Sunday , April 19 2026
Breaking News

चंदगड तालुका शिक्षक परिषदेने शिक्षक, शेतकरी व व्यापारी यांच्या प्रश्नांना फोडली वाचा

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : माध्यमिक शिक्षक, विद्यार्थी, पालक व पुरग्रस्त शेतकरी, व्यापारी यांच्या विविध मागण्यांचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मार्फत चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे देण्यात आले.
कोरोना काळात मृत्यूमुखी पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्याविषयी सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा. कोरोनाचे सर्व नियमांना अधिन राहून विनाविलंब शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी. गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी शासनाने स्मार्टफोन व रिचार्चचा खर्च द्यावा. पूरग्रस्त, भूस्खलन भागातील विद्यार्थाची शैक्षणिक फी माफ व्हावी. पूरग्रस्त शेतकरी, व्यापारी यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. मागील वर्षीची कर्जासाठी शेतकर्‍यांना सरसकट पन्नास हजाराची जाहिर केलेली रक्कम त्वरीत मिळावी. शिक्षकांना अशैक्षणिक कामातून सूट मिळावी. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या रिक्त जागा शासनाच्या नियमानुसार त्वरीत भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍याची कोविड-19 ची बिले त्वरीत मंजूर होऊन मिळावी. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची जूनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकेत्तर कर्मचारी भरती, कोरोना कामगिरीवर असताना विमा सरंक्षण, विना अनुदान शाळांना अनुदान मिळणे, संगणक शिक्षकांना सेवेत सामावून घेणे, ग्रंथपालांच्या मागण्या, सातवा वेतन आयोग थकलेला हप्ता देणे, अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची मुक्तता, कॅशलेश व आरोग्य विमा लागू करणे इ. 32 मागण्यांचे निवेदन संघटनेमार्फत चंदगड तहसिलदार कार्यालयात देण्यात आले.
माध्यमिक शिक्षक व शेतकर्‍यांचे प्रश्न परिषदेमार्फत पोटतिडकीने मांडण्यात आले. यावेळी प्राचार्य आर. आय. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष टी. एल. तेरणीकर परिषदेचे अध्यक्ष टी. टी. बेरडे, उपाध्यक्ष मनोहर भुजबळ, एम. एन. शिवणगेकर, सचिव संजय साबळे, खजिनदार पी. वाय. पाटील, सुभाष बांदिवडेकर, सुरेश हरेर, डी. जी. पाटील, एन. डी. देवळे, व्ही. जी. पाटील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार दिनी कु. अवनी अर्जुन जाधवचा “कला रत्न” पुरस्कार देऊन सन्मानित

Spread the love  ठाणे : सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *