बेळगाव : कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ९ हुतात्म्यांना बेळगावात आज भावपूर्ण आदरांजली वाहून हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला. अन्यायाने कर्नाटकात डांबलेल्या सीमाभागातील मराठी भाषक महाराष्ट्रात जाण्यासाठी तितकेच उत्सुक असल्याचे यावेळी दिसून आले. कर्नाटकात कन्नड भाषेची सक्ती केल्याच्या निषेधार्थ १९८६ मध्ये बेळगावात मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी जुलमी कर्नाटक …
Read More »LOCAL NEWS
तायक्वांडो कौशल्य विकास, कायदा साक्षरता कार्यक्रम उत्साहात
बेळगाव : बेळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन आणि चिकोडी कायदा सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तायक्वांडो कौशल्य विकास चर्चासत्र व कायदा साक्षरता कार्यक्रम चिकोडी येथे रविवारी उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमात जिल्हा तायक्वांडो संघाच्यावतीने तायक्वांडो तंत्राद्वारे शारीरिक कार्यक्षमता वाढवणे, शारीरिक लवचिकता वाढवणे, जागतिक तायक्वांडो स्पर्धेचे नियम, अँटी डोपिंगबद्दल परिचय, क्योरुगी …
Read More »येळ्ळूर येथील नाला(पाठ) झाला अतिक्रमण मुक्त व स्वच्छ
बेळगाव : येळ्ळूर येथील सिद्धेश्वर गल्लीपासून सुरु असलेला नाला बरीच वर्षे अतिक्रमण व अस्वच्छ होता. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत होते. हा नाला अवचारहट्टी रोड पासून सुरु होऊन लक्ष्मी तलावाला येऊन मिळतो आणि तेथून तो नाला सिद्धेश्वर गल्लीतून पुढे शेतीतुन जाऊन मच्छे जवळील रेल्वेलाईन पर्यंत होता. पण येळ्ळूर पासून …
Read More »मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवकुमार यांना दिल्ली न्यायालयाचे समन्स
शिवकुमारांच्या अडचणीत वाढ, निवडणुक लढविण्यातही अडचणी शक्य बंगळूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि इतरांवरील आरोपपत्राची दखल घेत दिल्ली न्यायालयाने मंगळवारी २०१८ मध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावले. विशेष न्यायाधीश विकास धुल्ल यांनी शिवकुमार याना १ जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले. शिवकुमार आणि इतरांविरुद्ध ईडीने …
Read More »निर्मला सीतारामन, जग्गेश यांचे उमेदवारी अर्ज दाखल
बेंगळुरू : राज्यसभेच्या दुसर्या टर्मसाठी राज्यसभेची निवडणूक लढवत असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अभिनेते जग्गेश यांनी आज कर्नाटकातून उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभेच्या सचिव विशालाक्षी यांच्याकडे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निर्मला सीतारामन यांच्या समवेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि …
Read More »निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत आरसीसी शिरोडा संघ अजिंक्य
बेळगाव : होनगा येथील फिनिक्स रेसिडेन्शियल स्कूलच्या मैदानावर नुकत्याच आयोजित मुलांच्या निमंत्रितांच्या आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेतील 14 व 16 वर्षाखालील या दोन्ही गटाचे विजेतेपद आरसीसी शिरोडा गोवा या संघाने पटकाविले. सदर निमंत्रितांची लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आरसीसी शिरोडा गोवा विजया क्रिकेट अकादमी आणि एमसीसी बेळगाव या संघांमध्ये साखळी पद्धतीने खेळविली गेली. त्यामध्ये …
Read More »मळेकरणी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
उचगाव : आपल्या रोजच्या धावपळीतून मोकळा वेळ काढत एक दिवस जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या हेतूने उचगाव येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित श्री मळेकरणी हायस्कूलमधील सण 1990-91या वर्षांमधील दहावीच्या वर्गातील, बॅचचा विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साही वातावरणात पार पडला. या स्नेहमेळाव्याला सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या बॅचच्या विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप ग्रुपच्या …
Read More »जायंट्स ग्रुप प्राईड सहेलीचा उद्या पदग्रहण समारंभ
बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राइड सहेली यांचा अधिकारग्रहण सोहळा उद्या बुधवार दिनांक 1 जून रोजी दुपारी चार वाजता हिंदवाडी येथील हिंद सोशल क्लब येथे होणार आहे. या कार्यक्रमाला हुबळीच्या फेडरेशन अध्यक्षा तारादेवी वाली, मुंबई येथील सेंट्रल कमिटीचे सदस्य दिनकर अमिन, यांच्यासह डॉ. सोनाली सरनोबत, राजू माळवदे आणि अनंत …
Read More »विराट मोर्चाने मराठीची ताकद दाखवू : म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार
बेळगाव : ज्या मराठी भाषेसाठी 9 जणांनी हौतात्म्य पत्करले, कन्नडसक्ती विरोधात लढा दिला, ती कन्नडसक्ती अजूनही दूर झालेली नाही. कर्नाटक सरकार गेल्या 18 वर्षांपासून स्वत:च्याच कायद्याची अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे 1 जून हुतात्मा दिनी हुतात्म्यांना अभिवादन करून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतरही मराठी कागदपत्रे देण्यात येत नसतील तर ‘एक …
Read More »रेणुका शुगर्सच्या दूषित पाण्यासंदर्भात कोकटनूर ग्रामस्थांचे आंदोलन
बेळगाव : अथणी येथील रेणुका शुगर्सच्या युनिट ४ मधून दूषित पाणी बाहेर सोडण्यात येत आहे. हे पाणी आसपास परिसरात तसेच कालव्यांमध्ये मिसळत असल्याने या परिसरातील जनावरे आणि मासे दगावले आहेत. याविरोधात आज कोकटनूर येथील ग्रामस्थांनी बेळगावमध्ये आंदोलन छेदत कारवाई करण्याची मागणी केली आहे. अथणी तालुक्यातील कोकटनूरसह आसपास परिसरात असणाऱ्या चार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta