बेळगाव : आज अरळीकट्टी, बसापूर, हुलिकवि, नेगेरहाळ, नंदिहळी, राजहंसगड, सुळगा. आदि गावामध्ये बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला अंगडी यांच्याहस्ते जलजीवन मिशन योजनेची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात अरळीकट्टी येथून अरळीकट्टी मठाचे मठाधीश श्री शिवमूर्ती देवरु विरक्त मठ यांच्या अमृतहस्ते करण्यात आली. प्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव म्हणाले, …
Read More »LOCAL NEWS
चंद्रशेखर गुरुजींच्या दोन मारेकऱ्यांना अटक, हत्येमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचं स्पष्ट
बेळगाव: गुरुजी डॉ.चंद्रशेखर यांच्या हत्येनंतर काही तासात त्यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे अटक केली असून ते गुरुजींचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. महांतेश शिरोळ आणि मंजुनाथ दुमवाड अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. या हत्येत वनजाक्षी या महिलेचा सहभाग असल्याचे उघड …
Read More »धूपटेश्वर मंदिरात पावसासाठी गाऱ्हाणे
बेळगाव : प्रतिवर्षाप्रमाणे हनुमाननगर येथील धूपटेश्वर मंदिरात गाऱ्हाणे घालून बेळगाव व परिसरातील जनतेसाठी पाऊस मागण्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कंग्राळ गल्लीतील पंचमंडळ सल्लागार मंडळ व शेतकरी संघटना यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरवातीस उपस्थित मान्यवर व पंचमंडळीच्या हस्ते पूजा करण्यात आली. देवस्थान मंडळाचे अध्यक्ष श्री. रणजित …
Read More »‘सरळ वास्तू’चे प्रख्यात ज्योतिषी चंद्रशेखर गुरुजी यांची निर्घृण हत्या
हुबळी : ‘सरळ वास्तू‘चे जगप्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर गुरुजी यांची हुबळीत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.होय, ‘सरळवास्तू’ या वास्तुशास्त्र मार्गदर्शन संस्थेच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेले प्रख्यात वास्तुतज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची आज मंगळवारी हुबळीतील उणकल परिसरातील एका खासगी हॉटेलमध्ये अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. हत्येनंतर …
Read More »मुतगे येथील विहिरीत आढळला शिरविरहित मृतदेह
बेळगाव : शिरविरहित मृतदेह विहिरीत आढळून आल्याची खळबळजनक घटना बेळगाव तालुक्यातील मुतगा येथे उघडकीस आली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी सुमारे ३० वर्षे वयाच्या तरुणाचा गळा चिरून शीर वेगळे करून धड विहिरीत टाकून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मुतगा येथे आज सकाळी-सकाळीच सगळ्यांना घाम फोडणारी घटना उघडकीस आली. अज्ञात युवकाचा खून करून त्याचे …
Read More »बेळगांव – जांबोटी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी
नगरसेवक रवी साळुंखे यांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी बेळगाव : बेळगांव ते जांबोटी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी चोर्ला मार्ग हा जवळचा मार्ग आहे. बेळगांव- गोवा मार्गावर वाहनांची वर्दळ जास्त असते. शिवाय बेळगावहून गोव्याला भाजीपाला पुरवठा करणारी वाहने …
Read More »रयत विद्या योजनेच्या धर्तीवर सफाई कामगारांच्या मुलांसाठी योजना
बेळगाव : कंत्राटी सफाई कामगाराना सेवेत कायमस्वरूपी ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून तात्विक मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अंतिम निर्णय एक समितीद्वारे घेण्यात येणार असल्याचे शासनाकडून कळविण्यात आले आहे. येत्या तीन महिन्यात सदर समिती आपला अहवाल सादर करणार आहे. सफाई कामगारांच्या मागणीनुसार या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करण्याचा निर्णय होईपर्यंत समान कामासाठी …
Read More »नूतन पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. संजीव पाटील यांनी पदभार स्वीकारला
बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. संजीव पाटील यांनी आज मावळते पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्याकडून पदभार स्वीकारला. चारच दिवसांपूर्वी डॉ. संजीव पाटील यांची बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली केल्याचा आदेश राज्य सरकारने बजावला होता. त्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी पुष्पगुच्छ …
Read More »अतिवाड, बेकिनकेरे गावात जलजीवन मिशन योजनेस चालना
बेळगाव : देशातील प्रत्येक कुटुंबाला पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरे मिळावित, तसेच जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून सर्वांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता सरकारने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. यातील एक योजना अतिवाड आणि बेकिनकेरे गावांमध्ये सुरू करण्यात आली. यावेळी खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते येथील गावात जीवन मिशन योजनेच्या कार्याला चालना …
Read More »पीएसआय पदांच्या बेकायदेशीर भरती एडीजीपी अमृत पॉल यांना अटक
बेळगाव : एडीजीपी अमृत पॉल यांना सीआयडी पोलिसांनी 545 पीएसआय पदांच्या बेकायदेशीर भरती प्रकरणी अटक केली आहे. भरती विभागाचे एडीजीपी असलेले अमृत पॉल यांच्यावर पीएसआय पद भरती परीक्षेच्या बेकायदेशीर प्रकरणात ओएमएमआर शीट दुरुस्त केल्याचा आरोप होता. या प्रकरणी एडीजीपी अमृत पॉल यांचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा आरोप आहे. त्यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta