बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळावा आयोजनासंदर्भात एक विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेण्यात आले. 2006 सालापासून आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकार बेळगाव येथे अधिवेशन भरवत आले आहे. त्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याचे आयोजन करत आली आहे. दरम्यान या वर्षीही महामेळावा घेण्यात येणार …
Read More »LOCAL NEWS
अधिवेशनच्या पहिल्या दिवशी समितीचा महामेळावा
बेळगाव : कर्नाटक सरकारने बेळगावात आयोजित केलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्हॅक्सिन डेपो मैदानावर भव्य सीमा महामेळावा घेऊन या अधिवेशनाला विरोध करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्नाटक सरकारने चालवलेल्या या प्रथेविरोधात दरवर्षीप्रमाणे महामेळावा घेऊन निषेध नोंदवण्याचा निर्णय …
Read More »तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेला 51 लाख 51 हजारचा निव्वळ नफा
बेळगाव : तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची यंदाची 70 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजी येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन ओरिएंटल शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी सभासदांना बारा टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी बँकेच्या …
Read More »बेळगावमध्ये एबीव्हीपी राज्य कार्यकारिणी सभेचे आयोजन
बेळगाव : बेळगावमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावच्या केएलईएस कन्व्हेन्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्य कार्यकारिणी सभेत राज्यातील विविध जिल्ह्यातील एबीव्हीपीचे राज्य कार्यकारिणी सदस्य, विभागीय संघटना सचिव, राज्य अध्यक्ष, राज्य सचिव, प्राध्यापक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यासंदर्भात राष्ट्रीय रचिव हर्ष नारायण यांनी संवाद …
Read More »रायबागमध्ये उद्या काँग्रेसची प्रचारसभा
बेळगाव : विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारी रायबाग येथे काँग्रेसची भव्य प्रचारसभा होणार आहे. पक्षाचे अनेक बडे नेते या सभेला संबोधित करणार आहेत. विधान परिषद निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रचारासाठी रायबाग येथे उद्या प्रचारसभा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या, माणिकसिंग ठाकूर, आयवन डिसोझा आदी …
Read More »सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानात ऑक्टोबरमध्ये 1.20 कोटीचे दान
बेळगाव : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका-यल्लम्मा देवस्थानच्या हुंडीत ऑक्टोबर महिन्यात तब्बल 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, साहित्य व रोख रक्कम जमा झाली आहे. कोरोना लॉकडाऊननंतर प्रथमच सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानच्या हुंडीत भक्तांनी विक्रमी दान दिले आहे. महामारी कोरोनामुळे अन्य देवस्थानांप्रमाणेच सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानही 1 …
Read More »शेतकर्यांना एकरी पन्नास हजार नुकसान भरपाईसाठी भव्य आंदोलन
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : कर्नाटकात पर्यायाने सीमाभागात अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. अशा वेळी तुटपुंजी नुकसानभरपाई देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार कर्नाटक सरकार करत असून हा अन्यायकारक कारभार आहे. या विरोधात शेतकर्यांच्या …
Read More »शाळातील सभा-समारंभांवर बंदी, विवाहात 500 लोकांची मर्यादा
नवीन कोविड नियंत्रण नियमावली जारी, उच्चस्तरीय बैठकीत निर्णय बंगळूरू : कर्नाटकातील ओमिक्रॉनच्या शोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.3) उच्चस्तरीय बैठक घेऊन कोविड नियंत्रणासाठी कांही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राज्यातील कोविड चाचणीचा वेग वाढविण्याबरोबरच शाळातील सभा, समारंभांवर बंदी घालण्यात येणार आहे. विवाह समारंभात केवळ 500 लोकांनाच सहभागाची परवानगी …
Read More »जीएसटी कर कमी करावा; सेंटर टॅक्स आयुक्तांकडे बेळगाव ट्रेडर्स फोरमची मागणी
बेळगाव : विणकरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या बेळगावमध्ये सध्या अवाजवी कर वाढीमुळे विणकर अडचणीत आले आहेत. पाच टक्के असणारा जीएसटी 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्याने याचा मोठा फटका विणकरांना बसला आहे. कापड आणि पादत्राणांवरील जीएसटी पाच टक्क्यांवरून 12 टक्केपर्यंत केल्याने उत्पादक आणि विक्रेते अडचणीत आले असून हा कर कमी करावा, अशी …
Read More »क्रीडा स्पर्धांसाठी जिल्हाधिकार्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव शहर परिसरातील शाळा महाविद्यालय आणि पदवीपूर्व महाविद्यालयांच्या रद्द करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा लवकरात लवकर आयोजित केल्या जाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी इशारा वजा मागणी शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या क्रीडापटूंनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या क्रीडापटूंनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकार्यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta