बेळगाव (वार्ता) : बेळगाव इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने जिल्हा रुग्णालयातील आयएमए हॉल येथे 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. राजश्री अनगोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आयएमएचे सचिव डॉ. संतोष शिंदे यांनी पूजा केली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाल्या, देशाच्या सीमेवर अहोरात्र काम करणार्या …
Read More »LOCAL NEWS
कॉंग्रेस प्रचार समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री एम. बी. पाटील
लिंगायत चेहरा देण्याचा कॉंग्रेस नेत्यांचा प्रयत्न बंगळूर : माजी जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील यांची मंगळवारी (ता. २५) कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या (केपीसीसी) प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटकातील लिंगायत समाजाला खुश करण्यासाठी कॉंग्रेसने पाटील यांच्याकडे निवडणुकीचे नेतृत्व दिल्याचे राजकीय निरिक्षकांचे मत आहे. एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल …
Read More »माजी महापौर, उपमहापौरांना जामीन मंजूर
बेळगाव : बेंगलोरमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना घटनेच्या निषेधार्थ बेळगावात छेडलेल्या आंदोलन प्रकरणी माजी महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर प्रकाश शिरोळकर यांना खडेबाजार पोलीस स्थानकातील पाच गुन्ह्यांमध्ये तर मयूर बसरीकट्टी व राधेश शहापूरकर यांना दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात विधिमंडळ अधिवेशन कालावधीत बेंगलोरला छत्रपती …
Read More »स्वातंत्र्य सैनिक संघटनेतर्फे सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
बेळगाव: येथील जिल्हा स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघ यांच्यावतीने 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शतायुषी स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमात विवेकानंद पोटे, किरण बेकवाड यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस …
Read More »नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्यावतीने नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी
2022 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन येळ्ळूर : शिवाजी रोड येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीमध्ये थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून येळ्ळूर …
Read More »‘एनडीं’चे आयुष्य वंचितांच्या न्याय हक्कासाठी खर्ची : एस. एन. पाटील
बेळगाव : दिवंगत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आपले सारे आयुष्य सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि वंचितांच्या न्याय हक्कासाठी समर्पित केले. त्यांनी अनेक आंदोलने चळवळी केल्या. अन्यायाच्या विरोधात लढून महाराष्ट्राला वेगळी दिशा दाखविली. त्याचबरोबर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न संबंधीच्या प्रत्येक लढ्याचे नेतृत्व केले, म्हणूनच त्यांची सीमा चळवळीचे ‘भीष्माचार्य’ अशी ओळख होती, …
Read More »रेल्वे ओव्हर ब्रिजवरील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
बेळगाव (वार्ता) : जुन्या धारवाड रोड येथील रेल्वे गेटच्या ठिकाणी तीन वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे ओव्हर ब्रिजवरील रस्त्याची दिवसेंदिवस दुर्दशा होत असून त्यावरून वाहने चालविणे धोकादायक बनत चालले आहे. जुन्या धारवाड रोड येथील रेल्वे गेटच्या ठिकाणी 24 जानेवारी 2017 रोजी बांधकामाला सुरुवात करण्यात आलेला हा रेल्वे ओव्हर …
Read More »विकेंड कर्फ्यु हटताच; खासबाग येथील आठवडा बाजारात गर्दी!
बेळगाव (वार्ता) : देशातील कर्नाटकसह पाच राज्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढत असतानाही राज्य सरकारने शनिवार व रविवारी लागू करण्यात आलेला विकेंड कर्फ्यु मागे घेतला आहे. परिणामी शहरातील खासबागच्या रविवारच्या आठवडी बाजारात आज रविवारी पुन्हा एकदा खरेदीसाठी प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली. कोरोनाला निमंत्रण देणारी ही गर्दी चिंतेचा विषय बनली आहे. …
Read More »पोलिसांसाठी रोगप्रतिकारक औषध वितरण
बेळगाव (वार्ता) : पोलीस दलात देखील कोरोना बाधितांची संख्या वाढली असल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचार्यांमधील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डॉ. श्रीनिवास पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे नुकतीच आयुर्वेदिक औषधे सुपूर्द केली. कोरोनाच्या पहिल्या व दुसर्या लाटेवेळी येथील प्रोजेन रिसर्च लॅबचे डॉ. श्रीनिवास पाटील यांनी पोलिसांसाठी मोफत औषध पुरवली होती. समाज आणि …
Read More »बेळगाव शिवसेनेतर्फे गरजूंना मास्क, ब्लँकेट्सचे वाटप
बेळगाव (वार्ता) : बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे आज रविवारी हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख मान. बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना फेसमास्क आणि ब्लँकेट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या नेतृत्वाखाली आज रविवारी गरजू लोकांना फेसमास्क आणि ब्लँकेटचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta