले आहे. हा परिसर आयटी, बीटी खासगी कंपन्यांना हस्तांतरित करण्याचा विचार असून याविरोधात येथील स्थानिकांनी सोमवारी श्रीनगर साई बाबा मंदिरापासून पदयात्रेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय गाठत निवेदन सादर केले. माळमारुती पोलीस …
Read More »बेळगाव शहरात घरफोडी, चोरीच्या घटनेत वाढ
बेळगाव : बेळगावमधील टिळकवाडी परिसरातील शिवाजी कॉलनी येथील विविध भागात चोरीच्या प्रकरणात वाढ झाली असून याची धास्ती आता नागरिकांनी घेतली आहे. चोरी करणारी टोळी सध्या सर्वत्र वावरत असून याला आला घालण्याची मागणी शहर पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहर, परिसर आणि उपनगरांमध्ये चोरीच्या प्रकरणात वाढ होत चालली असून शिवाजी …
Read More »रद्दीतून बुद्धी संकल्पनेतून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
बेळगाव : विद्या आधार एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने आज चार गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलतांना शांताईचे कार्याध्यक्ष आणि बेळगावचे माजी महापौर विजय मोरे यांनी विद्यार्थ्यांनी आम्हाला रद्दी यासह कागदे द्यावीत, याद्वारे आम्ही विद्या आधार योजनेतून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क देऊ असे आवाहन केले. येथील …
Read More »बेळगाव विमानतळावर भूमी आणि तेजाचा समावेश
बेळगाव : बेळगाव विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याच्या प्रयत्नात, कर्नाटक राज्य औद्योगिक सुरक्षा दलाने (KSISF) गुरुवारी (12 मे) दोन स्निफर डॉग्सचा समावेश केला आहे. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव विमानतळावर दोन स्निफर डॉग्स, तेजा आणि भूमी यांचा समावेश करण्यात आला होता. दोन स्निफर सुप्रशिक्षित स्निफर श्वानांच्या तैनातीमुळे बेळगाव विमानतळावरील सुरक्षा …
Read More »माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, गुरुवंदना उत्साहात संपन्न
बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील आदर्श मराठी मुला-मुलींची शाळा आणि मार्कंडेय हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांतर्फे आयोजित मैत्री स्नेहसंमेलन व गुरुवंदना कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला पडला. कंग्राळी रोड जाफरवाडी येथील श्री समर्थ मंगल कार्यालयामध्ये रविवारी या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर या कार्यक्रमात उपस्थित …
Read More »बेळगावात जागतिक डेंग्यू निवारण दिनानिमित्त भव्य जागृती जथा
बेळगाव : जागतिक डेंग्यू निवारण दिनानिमित्त बेळगावात सोमवारी भव्य जागृती जथा काढण्यात आला. दरवर्षी 16 मे रोजी जागतिक डेंग्यू निवारण दिन पाळण्यात येतो. त्याचप्रमाणे आज सोमवारी बेळगावात जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, आरोग्य खाते आदींच्या सहभागाने डेंग्यू निवारण दिन पाळून भव्य जागृती जथा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या …
Read More »कुंतीनाथ कलमनी यांना प्रभातकार वा. रा. कोठारी आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान
बेळगाव : बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार आणि हल्लीये संदेश प्रादेशिक कन्नड दैनिकाचे संपादक कुंतीनाथ कलमणी यांना दक्षिण भारत जैन सभेतर्फे प्रतिष्ठेच्या प्रभातकार वा. रा. कोठारी आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 15 मे रोजी सांगली शहर महाराष्ट्र येथे दक्षिण भारत जैन सभेचे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या शताब्दी सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान …
Read More »अनगोळ येथील श्री विघ्नहर्ता गणेश मंदिरचा वर्धापन दिन सोहळा साजरा
बेळगाव : श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर एस. व्ही. रोड अनगोळ श्रीं चा 24 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी गणेश पूजा व गणहोम करून सुरुवात करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका …
Read More »विद्यार्थ्यांनी पुन्हा गजबजल्या शाळा!
बेळगाव : बेळगावसह संपूर्ण राज्यात आज सोमवार दि. 16 पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. शाळा परिसरात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. दरवर्षी मे अखेरीस शाळा सुरू केल्या जात होत्या. परंतु यंदाच्या 2022 -23 या शैक्षणिक वर्षासाठी 15 दिवस आधीच शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काल रविवार पासून …
Read More »मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेची बैठक खेळीमेळीत संपन्न
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेची बैठक रविवार दि. 15 मे रोजी खेळीमेळी वातावरणात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी हे होते. खजिनदार पोमाण्णा कुन्नूरकर यांनी 27 फेब्रुवारी 2022 रोजी भरवण्यात आलेल्या भव्य आखाड्याचा जमा-खर्च सादर केला. साधक-बाधक चर्चा होऊन उपस्थित सदस्यांनी जमाखर्चास मंजुरी दिली आणि दरवर्षी भव्य कुस्ती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta