Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव

कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार शक्य

मुख्यमंत्री बोम्मई, कार्यकारिणीच्या बैठकीला नड्डांची उपस्थिती बंगळूर : कर्नाटकमध्ये 16 आणि 17 एप्रिल रोजी होत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मात्र, नव्या मंत्र्यांच्या नियुक्तीची तारीख निश्चित झालेली नाही. मुख्यमंत्री बोम्मई यांनी आपल्या दिल्ली भेटीदरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा …

Read More »

मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाची रविवारी बैठक

बेळगाव : मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाची बैठक रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी बोलावण्यात आली आहे. बेळगावच्या पारंपरिक शिवजयंती उत्सव आला संपूर्ण देशात एक महत्त्व आहे पण कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवजयंती उत्सवानिमित्त निघणाऱ्या चित्ररथ मिरवणुक खंडित पडली होती पण आता जनजीवन पूर्वपदावर आल्याने शिवप्रेमी उत्साह संचारला आहे. रामलिंग खिंड गल्ली …

Read More »

माजी नगरसेवक नेताजी मणगुतकर यांचे निधन

बेळगाव : भारतनगर शहापूर येथील रहिवासी आणि बेळगावचे माजी नगरसेवक श्री. नेताजी (बाळू) अप्पाजी मनगुतकर (52) यांचे रात्री 1 वाजता हृदयविकराच्या तीव्र धक्याने निधन झाले आहे. तिरंगा सेवा संघटनेच्या माध्यमातून विविध प्रकारची सामाजिक कार्ये हाती घेऊन, नेताजी मनगुतकर यांनी खासबाग, वडगाव, भारत नगर परिसरात स्वतःची ओळख निर्माण केली होती. महाराष्ट्र …

Read More »

अँजेल फाऊंडेशनकडून अंगणवाडी शिक्षिकांना प्रोत्साहन

बेळगाव : स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना काळामध्ये जनतेची उत्तम सेवा केल्याबद्दल कोरोना फ्रंट लाईन वारीयर्स ठरलेल्या अंगणवाडीच्या महिला शिक्षकांचा सत्कार करत महिला शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य अँजेल फाऊंडेशन केला आहे. बेळगावमधील रामनगर आणि विजयनगर भागातल्या अंगणवाडी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी अँजेल फाऊंडेशनच्या अध्यक्षा मीना अनिल बेनके, सचिव मिलन …

Read More »

बेळगाव-आंबोली रस्त्याबाबत आमदार द्वयींनी घेतली नितीन गडकरी यांची भेट

बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांना बेळगाव आणि चंदगड ते आंबोलीच्या रस्त्याबाबत एक निवेदन सादर करत मोठी मागणी केली आहे. बेळगाव ते सूळगा, बाची चंदगड ते आंबोली या 127 किलोमीटर रस्त्याचा नवीन राष्ट्रीय महामार्ग इंटर कॉरिडॉर रूट …

Read More »

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची बेळगाव आर. एस. एस. कार्यालयाला भेट

बेळगाव : बेळगाव येथे एका खासगी समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आले असता कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी बेळगाव येथील आर. एस. एस. मुख्यालयाला भेट दिली. या प्रसंगी त्यांनी कार्यालयाला भेट देऊन स्थानिक आर. एस. एस. पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना त्यांनी आपण कोणत्याही गावाला गेलो की …

Read More »

महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या

बेळगाव : गणेशपूर येथे रात्री ३ च्या सुमारास डॉक्टर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भारती उपेंद्र यलगुद्री (वय ४७) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. सदर महिलेने आपल्या मुलाने अभ्यास केला नसल्याने रागाच्याभरात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. भारती यांनी गळ्याला फास आवळून आत्महत्या केल्याचे तिच्या …

Read More »

बेळगावच्या निरंजन श्रीनिवास कारगी याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद!

बेळगाव : बेळगावच्या निरंजन श्रीनिवास कारगी याची पोर्टेबल वॉटर फिल्टर बनविणारा देशातील सर्वात तरुण संशोधक म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ‘निरनल’ हे सहज हाताळण्याजोगे जलशुद्धीकरण उपकरण (वॉटर फिल्टर) भारतातील सुरक्षित पिण्याचे पाणी संकल्पनेत क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची शक्यता आहे. बेस्ट लीडर पुरस्कार मिळवणारा निरंजन आता पुढील वर्षापर्यंत …

Read More »

लाच प्रकरणी एसडीसीवर कारवाई

बेळगाव : दहावीच्या मार्क्स कार्डमध्ये नावात दुरुस्ती करून देतो असे सांगत बाराशे रुपयांची लाच मागणार्‍या सौंदत्ती तालुका गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचा क्लार्क वेंकरेड्डी हनुमरेड्डी नगली याला एसीबीने रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे. सौंदत्ती तालुक्यातील हिरेबुधनूर गावच्या मारुती गौडा पाटील आणि त्यांचे मित्र दोघांनी मिळून एसएसएलसीच्या गुणपत्रिकेमध्ये चुकलेले नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्ज …

Read More »

मंदिरांच्या विकासासंदर्भात पर्यटन मंत्र्यांची आम. बेनके यांनी घेतली भेट

बेळगाव : बेळगावचे आमदार अ‍ॅड. अनिल बेनके यांनी आज बुधवारी सकाळी भारत सरकारच्या पर्यटन आणि बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन बेळगाव परिसरातील मंदिरांचा विकास आणि जीर्णोद्धारासाठी पर्यटन खात्याकडून 500 लाख (5 कोटी) रुपयांचा निधी मंजूर करण्याची विनंती केली. बेळगाव परिसरातील 4 …

Read More »