Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

वर्‍हाडींवर काळाचा घाला : बस दरी कोसळून 14 ठार

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये आज (दि. 22) पहाटे मोठी दुर्घटना घडली. वर्‍हाडाची बस दरी कोसळून 14 जण ठार झाले. चंपावतपासून 65 किलोमीटरवर हा अपघात झाला. घटनास्थळी आपत्तकालीन पथकासह पोलिस पोहचले. आतापर्यंत दरीतून 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दोन गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ककनई येथील लक्ष्मण सिंह …

Read More »

डी. के. शिवकुमारांच्या आरोपावर गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांचा संताप

बेंगळुर : कायदा व सुव्यवस्था ढासळल्यानेच शिमोग्यात हर्ष या कार्यकर्त्याची हत्या झाली, या डी. के. शिवकुमार यांच्या आरोपावर गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र चांगलेच भडकले. त्यांच्या सत्ता काळात अशी कोणती घटना घडली नव्हती हे त्यांनी छातीठोकपणे सांगावे असे आव्हानच त्यांनी शिवकुमारांना दिले. बंगळुरात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले, शिवकुमारांसारख्या ज्येष्ठ …

Read More »

भूतबाधा, करणीसाठी उतारे टाकणार्‍यांवर कारवाई करा

दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन : नगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : भारतीय संस्कृती ही जुनी संस्कृती असून यामध्ये अनेक चांगल्या-वाईट प्रथांचा समावेश आहे. काही प्रथा परंपरा या कालपरत्वे बदलल्या आहेत. मात्र काही पपरंपरा अशा आहेत, ज्या त्यामागील भीतीपोटी अजूनही समाजात तग धरून आहेत. अशा परिस्थितीत निपाणी शहरातील विविध मार्गावर …

Read More »

अशोभनीय वक्तव्य करणार्‍या मंत्र्यावर कारवाई करा

चिकोडी जिल्हा काँग्रेस : राज्यपालांना निवेदन निपाणी (वार्ता) : कर्नाटकातील भाजपा सरकारचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांचे राष्ट्रध्वज तिरंग्याच्या स्थानी भगवा ध्वज फडकाविण्याचे वक्तव्य भारतीय संविधानाचे आणि राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे आहे. त्यांच्यावर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन निपाणी व बेडकिहाळ भाग काँग्रेसच्या वतीने राज्यपालांना …

Read More »

कोगनोळी परिसरात तंबाखूचा चाकी कामाची लगबग

उत्पन्न कमी खर्च जास्त : दर चांगला मिळण्याची शेतकर्‍यांची अपेक्षा कोगनोळी : परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी, हदनाळ आदी परिसरात तंबाखूच्या चाकी कामाची लगबग सुरू आहे. या परिसरामध्ये बारमाही वाहणारी दूधगंगा नदी असल्याने व तंबाखू पिकाला खर्च जास्त व उत्पन्न कमी येत असल्याने शेतकरी अन्य पिकांकडे वळण्याची दिसून …

Read More »

खो-खो स्पर्धेत कडोली संघ विजेता

  उपविजेता चिरमुरी संघ बेळगाव : साधना क्रीडा केंद्र आणि नवज्योत खो- खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने खो-खो स्पर्धेचे आयोजन सुळगा (हि.) येथे रविवार दि. 20 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. एक गाव एक संघ मर्यादित ही स्पर्धा भरविण्यात आली होती. सदर स्पर्धेला बेळगाव परिसरातील एकूण दहा संघानी सहभाग घेतला होता. …

Read More »

मराठा एकता एक संघटन बेळगाव या सामाजिक संघटनेचा लोकार्पण सोहळा संपन्न

  बेळगाव : रविवार दिनांक 20/02/2022 रोजी श्रीक्षेत्र शिवतीर्थ राकस्कोप या ठिकाणी मराठा एकता एक संघटन बेळगाव या सामाजिक संघटनेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन भगवा ध्वज राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज व श्री गणेश पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन …

Read More »

खानापूर समितीचे ग्रहण अखेर सुटले!

माजी आमदार अरविंद पाटील भाजपवासी खानापूर : खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला. मराठी माणसांच्या मतांवर ज्यांनी आमदारकी भूषविली ते अरविंद पाटील आज वैयक्तिक स्वार्थासाठी राष्ट्रीय पक्षाच्या दावणीला बांधले जात आहेत ही बाब मराठी जनतेसाठी लाजिरवाणीच म्हणावी लागेल. मागील एक वर्षापासून अरविंद पाटील हे उघडपणे …

Read More »

पडलिहाळ पिकेपीएसतर्फे शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज द्या

रयत संघटनेची मागणी : सहकार उपनिबंधकांशी चर्चा निपाणी (वार्ता) : पडलिहाळ (ता.निपाणी) येथील पिकेपीएसला सन २०१३ साली ९०  लाखाची पत मंजूर झाली होती. त्यापैकी केवळ ५५ लाख रुपये पिक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना जानुन बुजुन कर्ज देण्यात आले नाही. २०१८-१९साली जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी पडलीहाळ पिकेपीएसला …

Read More »

बसगौडांचे त्याग वरदान ठरले : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी

संकेश्वर (प्रतिनिधी) : सहकार महर्षी दिवंगत बसगौडा पाटील यांचे त्यागमय जीवन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वरदान ठरल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ सहकारी नेते डी. टी. पाटील यांनी भूषविले होते. निडसोसी श्री जगद्गुरु दुरदुंडीश्वर शिक्षण संस्थेतर्फे सहकार महर्षी दिवंगत बसगौडा पाटील यांची तृतीय पुण्यतिथी तालुक्यातील शेकडो …

Read More »