तेऊरवाडी (वार्ताहर) : सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तेऊरवाडीतील (ता. चंदगड) येथील वैभव जनार्दन पाटील यांची जर्मनीतील सिमेन्स हैत्थनेस कंपनीमध्ये कॉम्प्यूटर इंजिनियर म्हणून निवड झाली. त्यामुळे तेऊरवाडीचे नाव सातासमुद्र पार पोहचले.
येथील निवृत्त सहाय्यक फौजदार जे. एम. पाटील यांचा वैभव हा मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे. गेल्या अनेक वर्षापासून वैभव बंगलोरला कार्यरत होते. तेथून त्यांची निवड जर्मनीला झाली. जर्मनीला त्यांच्या सोबत त्यांची पत्नी सौ. संपदा (एम.बी.ए) व मुलगी शांभवी रवाना झाले. त्यांना तेऊरवाडी ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या. वैभवच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta