Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

येळ्ळूर ग्राम पंचायतचे विविध सरकारी कार्यालयाना निवेदन सादर

बेळगाव : येत्या 25, 26, 27, 28 एप्रिल रोजी होत असलेल्या येळ्ळूर चांगळेश्वरी व कलमेश्वर, यात्रेसाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस सीपीआय श्रीनिवास हंडा यांना तसेच विविध सरकारी कार्यालयाना येळ्ळूर ग्राम पंचायतीच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. येळ्ळूर यात्रा गेली दोन वर्षे कोरोनामुळे झाली नव्हती. यावर्षी यात्रा होत असून ती मोठ्या उत्साहात …

Read More »

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; मन्नोळकरांनी घेतली होती घराची जीपी

बेळगाव : कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. हिंडलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी पाटील यांच्या घराची जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी घेतली होती असे तपासात पुढे आले आहे. मंत्री ईश्वरप्पा यांचा राजकीय बळी घेतलेल्या कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या …

Read More »

कुसनाळला घराचे नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत

अथणी : वादळी पावसामुळे घरावर झाडे पडून व पत्रे नुकसान झालेल्या कुसनाळ (ता. कागवाड) येथील पाच जणांना आर्थिक मदत दिली. श्रीमंत पाटील फाऊंडेशनच्यावतीने कागवाडचे आमदार व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी प्रत्येकाकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. कागवाड मतदारसंघातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. अनेक घरांवर झाडे पडून व …

Read More »

कुसनाळला मूलभूत सुविधांसाठी 10 कोटी

अथणी : कृष्णा नदीला महापुरानंतर बुडणार्‍या कुसनाळ गावचे स्थलांतर केले आहे. येथील मूलभूत सुविधांसाठी 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून, कामाला प्रारंभ झाला. याचा शुभारंभ कागवाडचे आ. व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कृष्णा नदीला महापूर आल्यानंतर बुडणारे कुसनाळ गावचे स्थलांतर व्हावे, अशी अपेक्षा आ. श्रीमंत …

Read More »

आता सतीश जारकीहोळी यांच्या नावाला कलंक फासण्याचा प्रयत्न

बेळगाव : बंधू रमेश जारकीहोळी यांच्या अश्लील सीडी प्रकरणानंतर आता केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांच्या नावाला कलंक फासण्याचा प्रयत्न झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सतीश जारकीहोळी यांच्या नावानं पॉर्न साईटवर अश्लील व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अश्लील वेबसाईटवर सतीश जारकीहोळी यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न …

Read More »

शांता शेळके जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून बाग परिवाराचा स्तुत्य कार्यक्रम

बेळगाव : बेळगावच्या बाग परिवाराचा काव्य वाचनाचा बहारदार कार्यक्रम रामदेव गल्लीतील गिरिश कॉम्प्लेक्सच्या भगतसिंग हॉलमध्ये मोठ्या उत्साहाने पार पडला. निमीत्त होते जेष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे! शांता शेळकेंच्या विपुल साहित्या पैकी काही निवडक गिते, कविता आणि ललित लेख अशा साहित्याचे सादरीकरण बाग परिवारातील कवींनी करुन मनमुराद आस्वाद घेतला …

Read More »

बेळगावात जायंट्स भवनासाठी भरीव मदत करू

आमदार अभय पाटील यांचे आश्वासन बेळगाव : बेळगावातील सामाजिक कार्यात जायंट्स सेवाभावी संस्थेने आपले वेगळेपण जपले आहे. संस्थेच्या वाटचालीला माझ्या नेहमीच शुभेच्छा आहेत. बेळगावातील जायंट्स भवनासाठी आमदार फंडातून भरीव मदत करू, असे आश्वासन आमदार अभय पाटील यांनी दिले आहे. जायंट्स ग्रुप बेळगाव मेन नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी संपन्न झाला. …

Read More »

वाचन लेखनाचे संस्कार विद्यार्थ्यांसह समाजात बिंबवणे गरजेचे : प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील

द. म. शिक्षण मंडळ , बी. के, ज्योती, बीबीए, बीसीए, जेसीए महाविद्यालयाचा पाठिंबा बेळगाव : मराठी भाषा आणि मराठी अस्मिता ही प्रत्येक आपलीच मक्तेदारी नसून देशातील प्रत्येकाने मराठी भाषा मराठी अस्मिता जपायला हवी हे गव प्रत्येकाने आपलं कर्तव्य नीटपणे सांभाळायला हवे आहे. भारतात विविधता आहे त्यामुळे अनेक भाषा बोलल्या जातात …

Read More »

संतोषच्या कुटुंबियांना काँग्रेस पक्षाकडून सोळा लाखाची आर्थिक मदत

बेळगाव : कंत्राटदार संतोष पाटील यांच्या मृत्युच्या प्रकरणाला उधाण आले आहे. याबाबत पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असतानाच आज केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि काँग्रेसच्या इतर नेते मंडळांनी मयत संतोष पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. मृत संतोषच्या आत्महत्येप्रकरणी उडुपी पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत …

Read More »

अंगारकी संकष्टी शहरात उत्साहात साजरी

बेलगाव : अंगारकी चतुर्थी निमित्त आज शहर परिसरातील गणेश मंदिरांमध्ये गणेशाची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच मंदिराला आकर्षक आरास करण्यात आली आहे. सकाळपासूनच गणेशाचे दर्शन घेण्याकरिता भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली असून मंदिरात मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत. शहरातील चन्नम्मा सर्कल, हिंडलगा गणपती, कपिलेश्वर मंदिरातील गणेश मंदिर यासह अनेक गणेश …

Read More »