Sunday , September 8 2024
Breaking News

ऐकावं ते इपरितच; चंदगड तालुक्यात म्हैसीने दिला वासराला जन्म

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : या जगात काय घडेल हे सांगता येत नाही. काल बाई म्या नवल ऐकीले, पाण्याला मोठी लागली तहान, बकऱ्या पुढे बाई देवच कापिला, या एकनाथ महाराजांच्या भारूडाची आठवण आज चंदगडवासीयाना आली. चक्क म्हैसीने वासरालाच जन्म दिल्याने ऐकावं ते नवलचं ठरलेल्या या घटनेची जोरदार चर्चा चंदगड तालुक्यात चालू आहे.
म्हैशीच्या पोटी वासरू (गायीचे पिल्लू) जन्माला आल्याचा अद्भुत चमत्कार चंदगड तालुक्यातील तावरेवाडी गावात घडला आहे.
तावरेवाडी गावचे पहिले सरपंच मारुती गंगाराम कागणकर यांचा लहान मुलगा परशराम कागणकर यांच्याकडे पंचकल्यानी जातीची म्हैस आहे. त्या म्हैशीच्या पोटी जन्माला आलेले पिल्लू हे गायीच्या वासरासारखे दिसून येते. या म्हैशीला प्रजननासाठी लसीकरण करण्यात आले होते अशी माहिती म्हैस मालक परशराम कागणकर यांनी सांगितली. हा एक अद्भुत चमत्कार झाला असून परिसरातील लोक बघण्यासाठी गर्दी करत आहेत. कदाचित गायीची लस चूकीने म्हैसीला दिली गेली असल्याने असा प्रकार घडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनची बैठक संपन्न

Spread the love  चंदगड : चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनच्या वतीने आज बैठक तांबुळवाडी कार्यालयामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *