बेळगाव : संपूर्ण खानापूर तालुक्यात उद्यापासून २ दिवस कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा पीएसआय बसनगौडा पाटील यांनी दिला आहे.
कोरोनाचा वाढत फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या आदेशान्वये शनिवार दि. २९ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते सोमवार दि. ३१ मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण खानापूर तालुक्यात कडक लॉकडाऊन जारी केला आहे. या काळात किराणा दुकान, बेकरीसह सर्व प्रकारची दुकाने बंद ठवण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. त्याशिवाय रस्त्यावर कोणीही अनावश्यक फिरू नये, विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा फौजदार बसनगौडा पाटील यांनी दिला आहे.