Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गौंडवाड ग्रामस्थांचा आक्रोश

बेळगाव : गौंडवाड येथे देवस्थान जमिनीच्या वादातून सतीश राजेंद्र पाटील याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणानंतर गौंडवाड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. आरोपीला अटक करण्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. आरोपींनी पुन्हा धमकी दिली असून तातडीने त्यांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी समस्त गौंडवाड ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हाधिकारी …

Read More »

जनतेच्या समस्या निवारणाला प्राधान्य द्या : आ. श्रीमंत पाटील

शिरगुप्पी ग्रामपंचायतीत तक्रार निवारण बैठक शिरगुप्पी : अधिकारी असोत वा लोकप्रतिनिधी त्यांनी गावातील जनतेच्या समस्यांना प्राधान्य द्यायला हवे. शिरगुप्पी ग्रामपंचायत याचेच एक उदाहरण म्हणावे लागेल. त्यांनी गावच्या विकासाला जे प्राधान्य दिले आहे, ते खरोखर कौतुकास्पद आहे, असे मनोगत माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले. शिरगुप्पी ग्रामपंचायतीत …

Read More »

मंडोळी हायस्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मंडोळी हायस्कूल, मंडोळी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा नुकताच खेळीमेळीत उत्साहाने पार पडला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डी. एल. आंबेवाडीकर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक जी. पी. मिसाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात बालकांची जबाबदारी व …

Read More »

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिवांची ज्योतिबा मंदिरला भेट

बेळगाव : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडी यांनी बेळगावच्या श्री ज्योतिबा देवस्थानाला भेट दिली. यावेळी त्यांचा बेळगावातील चव्हाट गल्ली ज्योतिबा मंदिराच्या वतीने सन्मान करण्यात आला. बेळगावातील ज्योतिबा मंदिराचे सागवान नवरंग लाकडी गाभाऱ्याचे कामाचे कौतुक करत बेळगावची ज्योतिबा सासनकाठी यंदाच्या वर्षी ज्योतिबा यात्रेत दिलेली भेट शिस्तबद्ध आयोजनाची आठवण करून …

Read More »

योग हा जीवनाचा मार्ग : पंतप्रधान मोदी

आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्घाटन बंगळूर : योग हा जीवनाचा भाग नसून, ती एक जीवन पद्धती आहे, तो एक जीवनाचा मार्ग आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हैसूर येथे व्यक्त केले. ऐतिहासिक भव्य म्हैसूर महाराजा राजवाड्याच्या आवारात आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे …

Read More »

सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे लवकरच उद्घाटन : आमदार अनिल बेनके

बेळगाव : बेळगाव शहरात 140 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम येत्या 4 महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली आहे. बिम्स आवारातील सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाची आमदार अनिल बेनेके यांनी आज मंगळवारी बिम्सचे संचालक ए. बी. पाटील यांच्यासह कंत्राटदार आणि …

Read More »

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वननेस योगा चॅलेंज कार्यक्रम संपन्न

बेळगाव : वननेस योगा चॅलेंज हा शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य, आनंद आणि एकतेचा क्रांतिकारक मार्ग आहे. पंधरा जून पासून सात दिवसासाठी हा कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने जगभरातील साधकांसाठी आयोजित करण्यात आला होता. श्री प्रीताजी यांनी त्यांच्या अनुयायांना आणि लाखो साधकांना या योग प्रवासात सामील होण्याचे आवाहन केले होते, त्याला अनुसरून …

Read More »

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थांना आवाहन

बेळगाव : मराठा समाजातील यंदाच्या दहावी परीक्षेत ९० टक्के तर बारावीमध्ये ८५ टक्के गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच एका खास समारंभात या विद्यार्थांचा सत्कार होईल. तरी पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व आयडेंटिटी आकाराचा फोटो, संपूर्ण पत्ता, मोबाईल व व्हॉटसअप नंबरसह मराठा समाज सुधारणा …

Read More »

जिल्हा प्रशासनातर्फे सुवर्ण सौधमध्ये योग दिन साजरा

बेळगाव : ‘मानवतेसाठी योग’ या घोषवाक्याला अनुसार जागतिक योग दिनानिमित्त आज सुवर्ण विधानसौध येथे जिल्हा प्रशासनातर्फे योग दिन साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, शिक्षण खाते, महानगरपालिका, पर्यटन खाते, राणी चन्नम्मा विद्यापीठ, स्काऊट आणि गाईड, नेहरू युवा केंद्र व पतंजली योग विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण विधानसौध येथे योग …

Read More »

फरारी कुख्यात गुंडावर बेळगाव पोलिसांचा गोळीबार

बेळगाव : बेळगाव येथील फरारी गुंडावर पोलिसांनी गोळीबार करून त्याला जखमी केले आहे. भवानीनगर येथे झालेल्या बिल्डर राजू दोड्डभोम्मनावर याच्या खून प्रकरणी फरारी असलेला गुंड विशाल सिंग चव्हाण याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात त्याच्या पायावर गोळी लागली असून तो जखमी झाला आहे. मंगळवारी सकाळी धर्मनाथ …

Read More »