Wednesday , April 15 2026
Breaking News

हरवलेल्या १४ लाख रुपये किमतीचे ९२ मोबाईल पोलिसांकडून जप्त

Spread the love

 

निपाणी मंडल पोलिसांची कारवाई; मोबाईल परत दिल्याने चेहऱ्यावर फुलले हास्य

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर ग्रामीण आणि बसवेश्वर चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत हरवलेल्या १४ लाख रुपये किमतीच्या ९२ मोबाईल पोलिसांनी जप्त केल्या. शिवाय संबंधितांना शुक्रवारी (ता.१०) चिक्कोडीचे पोलीस उपाधिक्षक गोपालकृष्ण गौडर, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षकांच्या हस्ते परत करण्यात आल्या. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते.
शहरातील तीनही पोलीस स्टेशनमध्ये गेल्या दोन वर्षापासून बसस्थानक, बाजारपेठ, रस्त्यावर हरवलेल्या मोबाईल बाबत संबंधितांनी तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी तपास करून आतापर्यंत ९२ मोबाईल जप्त केल्या होत्या. निपाणी शहर पोलीस ठाण्यातून ११,८२,००० रुपये, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यातून १,२२,००० रुपये किमतीचे आणि निपाणी बसवेश्वरा चौक पोलीस ठाण्यातून १,९,००० किंमतीचे जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय चिक्कोडी शहरातही सुमारे १०० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाची माहिती घेण्यात येत असून लवकरच त्याचेही संबंधितांना वाटप करण्यात येणार आहे.
मंडळ पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी किमती मोबाईल्स सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या वस्तू घेऊन येऊ नयेत. याशिवाय चोरीच्या घटना घडल्यास तात्काळ जवळच्या पोलिसांनाशी संपर्क साधून तक्रार करण्याचे आवाहन केले.
पोलीस उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर यांच्या नेतृत्वाखाली मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, निपाणी ग्रामीण पोलिस उपनिरीक्षक, निपाणी बसवेश्वर चौक पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एम. कलावंत, यू. आर. माळगे, एम. ए. तेरदाळ, ए. एस. कुंभार, एस. ए. मुल्ला आणि सहकाऱ्यांनी तपास कार्यात सहभाग घेतला. जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्यांचे कौतुक केले आहे.
—————————————————————–
सीईआयआर पोर्टलद्वारे तपास
हरवलेल्या मोबाईल संदर्भात केंद्र सरकारने सीइआयआर पोर्टल सुरू केले आहे. मोबाईल हरवल्यास मोबाईल क्रमांक, एमआय क्रमांक, खरेदी केलेली पावतीसह इतर माहिती त्यानंतर सदरचा मोबाईल कुठे आहे याचे लोकेशन कळते. त्यानुसार पोलिसांनी तपास करून ९२ मोबाईल जप्त केले आहेत.
——————————————————————-
‘अलीकडच्या काळात मोबाईलच्या किमती वाढल्या आहेत. हि बाब लक्षात घेऊन चोरट्यांनी मोबाईल चोरीचा सपाटा लावला आहे. त्यामुळे जागृत राहणे आवश्यक आहे. शिवाय नागरिकांनीही गर्दीच्या ठिकाणी मोबाईल व्यवस्थितरीत्या ठेवणे आवश्यक आहे.’

-गोपालकृष्ण गौडर, पोलीस उपाधीक्षक, चिक्कोडी

About Belgaum Varta

Check Also

श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार राजवाड्यात देव बोलविण्याचा कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर-सरकार यांच्या राजवाड्यामध्ये चैत्र मासा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *