Monday , December 8 2025
Breaking News

बेळगाव

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बोटीतून घेतला पूर परिस्थितीचा आढावा!

  चिक्कोडी : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर असल्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज चिक्कोडी तालुक्यातील यड्डूर गावातील कृष्णा नदीतील पूर परिस्थितीचा बोटीतून आढावा घेतला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. शेजारच्या महाराष्ट्रात वाढलेल्या …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाच्या भजन स्पर्धा संपन्न; महिला गटात मुक्त ग्रुप व पुरुष गटात रवळनाथ भजनी मंडळ अव्वल

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगावच्या वतीने १७ ते १९ ऑगस्ट पर्यंत मराठा मंदिर येथे घेण्यात आलेल्या नवव्या संगीत भजन स्पर्धा उत्साहाने संपन्न झाल्या. महिलांचे १९ आणि पुरुषांचे १२ गट सहभागी झालेल्या या स्पर्धेतील पहिला क्रमांक महिला गटात मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ, टिळकवाडी आणि पुरुष गटात रवळनाथ भजनी मंडळ, …

Read More »

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिन गांभीर्याने!

  बेळगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगाव व प्रगतशील लेखक संघ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज 20 ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे जीएसटी अप्पर आयुक्त श्री. आकाश चौगुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शिवराज चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नीला …

Read More »

सरकारी मराठी शाळा नं. 19 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

  बेळगाव : सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा नं. 19 या शाळेतील 1995-96 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन तब्बल 30 वर्षानंतर गेल्या रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडले. टिळकवाडीतील न्यू उदय भवन येथे आयोजित हा स्नेहमेळावा तब्बल 50 हुन अधिक माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थितीने अविस्मरणीय ठरला. प्रारंभी शाळा नं. 19 च्या निवृत्त …

Read More »

रामदुर्गमध्ये घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग शहरात मुसळधार पावसामुळे घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू असून सदर घटना शहरातील निंगापूर पेठ येथील महादेव मंदिराजवळ घडली. ७५ वर्षीय वामनराव बापू पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी की, आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घराचे छत कोसळले आणि मातीत गाडले गेले. …

Read More »

धर्मस्थळ अपप्रचाराच्या निषेधार्थ भर पावसात भव्य मोर्चा

  बेळगाव : गेल्या एक महिन्यापासून हिंदू धार्मिक तीर्थस्थान धर्मस्थळाविषयी निराधार आरोप करून खोटा प्रचार करून धर्मस्थळ नाव कलंकित करण्याच्या घटना घडत आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी मंगळवारी समस्त हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे भव्य शक्तीचे दर्शन घडले. यावेळी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी सदर मुद्दयाबाबत माहिती …

Read More »

गोकाक येथे घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोकाक शहरात घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. फरिदाबानू शकीलअहमद कानवाड वय ५० असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना आज सकाळी घडली. गंभीर जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …

Read More »

गणेशोत्सव व्यापारी बंधू खडेबाजार मंडळाकडून मुहूर्तमेढ मोठ्या दिमाखात संपन्न

  बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व्यापारी बंधू जय भवानी चौक खडेबाजार बेळगावच्या तर्फे गणेश मंडप मुहूर्तमेढ पूजन 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मंडळाचे अध्यक्ष रोहित रावळ व लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळचे अध्यक्ष विजय जाधव, बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव कार्याध्यक्ष सुनील जाधव, यांच्या शुभहस्ते मुहूर्तमेढ …

Read More »

पावसाची संततधार सुरूच; उद्याही बेळगाव जिल्ह्यातील शाळा, कॉलेजला सुट्टी

  बेळगाव : आज बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरूच असलेल्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व सरकारी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसेच अंगणवाड्या आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना उद्या बुधवार दि. 20 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तसा आदेश बजावला आहे. सदर आदेशाचे …

Read More »

येळ्ळूर येथील श्री कलमेश्वर मंदिर कळस स्लॅब भरणी कार्यक्रम उत्साहात

  बेळगाव : कलमेश्वर गल्ली, येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील श्री कलमेश्वर मंदिर जिर्णोद्धार कमिटीतर्फे आयोजित श्री कलमेश्वर मंदिर कळस स्लॅब भरणी शुभारंभ कार्यक्रम काल रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. येळ्ळूरचे माजी जि. पं. सदस्य रमेश परशराम गोरल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून येळ्ळूर ग्रा. पं. सदस्या …

Read More »