Wednesday , March 4 2026
Breaking News

ऋषभ पंतला उपचारांसाठी मुंबईत हलवणार

Spread the love

 

नवी दिल्ली : भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या हेल्थबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंतवर सध्या डेहराडूनमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मात्र, आता पंतला पुढील उपचारांसाठी मुंबईत हलवण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती डीडीसीएचे संचालक शाम शर्मा यांनी दिली आहे.
दरम्यान, पंतला मुंबईतील नेमक्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मुंबईत पंतच्या लिगामेंट इंज्युरीवर उपचार केले जाणार आहेत. तसेच प्लास्टिक सर्जरीदेखील करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *