Sunday , June 7 2026
Breaking News

महाराष्ट्र

शेअर बाजाराचे ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

  मुंबई : भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे ‘किंग’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांना मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित …

Read More »

मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला; शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

  मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात …

Read More »

कोल्हापुरातील 303 फूट उंच राष्ट्रध्वजाला पोलीस दलाकडून सलामी

  कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया : मंत्री चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूर (जिमाका) : पर्यटन क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कोल्हापूर येथील पोलीस उद्यानात उभारण्यात आलेला देशात आणि राज्यात आकर्षण ठरलेला 303 फूट उंचावरील राष्ट्रध्वज आज …

Read More »

कडलगे बुद्रूक येथे हर घर झेंडा उपक्रमांतर्गत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न…

  चंदगड : कडलगे बुद्रूक येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे आज पहिल्या दिवशी 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 07.30 वा. देशाच्या सैनिकांच्या सन्मानार्थ गावातील ज्येष्ठ माजी सैनिक श्री. लक्ष्मण रवळू पाटील व श्री. सटूप्पा व्हळ्याप्पा कांबळे या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम साठी लोकनियुक्त सरपंच सुधीर गिरी, उपसरपंच सौ. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आक्रमक; शिवसैनिकांचीही धरपकड

  कोल्हापूर : मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौर्‍यावर आहेत. दरम्यान, त्यांच्या दौर्‍याला ठाकरे गटाकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करत होते. शिवसैनिक या ठिकाणी जमू लागल्यानंतर पोलिसांनी संजय पवार यांच्यासह काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौर्‍यात …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर मान्यवरांकडून स्वागत

  कोल्हापूर (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांचे स्वागत …

Read More »

वैष्णवी कदम वत्कृत्वमध्ये चंदगड तालुक्यात प्रथम

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमाअंतर्गत चंदगड पंचायत समिती व शिक्षण विभाग यांच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चंदगड तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) ची इयत्ता ८वीची विद्यार्थिनी कु. वैष्णवी युवराज कदम हिने प्रथम क्रमांक मिळवला. विशेष …

Read More »

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे

  आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपने त्यांच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली असून चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपने ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. आशिष शेलार हे या …

Read More »

पंचगंगेची पाणी पातळी स्थिर असल्याने दिलासा

  कोल्हापूर : गेल्या 48 तासांमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगेची पातळी स्थिर असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळी 11 वाजता राजाराम बंधार्‍यावर पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फूट 7 इंच होती. गेल्या 24 तासात पासून पंचगंगेची पातळी स्थिर आहे. जिल्ह्यातील 76 बंधारे पाण्याखाली …

Read More »

माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल : पंकजा मुंडे

  मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये एकाही महिला आमदाराला स्थान न देण्यात आल्यामुळे शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे अनेकजण नाराज असल्याचेही समोर आले आहे. त्यातच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात …

Read More »