


निपाणी (वार्ता) : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंजुर केलेल्या ३.२५ लाख निधीतून संगोळी रायण्णा सर्कलचा सर्वांगीण विकास होणार आहे. या संदर्भात अक्कोळ क्रॉसवर संगोळ्ळी रायण्णा यांचा बसविण्यासह सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाला गती आली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यापूर्वी संबंधित प्रशासकीय अधिकारी, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे अध्यक्ष कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींनी जागेची संयुक्त पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात कामाची पुढील रूपरेषा आणि नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी भंडारकर नगरपालिका आयुक्त गणपती पाटील, मुख्य कंत्राटदार रोहन कोठीवाले उपस्थित होते. त्यांनी जागेच्या तांत्रिक बाबींची तपासणी केली. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी या जागेची पाहणी करून चौकातील कामाची सुरुवात कधी करायची आणि वाहतुकीला अडथळा न ठरता हे काम कशाप्रकारे वेळेत पूर्ण करता येईल, याविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. भव्य आणि आकर्षक स्वरूपात हे सर्कल विकसित करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
संगोळ्ळी रायण्णा सर्कलच्या या सुशोभीकरणामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. पाहणी प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दीपक सावंत, प्रतीक शहा, लोकेश घस्ते, समीर काझी, फारुख पटेल यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta