Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

राज्यात होणार ६५ हजार कोटीची गुंतवणुक

मुख्यमंत्री बोम्मई, दावोस इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीचे फलित बंगळूर : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सहभाग घेऊन सुमारे ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक वचनबद्ध करण्यात राज्य सरकारने यश मिळवले असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी सांगितले. गुंतवणुकीला आकर्षित करण्यात कर्नाटक आघाडीवर आहे आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मीट यशस्वी …

Read More »

1 जून हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे अभिवादन

बेळगाव : जून 1986 मध्ये हिंडलगा, बेळगुंदी आणि बेळगाव परिसरात कन्नडसक्तीविरोधी आंदोलन झाले. या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 9 जणांना हौतात्म्य प्राप्त झाले. या हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी 1 जून 2022 रोजी सकाळी 8.30 वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे वेळेवर हजर राहावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. …

Read More »

संतोष दरेकर यांना ‘सेवा रत्न पुरस्कार’

बेळगाव : अत्यंत निस्वार्थ वृत्तीने अवरीत सामाजिक कार्य करत असल्याबद्दल शहरातील फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांना मॅक्स लाईफ इन्शुरन्स या विमा कंपनीने ‘सेवा रत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित केले आहे. मॅक्स लाईफ इन्शुरन्स कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक काशिनाथ नाईक आणि प्रशिक्षण व्यवस्थापक रवी बणकर यांनी संतोष …

Read More »

विधान परिषद निवडणूक : लक्ष्मण सवदी यांच्यासह सर्व उमेदवार अविरोध

बेंगळुरू : राज्य विधान परिषदेच्या सात जागांसाठी येत्या 3 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत उभे असलेल्या सर्व 7 उमेदवारांची अविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी आणि राज्य विधानसभा सचिव विशालाक्षी यांनी केली आहे. निवडणूक न होताच विधान परिषदेच्या 7 जागांसाठी उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या 7 जागांसाठी …

Read More »

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पवन, धनंजय, श्रेयन, दक्षण, एस. मीनाक्षी मेनन विजेतेपदाचे मानकरी

बेळगाव : कर्नाटक जलतरण संघटना व एनरआरजी केएलई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत विविध प्रकारात जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. तसेच एकूण 46 प्रकारात या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ निवृत्त आय. पी. एस. अधिकारी गोपाळ होसुर, पोलिस आयुक्त डॉ. एम. …

Read More »

धामणे येथे वरातीत डान्स, गाण्यांवरून २ गटांत संघर्ष; ५ जखमी : १० जणांना अटक

बेळगाव : नामफलक आणि वरातीत कन्नड गाणी लावण्याच्या वादातून २ गटांत झालेल्या संघर्षात ५ जण जखमी झाले. ही घटना बेळगाव तालुक्यातील धामणे गावात घडली आहे. यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांनी या वादाला भाषिक संघर्षाचे स्वरूप देऊन मराठी भाषिकांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. याबाबत समजलेली हकीकत अशी की, धामणे गावात …

Read More »

अनगोळ येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बेळगाव : रघुनाथ पेठ अनगोळ येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. कौटुंबिक कलहातून त्यांनीही आत्महत्या केल्याचे उघडकीस आली आहे. महावीर चींनाप्पा सुपण्णावर (वय 60) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. यावेळी अनगोळ शिवारामध्ये काही शेतकरी सकाळच्या सत्रात शेतीकामे करण्याकरीता जात …

Read More »

कर्नाटकात पुन्हा ’हिजाब’ वाद! स्कार्फ बंदीवरुन मंगळूर विद्यापीठात तणाव

मंगळूर : कर्नाटकात पुन्हा ‘हिजाब’ वाद सुरु झाला आहे. मंगळूर विद्यापीठाने सध्याच्या गणवेश नियमात सुधारणा केली आहे. यानुसार विद्यार्थिनींना विद्यापीठाच्या संपूर्ण कॅम्पसमध्ये आणि वर्गात डोक्यावर स्कार्फ घालण्यावर बंदी घातली आहे. पण या निर्णयाला विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी जोरदार विरोध केला आहे. यामुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा नवा …

Read More »

सफाई कर्मचार्‍यांच्या निवासी भागात समस्यांचा डोंगर!

बेळगाव : संपूर्ण बेळगावची स्वच्छता करणार्‍या सफाई कामगारांच्या निवासी भागात समस्यांचा डोंगर उभा राहिला असून हा भाग पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. यामुळे येथील निवासी मनपा अधिकार्‍यांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत. बेळगाव शहर हे स्वच्छ आणि सुंदर बनविणे हि बाब स्वप्नवतच आहे याचेच आणखीन एक उदाहरण म्हणजे स्वच्छता कामगारांचा निवासी …

Read More »

डी. के. शिवकुमारविरुध्द ईडीकडून आरोपपत्र दाखल

मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप बंगळूर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. दिल्ली न्यायालयात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) विविध कलमांतर्गत फिर्यादी तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. फेडरल प्रोब …

Read More »