Friday , December 19 2025
Breaking News

बेळगाव

कुख्यात डॉन बनंजे राजासह चौघांना जन्मठेप

बेळगाव कोका न्यायालयाचा निर्णय बेळगाव : कुख्यात डॉन बनंजे राजा याला अंकोल्याचे उद्योजक अन भाजप नेते आर. एन. नायक यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेळगाव येथील कोका न्यायालयाने आज ही शिक्षा सुनावली. ३ कोटी रुपयांची सुपारी घेऊन उद्योजक आर. एन. नायक यांची २१ डिसेंबर २०१३ रोजी हत्या करण्यात …

Read More »

धावत्या कारने घेतला अचानक पेट

बेळगाव : धावत्या कारने अचानक पेट घेतल्याचा प्रसंग आज चन्नम्मा सर्कल जवळील संगोळी रायान्ना मार्गावर घडला. यावेळी अचानक कारमधून धूर निघाल्याने रस्त्यावर असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी मोठा अनर्थ घडू नये याकरिता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सदर घटना आज सकाळी दहाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली …

Read More »

मराठा समाजात विवाह वेळेवर होण्याबाबत प्राधान्य द्यावे : प्रकाश मरगाळे

बेळगांव : मराठा समाजात आता विवाह वेळेवर होण्याबरोबर इच्छूक मुलींनीही नोकरीवाल्याबरोबर व्यावसायिक मुलांना प्राधान्य द्यावे, असे मत अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले. गोवावेस येथील मराठा मंदिर येथे मराठा समाज सुधारणा मंडळ आयोजित वधू-वर सूचक मेळाव्यात ते बोलत होते. प्रारंभी मंडळाचे हितचिंतक शंकरराव पाटील यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. …

Read More »

समर्थ नगर येथील श्री दुर्गाशक्ती महिला मंडळाकडून नववर्षाचे उत्साहात स्वागत

बेळगाव : समर्थ नगर येथील एकदंत युवक मंडळ संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर यांच्यावतीने लहान मुला-मुलींसाठी पारंपारिक वेशभूषा करून ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र, छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यावर आधारित प्रश्न मंजुषा, तसेच निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी समर्थ नगरमधील ज्येष्ठ नागरिक …

Read More »

नावगे येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व राष्ट्रीय स्पोर्ट्स क्लब नावगे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना धनंजय जाधव म्हणाले, आज-काल मोबाईल युगामुळे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा गावपातळीवर तरुणांनी …

Read More »

काकडे फौंडेशनतर्फे रांगोळी आर्टिस्ट अजित औरवाडकरांचा सत्कार

बेळगाव : आझादी का अमृतमहोत्सव आणि काकडे फौंडेशनच्या सातव्या वर्धापनानिमित्त गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बेळगावातील सुप्रसिद्ध रांगोळी आर्टिस्ट श्री. अजित महादेव औरवाडकरांचा सत्कार करण्यात आला. रांगोळी या हिंदुस्थानच्या पारंपरिक कलेच्या माध्यमातून विविध कलाकृती रेखाटणारे अजित औरवाडकरजी सर्वांना परीचीत आहेत.काकडे फौंडेशनच्यावतीने सौ. उज्वला काकडे, किशोर काकडे यांनी शाल-भेटवस्तू-पुष्प, सत्कारमुर्तिंचे छायाचित्र असलेले स्मृती पर्ण, …

Read More »

रणकुंडये येथे घरात घुसून एकाचा खून

बेळगाव : दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी घरावर हल्ला करून तोडफोड करत एकावर धारधार शस्त्राने हल्ला करत खून केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील रणकुंडये येथे घडली आहे. शनिवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास झालेल्या या घटनेमध्ये रणकुंडये गाव हादरले आहे. नागेश भाऊसाहेब पाटील वय 32 असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून …

Read More »

मंडोळी येथे विविध देवस्थान निर्मिती कामकाजाचा शुभारंभ

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मंडोळी या गावात 1 कोटी 50 लाख रुपयांच्या खर्चातून विविध देवस्थान जीर्णोद्धार कामकाजाचा भूमिपूजन समारंभ आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते नुकताच पार पडला. मंडोळी गावात असलेल्या पुरातन देवस्थानांच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील भाजप सरकारप्रमाणेच ग्रामीण भागाच्या विकासाचा पण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतला आहे. भाजप …

Read More »

मुतगे येथे 10 रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान

बेळगाव : मुतगे (ता. जि. बेळगाव) येथे श्री हनुमान यात्रेनिमित्त श्री हनुमान कुस्ती कमिटी, गाव सुधारणा मंडळ ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने रविवार दि. 10 एप्रिल रोजी दुपारी 2 वा. जक्कन तलाव येथे जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. सदर कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. भोलु पंजाब (पंजाब केसरी) …

Read More »

कोरे गल्लीत आज शिवचरित्र पोवाडा

बेळगाव : कोरे गल्ली शहापूर येथील सन्मित्र साप्ताहिक वार्षिक मंडळातर्फे आज रविवार दि. 3 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता झी युवा संगीत सम्राट फिल्म युवा शाहीर रामानंद उगले यांचा ‘शिवचरित्र पोवाडा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कोरे गल्ली शहापूर येथील श्री गंगापुरी महाराज मठ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …

Read More »