Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

भावनेच्या भरात मतदान न करता उमेदवारांना ओळखूनच मतदान करा

नवनियुक्त सरकारने ठरवले की वास्को – लोंढा रेलमार्गाचे चौपदरीकरण कोणत्याही परिस्थितीत तडीस न्यायचेच गोवा: आज, दि. 14 रोजी गोव्याची विधानसभा निवडण्यासाठी आपले मत देणाऱ्या मतदात्यांसाठी. ते कोण आहेत… म्हणजे ते नीज गोंयकार आहेत की काल- परवा येऊन स्थायिक झालेले आहेत, ते जमीनधारक आहेत की रस्त्याकडेने गाडा उभारून ऑम्लेट पाव विकणारे, ते …

Read More »

पाणी समस्या उद्भवल्यास बांधून घालेन : आ. अभय पाटील यांचा एल अँड टी अधिकार्‍यांना इशारा

बेळगाव : बेळगाव शहरात कुठे जरी पाण्याची समस्या उद्भवली तर तुम्हाला बांधून घालून, ब्लॅक लिस्टमध्ये घालेन असा इशारा आ. अभय पाटील यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकार्‍यांना दिला. बेळगाव महानगर पालिकेने शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी एल अँड टी कंपनीला दिली आहे. मात्र त्या दिवसापासून शहरात पाण्याची समस्या वरचेवर निर्माण होत …

Read More »

सागरे व दोड्डेबैल यात्रोत्सवानिमित्त बस सेवा सुरू

खानापूर तालुका म. ए. युवा समितीच्या पाठपुराव्यास यश बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्यानंतर सागरे व दोड्डेबैल यात्रोत्सवानिमित्त सोमवारपासून बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सागरे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सोळा वर्षानंतर सागरे येथे लक्ष्मी देवीची यात्रा होणार असून यात्रा काळात भाविक मोठ्या संख्येने …

Read More »

आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयाची अज्ञातांकडून मोडतोड

बेळगाव : बेळगाव उत्तरचे भाजपचे आमदार अनिल बेनके यांच्या चव्हाट गल्ली येथील राजकीय कार्यालयावर रात्री अज्ञातांकडून मोडतोड करण्यात आली. त्यामुळे येथील घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. दगडफेक कोणी आणि कशामुळे केली हे अद्याप समजू शकले नाही. ज्या ठिकाणी आमदारांचे कार्यालय आहे ते ठिकाण शहरातील अतिसंवेदनशील भागांपैकी एक म्हणून ओळखले जाते. दगडफेकची …

Read More »

विधिमंडळ अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता; उद्यापासून १० दिवस चालणार

राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार सुरवात बंगळूर : कर्नाटक विधीमंडळाचे उद्या (ता.१४) पासून सुरू होणारे संयुक्त अधिवेशन सध्या सुरू असलेल्या हिजाब विवाद आणि संबंधित कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, कंत्राटदार संघटनेचे लाचखोरीचे आरोप आणि मेकेदाटू प्रकल्प अंमलबजावणीच्या मुद्द्यांमुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत चालणार्‍या १० दिवसांच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्या (ता.१४) राज्यपाल …

Read More »

राज्यातील हायस्कुल उद्यापासून सुरु : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

बेंगळुरू : राज्यातील हायस्कुल उद्यापासून सुरु करण्यात येणार आहेत. शाळा व्यवस्थापन समित्यांशी चर्चा करून कसलाही गोंधळ होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. हुबळी येथे रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, हायस्कुलचे वर्ग उद्यापासून भरविण्यात येणार आहेत. गोंधळ होऊ शकेल अशा शाळांबाबत शांतता …

Read More »

बेकवाडात रविवारी हरिनाम सप्ताहाची महाप्रसादाने सांगता

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही ४१ वा हरिनाम सप्ताहाची सांगता रविवारी दि. १३ रोजी महाप्रसादाने झाली. शुक्रवारी दि. ११ रोजी हभप शटवाप्पा पवार यांच्याहस्ते पोतीस्थापना होऊन सोहळ्याला प्रारंभ झाला. सायंकाळी प्रवचन, हरिजागर आदी कार्यक्रम झाले. शनिवारी दि. १२ रोजी पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, गाथा भजन, …

Read More »

योगामुळे जीवनशैलीत परिवर्तन होते : दीपक पानसरे

बेळगाव : दैनंदिन जीवनात नियमित योगअभ्यास व सूर्य नमस्कार केल्यामुळे जीवनशैलीत परिवर्तन होते तसेच अष्टांगयोगमुळे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यामुळे साधना शक्ती वाढते असे प्रतिपादन योग प्रशिक्षक दीपक पानसरे यांनी समन्वित आयोजित शिक्षकांच्या योग शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उद्गार काढले. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव …

Read More »

मुगूळ ओढ्यामध्ये आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह

बेळगाव : घुमटमाळ, हिंदवाडी येथील प्रज्वल बसवराज महांतशेट्टी या बेपत्ता झालेल्या 24 वर्षीय युवकाचा मृतदेह येळ्ळूर शिवाराच्या हद्दीतील मुगूळ ओढ्यामध्ये गुडघाभर पाण्यात आढळला आहे. बेळगाव शहरातील नामांकित डॉक्टर बसवराज सिद्धाप्पा महांतशेट्टी यांचा मुलगा प्रज्वल बसवराज महांतशेट्टी हा झाडशहापूर-मच्छे शिवार परिसरात बेपत्ता झाल्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली होती. …

Read More »

चालत्या आयशरला आग

कोगनोळी फाट्यावरील घटना कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर चालत्या आयशरला आग लागल्याची घटना रविवार तारीख 13 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातहून बेंगलोरला जात असलेल्या आयशर ट्रकला कोगनोळीजवळ असणाऱ्या दुधगंगा नदीजवळ अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी …

Read More »