Thursday , March 5 2026
Breaking News

जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांचा तसेच जांबोटी भागातील नवनिर्वाचित ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षाचा सत्कार सोहळा नुकताच नुकताच पार पडला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलासराव बेळगांवकर होते. तर प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक गुणवंत पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व फोटो पूजनाने झाली.

यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन केलेल्याचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये बैलूरच्या ललिता गवस हिने अपंगाच्या आंतरराष्ट्रीय व्हील चेअर बास्केटबॉल स्पर्धेत भाग इंडोनेशिया येथे देशाचे प्रतिनिधित्व करत पदक मिळविल्याबदल, गोल्याळीचा सुभाष गुरव याने सी ए परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल, कबनाळीचा रघुनाथ होळंदकर याने राज्यस्तरीय हात पजा स्पर्धेत पदक मिळविल्याबदल, तसेच दहावीच्या परीक्षेत जांबोटी केंद्रात प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक मिळविल्याबदल व जांबोटी भागातील बैलूर, गोल्याळी, आमटे, कणकुंबी, पारवाड, जांबोटी, नलावडे, आदी ग्राम पंचायतीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षाचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना साहित्यिक गुणवंत पाटील म्हणाले की, जांबोटी सोसायटीने विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मान्यवरांचा सत्कार करून समाजापुढे एक आदर्श ठेवला.
त्याच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
संस्थेने असेच कार्य करून नावलौकीक मिळवावा. अशी सदिच्छा व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात संस्थापक चेअरमन विलास बेळगावकर म्हणाले की, तालुक्यात जांबोटी सारख्या मागासलेल्या भागात पहिली सोसायटी उभारताना मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत सोसायटीने चांगली प्रगती साधुन शाखा स्थापन केल्या. त्याची प्रगती चांगल्याप्रकारे आहे.
याचे खरे श्रेय संचालक, सभासद व कर्मचारी वर्गाचे आहे.
त्याचा सहकार्यामुळे आज सोसायटीची प्रगती झाली आहे. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील, सोसायटीचे व्हा. चेअरमन पुंडलिक नाकाडी, संचालक विद्यानंद बनोशी,एस आर कुडतरकर, मनोहर डांगे, पांडुरंग नाईक, यशवंत पाटील, शाहु गुरव, हणमंत काजुनेकर, खाचाप्पा काजुनेकर, सेक्रेटरी दिलीप हन्नुरकर, खानापूर शाखेचे मॅनेजर सुर्यकांत बाबसेट व कर्मचारी, सभासद, नागरीक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *