
परमात्मराज महाराजांची उपस्थिती : सहज, सुलभ भाषेत शिक्षण
निपाणी(वार्ता) : येथील कलानिकेतन शिक्षण संस्थेतर्फे सर्वोत्तम व जागतीक पध्दतीनुसार कमी वयात हसत खेळत सहज व सुलभ अशी नवीन अभ्यासक्रम पध्दत सुरू केली आहे. पाल्याच्या शारीरिक व बौध्दीक विकासासाठी केआर ईईडीओ प्रणाली अंतर्गत निपाणीत प्रथमच ज्ञानदानाचे काम केले जात आहे. अंकुररम इंग्लिश मीडियम स्कूल कोडणी रोड या इंग्लिश मेडियम शाळेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा
आडी येथील दत्त देवस्थान मठाचे परमात्मराज महाराजांच्या उपस्थितीत बुधवारी (ता.६) दुपारी बारा वाजता पार पडणार आहे. अध्यक्षस्थानी कराड येथील माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून चिकोडीचे शैक्षणिक अधिकारी एम्. एल. हानचाटे चिकोडीचे गटशिक्षणाधिकारी बी. ए. मेक्कनमर्डी, अभियंते भरत बेडकिहाळे, डॉ. निला शेट्टी, डॉ. संजय पंतबाळेकुंद्री, निपाणी रोटरी क्लबचे अध्यक्ष सोमनाथ परमणे, इंजीनियर असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब ऐनापूरे,अमित रामनकट्टी, सुधाकर सोनाळकर, शाळेच्या संस्थापिका चेतना अमर चौगुले, संस्थेचे विश्वस्त डॉ. उत्तम पाटील,
डॉ. बलराम जाधव, कॅप्टन सदाशिव गोविलकर, सतिश रेपे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले, डॉ. जोतिबा चौगुले, चंद्रकांत खोत, संदिप ननवरे, अमित पाटील, सचिन मोहिते, चौगले, संतोष यादव, मिना शिंदे, निर्मला शेवाळे, विनायक गटशिक्षणाधिकारी रेवती मठद यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta