Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगाव

मागणी पूर्ण न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा समितीचा इशारा

बेळगाव : बेळगावातील सरकारी कार्यालये, आस्थापने, बसेस आदी ठिकाणी कन्नड, इंग्लिशसोबतच मराठी भाषेतही नामफलक लावण्याची मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. १५ दिवसांत ही मागणी पूर्ण न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याआधी बेळगावात कन्नड, मराठी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेतील नामफलक आढळून येत होते. …

Read More »

सीमाप्रश्न त्वरित निकालात काढा

खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांची भेट खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने माजी आमदार व अध्यक्ष दिगंबरराव यशवंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते मंडळींची भेट घेऊन कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्न व्यवहार्य तोडगा काढून निकालात काढावा अशी मागणी केली. या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष …

Read More »

अरबाज खून प्रकरणी 10 जण ताब्यात

खानापूर : खानापूर येथे घडलेल्या अरबाज खून प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखानी दहा जणांना अटक केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.त्या प्रकरणात चाळीसहून अधिक जणांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान 10 जणांनाअटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख यांनी दिली आहे.अरबाज खून प्रकरण …

Read More »

श्रीराम कॉलनीत आम. अभय पाटील यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांना प्रारंभ

बेळगाव : आज गुरुवारी महालक्ष्मी सोसायटी व श्रीराम कॉलनी, आदर्श नगर परिसरात विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून सदर परिसरात विविधकामांना मंजुरी मिळाली आहे. गोपाल मिरजकर, विनय बेहरे, प्रदीप जोशी, डॉ. मृगेन्द पट्टणशेटी व इतर उपस्थित मंडळींच्या हस्ते श्रीफळ वाढवून विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आम. …

Read More »

यल्लम्मा देवी यात्रेस परवानगी द्यावी : कोल्हापूर जिल्हा रिक्षा सेनेची मागणी

बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीची यात्रा मंगळवार दि. 19 ऑक्टोबर रोजी होत असून यादिवशी प्रशासनाने कोरोना नियमांच्या चौकटीत सौंदत्ती येथील यल्लम्मा देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करून घ्यावे तसेच यात्रेस अनुमती द्यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिवसेना रिक्षासेनेच्यावतीने करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा शिवसेना रिक्षासेना प्रमुख राजेंद्र शंकरराव जाधव यांनी …

Read More »

शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांची बेळगावला धावती भेट

शिवसेना बळकटी संदर्भात दिल्या सल्ला-सूचना बेळगाव : कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख आणि मुंबई बेस्टचे माजी चेअरमन अरुण दुधवाडकर यांनी आज बेळगावला धावती भेट दिली. मुंबईहून विमानाने बेळगावला दाखल झालेल्या अरुण दुधवाडकर यांचे बेळगाव विमानतळावर बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अरुण दुधवाडकर …

Read More »

दसरा आणि दिवाळी निमित्ताने स्पेशल रेल्वेची बेळगाव सिटीझन फोरमतर्फे मागणी

बेळगाव : बेळगाव सिटीझन फोरमतर्फे आज अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव रेल्वे स्टेशनचे नवनियुक्त स्टेशन व्यवस्थापक पी. नागराज यांची भेट घेण्यात आली. त्यांच्याकडे दसरा आणि दिवाळी सणांच्या निमित्ताने स्पेशल रेल्वे सेवांची मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालय आणि जीएम एसडब्ल्यूआर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. दसरा …

Read More »

बडाल अंकलगी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 35 लाखाची मदत

बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बडाल अंकलगी (ता. बेळगाव) येथील घर कोसळून मयत झालेल्या कुटुंबातील भिमाप्पा खनगावी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण करून त्यांचे सांत्वन करण्याबरोबरच प्रत्येक मृतासाठी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करताना आज गुरुवारी सकाळी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सहा मृतांसाठी …

Read More »

बेळगावात दुर्गामाता दौडला शानदार प्रारंभ

बेळगाव : बेळगावात नवरात्रौत्सव आणि दुर्गामाता दौड यांचं अतूट नातं आहे. हीच परंपरा कायम ठेवत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गामाता दौडला शानदार प्रारंभ करण्यात आला. दुर्गामाता दौडचे बेळगावातील हे 25वे रौप्यमहोत्सवी वर्ष. देश आणि धर्माच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी दरवर्षी नवरात्रीतील 9 दिवस बेळगाव आणि परिसरातील अनेक गावात …

Read More »

शेतकरी नेते व ज्येष्ठ पत्रकार कल्याणराव मुचळंबी यांच्यावर अंत्यसंस्कार

बेळगाव : बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार आणि शेतकरी कार्यकर्ते कल्याणराव मुचळंबी यांच्यावर शेकडो जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी गोकाक तालुक्यातील सावळगी येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या कल्याणराव मुचळंबी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बेळगावच्या अंजनेय नगर येथील निवासस्थानी व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी दुपारी सजविलेल्या वाहनातून मुचळंबी यांची अंतिम यात्रा …

Read More »