Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

पैगंबरांच्या विरोधात आक्षेपार्ह विधानाचा निषेध; बेळगावात नुपूर शर्मांच्या प्रतिकृतीला गळफास

बेळगाव : प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलेल्या भाजप नेत्या नुपूर शर्मा यांचा बेळगावात आक्रमक पद्धतीने निषेध करण्यात आला आहे. फाशी दिलेल्या अवस्थेतील नुपूर शर्मा यांची प्रतिकृती भर चौकात वीजवाहिनीला लटकावून त्यांचा निषेध करण्यात आला. भाजपच्या पूर्वाश्रमीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत एका टीव्ही शो दरम्यान अवमानकारक वक्तव्य …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्ट आवारातील खोकी हटवली

बेळगाव : बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोर्ट आवारातील बेकायदा खोकी, दुकाने महापालिका अधिकार्‍यांनी आज हटवली. बेळगावातील जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोर्ट आवारातील बेकायदा खोकी, दुकाने हटविण्याची मोहीम आज महापालिका अधिकार्‍यांनी राबवली. शुक्रवारी सकाळी-सकाळीच महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही मोहीम राबवून सुमारे 15 खोकी काढून टाकली. पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी …

Read More »

वृत्तपत्र कागदाचे दर कमी करण्याची मागणी

बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण संपन्न बेळगाव : वाढत्या महागाईची झळ अन्य क्षेत्राप्रमाणे वृत्तपत्र क्षेत्रालाही बसली आहे. छपाईचे दर वाढले आहेत. त्यातच आता वृत्तपत्राला लागणाऱ्या कागदाचे दरही भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे मध्यम व लहान वृत्तपत्रे चालविणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील गावागावापर्यंत हीच वृत्तपत्रे जाऊन पोहोचतात. यामुळे ही …

Read More »

एअरमन ट्रेनिंग स्कूलचे प्रमुख म्हणून एअर कमोडोर एस. श्रीधर यांची नियुक्ती

बेळगाव : सांबरा, बेळगाव येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलचे नूतन स्टेशन कमांडर म्हणून एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे आज गुरुवारी आयोजित कार्यक्रमात मावळते स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन अरुण मुत्तू यांनी आपल्याकडील अधिकार पदाची सूत्रे नूतन स्टेशन कमांडर एअर कमोडोर एस. …

Read More »

विद्यार्थिनीचं लग्न मोडण्यासाठी शिक्षकाने पाठवला अश्लील व्हिडिओ; शाळेत घुसून शिक्षकाची धुलाई

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थिनींवर होणार्‍या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बेळगाव जिल्ह्यातही अशीच एक धक्कादायक घटना घडलीय. विद्यार्थिनीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणार्‍या शिक्षकाला गावकर्‍यांनी चोप दिल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील यकुंडी गावात उघडकीस आलीय. यकुंडी गावातील हायस्कूलचा शिक्षक महेश शिवलिंगप्पा बिरादार याच्यावर आठवीपासून विद्यार्थिनीला विवाहाचे आमिष …

Read More »

बेळगावात एम्स रूग्णालय उभारण्याची आपची मागणी

बेळगाव : बेळगावमध्ये भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संस्थेचे (एम्स) रुग्णालयात उभारण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या बेळगाव शाखेने प्रशासनाकडे केली आहे. बेळगावमध्ये एम्सचे रुग्णालय झाले तर बेळगांव जिल्ह्यातील गरीब जनतेला अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळेल. बेळगाव हे महाराष्ट्र आणि गोवा राज्याला जोडणारा जिल्हा आहे. त्यामुळे शेजारील राज्यातील जनतेलाही अत्याधुनिक वैद्यकीय सोई …

Read More »

आरोग्याधिकारी मुन्याळ यांची तडकाफडकी बदली!

बेळगाव : बेळगाव जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांची सरकारने तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी डॉ. महेश कोणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांची सरकारने कोणतेही कारण न देता तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी डॉ. महेश कोणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. …

Read More »

धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असेल तर जेडीएसने आम्हाला पाठिंबा द्यावा : सिद्दरामय्या

बेंगळुरू : भाजपचा प्रभाव करायची इच्छा असेल तर, धर्मनिरपेक्ष तत्वांवर विश्वास असेल तर जेडीएसने राज्यसभा निवडणुकीत आमचे उमेदवार मन्सूर अलिखान यांना पाठिंबा द्यावा, असे माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी सांगितले. धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यायचे असेल तर कमी जागा असलेल्या काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा द्यावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ट्विट करून …

Read More »

सरकारकडून मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा घाट : ईश्वर खांड्रे

हुबळी : भाजप सरकार पाठ्यपुस्तकात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा इतिहास फिरवून मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे. याची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केपीसीसीचे कार्याध्यक्ष आ. ईश्वर खांड्रे यांनी केली. हुबळी शहरात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आ. ईश्वर खांड्रे म्हणाले, पाठ्यपुस्तकात सुधारणांच्या नावाखाली भाजप सरकारने धिंगाणा …

Read More »

पांढऱ्या जास्वंदीच्या झाडाला चक्क गुलाबी रंगाचे जास्वंदीचे फूल!

बेळगाव : निसर्गाचा चमत्कार आपल्याला नेहमी पाहायला आणि अनुभवायला मिळतो. निसर्गाचा चमत्कार थक्क करणारा असतो. आता हेच पहा ना पांढऱ्या जास्वंदीच्या फुलाच्या झाडाला चक्क गुलाबी रंगाचे जास्वंदीचे फूल उमलले आहे. कोठे घडला आहे हा निसर्गाचा चमत्कार असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर पुढे वाचा….. शहापूर आचार्य गल्लीमध्ये पांढऱ्या जास्वंदीच्या फुलाच्या …

Read More »