नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची चिंता सध्या देशाला लागून राहिली आहे. देशातून त्यांच्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याच्या आशा सोडल्याची माहिती मिळत आहे.
मात्र श्रीवास्तव यांच्या परिवाराने अद्याप आशा सोडलेली नाही. ते एक योद्धा आहे, ते लवकरच बरे होतील, असा विश्वास श्रीवास्तव यांच्या परिवाराने व्यक्त केला आहे. राजू श्रीवास्तव सध्या दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, पण त्यांच्या प्रकृतीत खास सुधारणा दिसत नाही.
सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या वॉर्डमध्ये किंवा मजल्यावरही अगदी जवळच्या नातेवाईकांशिवाय कोणालाही सोडलं जात नाही. राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूचं कार्य बंद पडल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या मेंदूला सूज आल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं सांगितलं जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta