Thursday , June 4 2026
Breaking News

बेळगाव

केएसआरपी पोलीस कॉन्स्टेबल टास्क फोर्सचा शपथविधी सोहळा दिमाखात

बेळगाव : कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचा हा विभाग अत्यंत शिस्तबद्ध विभाग आहे. अतिशय मजबूत अशा या पोलीस यंत्रणेत कर्तव्य बजावताना जात, पंथ, धर्म आड येता कामा नये. सर्वांनी दृढ संकल्पासह कर्तव्याचे पालन करावे, असे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. हितेंद्र यांनी केले. बेळगावातील कंग्राळी खुर्दनजिकच्या कर्नाटक राज्य राखीव …

Read More »

बेळगावात हिंदू जनजागरण समितीची दिंडीयात्रा

बेळगाव : सनातन संस्थेचे संस्थापक गुरू डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मदिनानिमित्त बेळगावात आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने भव्य हिंदु एकता दिंडी यात्रा काढण्यात आली. सोमवारी सायंकाळी बेळगावातील शहापूरातील बॅ. नाथ पै सर्कलपासून कपिलेश्वर मंदिरापर्यंत हिंदू राष्ट्र एकता दिंडी यात्रा काढण्यात आली. सजवलेल्या वाहनात सनातन संस्थेचे संस्थापक गुरू डॉ. जयंत आठवले …

Read More »

हलगा ग्राम पंचायत अध्यक्षपदी सदानंद बिळगोजी यांची निवड

बेळगाव : हालगा (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षपदी सदानंद बसवंत बिळगोजी यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड जाहीर होताच बिळगोजी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होण्याबरोबरच समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. हालगा ग्रामपंचायत नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सदानंद बसवंत बेळगोजी यांचा श्री धर्मराज मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्यावतीने उत्स्फूर्त सत्कार करण्यात …

Read More »

हुतात्मा अभिवादनासंदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन

बेळगाव : हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी येत्या बुधवार दि. 1 जून रोजी आयोजित हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन कार्यक्रमाची कल्पना देणारे निवेदन त्यांना सादर केले. सालाबादप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या बुधवारी 1 जून रोजी सकाळी …

Read More »

बेळगावमध्ये राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा 25 मेपासून

बेळगाव : केएलई विद्यापीठ, कर्नाटक राज्य जलतरण संघटना (केएसए) आणि स्थानिक स्विमर्स क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दि. 25 ते 29 मे 2022 या कालावधीमध्ये एनआरजे केएलई विद्यापीठ राज्यस्तरीय उपकनिष्ठ आणि कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद -2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्पर्धेचे समन्वयक उमेश कलघटगी यांनी दिली …

Read More »

डॉ. प्रभाकर कोरे यांना अमेरिकेत जीवनगौरव प्रदान

बेळगाव : केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित इंडो-अमेरिकन प्रेस क्लबने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. न्यूयॉर्क येथे शनिवारी झालेल्या विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. उत्तर कर्नाटकात व महाराष्ट्रात विशेष करून ग्रामीण भागात सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण आणि किफायतशीर आरोग्य सुविधा देत समाज आणि राष्ट्र …

Read More »

कोल्हापूर- बंगळूर बसचा हुबळीजवळ भीषण अपघात, ८ ठार, २८ जखमी

बेळगाव : कोल्हापूरहून बंगळूरकडे जाणारी खासगी बस आणि तांदूळ वाहून नेणारा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन 8 जण ठार झाले आहेत. मध्यरात्री 12 च्या सुमारास हुबळी जवळ तारीहाल क्रॉस नामक फाट्याजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये ट्रक चालक, वाहक तसेच आणखी एकटा आणि बसमधील चार प्रवाशांचा समावेश आहे. बाबासाब (55, चिकोडी), …

Read More »

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची अतिवृष्टी झालेल्या गावांना भेट

नदी प्रवाह, पूर व्यवस्थापन तयारीची पाहणी बेळगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कृष्णा नदीला आलेल्या पुराचा फटका बसलेल्या चिकोडी व कागवाड तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी चिक्कोडी येथून मांजरी पुलाला भेट दिली आणि नुकत्याच झालेल्या पावसामुळे कृष्णा नदीतील पाण्याचा प्रवाहाची माहिती घेतली. यडूर, कागवाड …

Read More »

भरतेशच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

बेळगाव : येथील डी. वाय. चौगुले भरतेश स्कूलच्या 1997 साली दहावी पास झालेल्या मराठी माध्यम विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कार्यक्रम गेल्या रविवारी तिळकवाडी येथील हॉटेल बॅक बेंचर्समध्ये संपन्न झाला. 1997 सालचे विद्यार्थी ज्ञानदान केलेले शिक्षक सर्वश्री के. एल. दिवटे, बी. एल. सायनेकर, विजय परांजपे, ए. व्ही. चौगुले, अनंत लाड व एम. टी. …

Read More »

हुतात्मा दिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे तालुका समितीच्या बैठकीत निर्धार

बेळगाव : 1986 च्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी येत्या 1 जून 2022 रोजी आयोजित कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबरोबरच या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी विभागवार गावोगावी बैठका घेण्याचा निर्णय आज झालेल्या बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. येत्या 1 जून रोजी कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली …

Read More »