Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असेल तर जेडीएसने आम्हाला पाठिंबा द्यावा : सिद्दरामय्या

बेंगळुरू : भाजपचा प्रभाव करायची इच्छा असेल तर, धर्मनिरपेक्ष तत्वांवर विश्वास असेल तर जेडीएसने राज्यसभा निवडणुकीत आमचे उमेदवार मन्सूर अलिखान यांना पाठिंबा द्यावा, असे माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी सांगितले. धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यायचे असेल तर कमी जागा असलेल्या काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा द्यावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ट्विट करून …

Read More »

सरकारकडून मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा घाट : ईश्वर खांड्रे

हुबळी : भाजप सरकार पाठ्यपुस्तकात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा इतिहास फिरवून मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे. याची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केपीसीसीचे कार्याध्यक्ष आ. ईश्वर खांड्रे यांनी केली. हुबळी शहरात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आ. ईश्वर खांड्रे म्हणाले, पाठ्यपुस्तकात सुधारणांच्या नावाखाली भाजप सरकारने धिंगाणा …

Read More »

पांढऱ्या जास्वंदीच्या झाडाला चक्क गुलाबी रंगाचे जास्वंदीचे फूल!

बेळगाव : निसर्गाचा चमत्कार आपल्याला नेहमी पाहायला आणि अनुभवायला मिळतो. निसर्गाचा चमत्कार थक्क करणारा असतो. आता हेच पहा ना पांढऱ्या जास्वंदीच्या फुलाच्या झाडाला चक्क गुलाबी रंगाचे जास्वंदीचे फूल उमलले आहे. कोठे घडला आहे हा निसर्गाचा चमत्कार असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर पुढे वाचा….. शहापूर आचार्य गल्लीमध्ये पांढऱ्या जास्वंदीच्या फुलाच्या …

Read More »

आमदारांनी झाडले… घराचे पैसे मंजूर झाले…

दिव्यांगाच्या घराचे स्वप्न साकार : कृष्णा कित्तूरला जाऊन जागेवरच फैसला अथणी : दोन वर्षांपूर्वी महापुरात घर वाहून गेले… शासनाने नवीन घर मंजूर करत दोन हप्ते देखील दिले. परंतु, तिसर्‍या हप्त्यासाठी दोन वर्षांपासून हेलपाटे मारूनही अधिकार्‍यांना पाझर फुटला नाही. शेवटी वैतागलेल्या या गरीब शेतकर्‍याने कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांची भेट घेऊन …

Read More »

वाढीव शुल्क, डोनेशन विरोधात अभाविपची निदर्शने

बेळगाव : शाळा-महाविद्यालयांचे वाढलेले शैक्षणिक शुल्क, डोनेशनच्या विरोधात अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेतर्फे बेळगावात आज निदर्शने करण्यात आली. वाढीव शुल्क आणि डोनेशनला लगाम घालण्याची मागणी अभाविप कार्यकर्त्यांनी यावेळी केली. गुरुवारी सकाळी बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात अभाविप कार्यकर्त्यांनी प्रचंड महागलेले शैक्षणिक शुल्क आणि डोनेशनच्या विरोधात भव्य आंदोलन छेडले. अनुदानित आणि विनाअनुदानित खासगी …

Read More »

वादाच्या भोवऱ्यात अडकलेली खानापूर समिती!

एकीत खोडा घालणाऱ्यांना वेळीच आवरा बेळगाव : खानापूर समितीची बिनशर्त एकीची घोषणा हवेतच विरली. दि. 24 एप्रिल रोजी हब्बनहट्टी येथे म. ए. समितीची बिनशर्त एकीची घोषणा झाली खरी पण ती घोषणाही फक्त घोषणाच राहिली. 2018 च्या विधानसभेच्या वेळी दोन गटात विखुरलेली समिती एकत्र यावी यासाठी तालुक्यातील समितिनिष्ठ कार्यकर्त्यांनी आणि ज्येष्ठ …

Read More »

मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा

तांत्रिक सल्लागार समितीची सरकारला शिफारस बंगळूर : कर्नाटक तांत्रिक सल्लागार समितीने मुखवटा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी अनिवार्य मास्क नियम एका आठवड्याच्या आत पुनरुज्जीवित करण्याची शिफारस केली आहे. तसेच मास्क परिधान न करणाऱ्यांविरुध्द दंड आकारण्याचा सल्लाही दिला आहे. बंगळुरमध्ये कोविडची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. तथापि, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कोविडचे नियमन …

Read More »

एनइपी अभ्यासक्रमात कौशल विकासावर भर असावा : डॉ. थिम्मेगौडा

पदवी अभ्यासक्रमाबाबत बेंगलोर येथे बैठक बेंगळूर : पदवी शिक्षणासाठी एनईपी अभ्यासक्रम लागू करण्यात कर्नाटक राज्य आघाडीवर असून यापुढील भाषा अभ्यासक्रमातही कौशल विकासावर अधिक भर असावा अशी सूचना कर्नाटक राज्य उच्च शिक्षण आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. थिम्मेगौडा यांनी केली. बेंगळूर येथे आयोगाच्या कार्यालयात बुधवारी पदवी अभ्यासक्रमासाठी द्वितीय वर्षाचा हिंदी अभ्यासक्रमाचा आराखडा ठरविण्यासाठी …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत तज्ञ समितीची बैठक संपन्न

पुढील बैठक आठ जुलैच्या आधी होणार बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ञ समितीची बैठक आज सायंकाळी जलसंपदामंत्री श्री. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस समितीचे सभासद श्री. राम आपटे, श्री. राजाभाऊ पाटील, श्री. दिनेश ओऊळकर, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर सचिव सौ. सुजाता सौनिक, श्री. शिवाजीराव जाधव, श्री. …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चा अनोखा कार्यक्रम

बेळगाव : 4 जून 2022 हा दिवस मुख्यत्वे मुलांचा संरक्षण दिवस. जोर जबरदस्तीचे बळी म्हणून जागतिकरित्या सर्वत्र साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चे अध्यक्ष श्री. शिव कुमार हिरेमठ, संचालक श्री. पद्म प्रसाद हुली अन्य श्री. राहुल पाटील (एनजीओ) व एसडीएमसीचे अध्यक्ष यांनी नुकतीच …

Read More »