Tuesday , March 3 2026
Breaking News

बोरगाव भाग्यलक्ष्मी संस्था सभासदांच्या पाठीशी

Spread the love

 

अध्यक्ष जावेद चोकावे; सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा

निपाणी (वार्ता) : तीन वर्षातील कोरोना व महापुराच्या संकटामुळे कर्जदार हा बँकेत कर्ज काढताना मागेपुढे पाहत आहे. अशा परिस्थितीत ठेवीवरील व्याजदर देण्यासही संस्थांना अनेक अडीअडचणी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सभासद नेहमी संस्थेवर विश्वास ठेवून व्यवहार केले. कर्जदार व ठेवीदार यांच्यामुळेच आज संस्थेची प्रगती होत असल्याने बोरगाव भाग्यलक्ष्मी ही नेहमीच सभासदांच्या पाठीशी राहून त्यांचे हित जोपत असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष जावेद चोकावे यांनी व्यक्त केले.
बोरगाव येथील श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा भीमगोंडा शांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. संस्थेत एकूण 741 सभासद, 15 लाख 4 हजार भागभांडवल, 32 लाख 14 हजारावर निधी, 4 कोटी 99 लाख हजार ठेवी आहेत. व्यापारी, सभासद, शेतकरी व इतरांना 3 कोटी 5 लाख 37 हजार कर्ज वितरण केले असून अहवाल सालात संस्थेला 10 लाखांचा नफा झाल्याचे जावेद यांनी सांगितले.
यावेळी प्रतापराव मोहिते, डॉ. महावीर घाळे, राजेंद्र एदमाळे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार झाला.
संस्थेचे व्यवस्थापक अशोक चिंचले यांनी नफा-तोटा, ताळेबंद पत्राचे वाचन करून मंजुरी मिळवली.
सभेस उपाध्यक्ष शिकांत गोलेत्तीनवर, संचालक माणिक कुंभार, राजेंद्र माळी, कुमार चीपरे, शोभा चीपरे, सौरभ पाटील, विजय गोरवाडे, महादेव कुंभार, अभयकुमार लगारे, सलीम आफराज, श्रीकांत, दिलीप गोसावी, लक्ष्मी कुंभार, शैलजा पुजारी, शिवाजी कुंभार, अशोक कुंभार, राजेंद्र ऐदमाळे यांच्यासह सभासद शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.ए. टी. चींचले यांनी स्वागत केले. आर. एस. पचंडी यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब धर्माधिकारी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

नगरपालिकेवरील जीर्ण भगवा ध्वज बदलण्याच्या निर्णया प्रकरणी स्वराज्य रक्षक संघटनेच्या नवनाथ चव्हाण यांना अटक, सुटका

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील स्वराज्य रक्षक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ नामदेव चव्हाण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *