Monday , December 15 2025
Breaking News

LOCAL NEWS

आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा; आकाश हलगेकर यांचा स्तुत्य उपक्रम

बेळगाव : कंग्राळी गल्ली, बेळगाव येथील एक हरहुन्नरी समाजसेवक आकाश हलगेकर आणि मित्र परिवारातर्फे किल्ल्याजवळील झोपडपट्टी येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु त्यांच्या चार वर्षांनंतर देखील आपल्या देशातील गरीब आणि गरजूंना स्वातंत्र्य …

Read More »

सीमाप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी पाटील मळा कंग्राळी खुर्द येथून पंतप्रधानांना पत्रे

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी,भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता गेल्या ६५ वर्षांपासून लढा सुरु आहे. अनेकांनी हा प्रश्न सुटावा याकरिता आपले जीवन समर्पित केले, काहींनी तर आपले बलिदान गेले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सीमाप्रश्‍नी मा.पंतप्रधानांनी लक्ष घालून सीमाप्रश्न लवकरात लवकर …

Read More »

जिव्हाळा फाऊंडेशनच्यावतीने वृद्धाश्रमात स्वातंत्र्य दिन साजरा

बेळगाव : भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन जिव्हाळा फाऊंडेशनच्यावतीने संजीवनी फाऊंडेशन वृद्धाश्रमात एकत्रपणे साजरा करण्यात आला. डॉक्टर अनिल पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिव्हाळा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वातंत्र्य लढ्यात  योगदान दिलेल्या स्वातंत्र्य योध्यांबद्दल आदर व्यक्त करून त्यांना अभिवादन केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व …

Read More »

मंडपासाठी पोलीस खात्याकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाईल : मार्केट एसीपी सदाशिवराव कट्टीमनी

बेळगाव (वार्ता) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना श्रीमूर्ती प्रतिष्ठापन करण्यास मंदिर किंवा कार्यालय नाही, तशा गल्लीची पोलीस खात्याकडून प्रत्यक्ष पाहणी करून वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून दहा बाय दहा मंडप उभारण्यास परवानगी देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्‍वासन शुक्रवारी मार्केट पोलिस ठाण्यात झालेल्या लोकमान्य टिळक गणेश महामंडळ व सार्वजनिक …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद

बेळगाव (वार्ता) : सीमाप्रश्‍न सुटावा यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आलेली आहेत. मात्र अजूनही लढ्याला यश आलेले नाही. त्यामुळेसीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, यासाठी पाठविण्यात आलेल्या पत्रांची मोदी यांनी दखल घ्यावी आणि मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी महापौर सौ. रेणु किल्लेकर यांनी …

Read More »

सीमाप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी अष्टे येथून पंतप्रधानांना पत्रे

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद बेळगाव (वार्ता) : बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता गेल्या ६५ वर्षांपासून लढा सुरु आहे. अनेकांनी हा प्रश्न सुटावा याकरिता आपले जीवन समर्पित केले, काहींनी तर आपले बलिदान गेले. सामान्य मराठी माणसापासून ते विविध नेत्यांनी, पत्रकारांनी, कवी-लेखकांनी, कलाकारांनी आपआपल्या …

Read More »

राजहंस गडावर खडा पहारा…

बेळगाव : नरगुंदकर भावे चौकानंतर आता पुतळा उभारण्यासाठी शिव छत्रपतींचा राजहंस गड टार्गेट करण्यात आल्याची माहिती हाती मिळताच येळ्ळूर आणि परिसरात एकूण 100 हून अधिक कार्यकर्ते सध्या राजहंस गडावर खडा पहारा देत आहेत. जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्यासह एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, संतोष मंडलिक, दत्ता उघाडे, राजू पावले, सतीश …

Read More »

गणेशोत्सवावर निर्बंध तर, निवडणुका ही पुढे ढकला : म. ए. युवा समितीची मागणी

बेळगाव (वार्ता) : सार्वजनिक गणेशोत्सवावरील कडक निर्बंध हटवा नाहीतर निवडणूक सुद्धा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.बेळगावच्या वैभवशाली गणेशोत्सवावर मागील वर्षापासून कोरोना महामारीमुळे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत, यावर्षी सुद्धा कोरोनाचे कारण पुढे करत कडक निर्बंध घालत असतानाच महानगरपालिका निवडणुका जाहीर …

Read More »

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाची आकर्षक रांगोळी

बेळगाव : 75 वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवाचे औचित साधून  बेळगावचे रांगोळी आर्टिस्ट अजित महादेव औरवाडकर यांनी लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर व महात्मा गांधी यांचे चित्र रेखाटून बाजूला 75 पणती (दिव्यंची) आरास केली आहे.. सदर रांगोळी 3 फूट बाय 6 फूट आकाराची आहे. सदर रांगोळी रेखाटण्यासाठी 21 तासांचा कालावधी लागला …

Read More »

सलग दुसऱ्या वर्षी बेळगावचा श्री गणेश फेस्टिवल सोहळा रद्द

बेळगाव : श्रीमाता सोसायटीचे संस्थापक आणि चेअरमन श्री. मनोहर देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार चोवीस वर्षांपूर्वी बेळगावात श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याला सुरुवात करण्यात आली होती. बेळगावच्या गणेशोत्सवाला नवी विधायक दिशा देण्याचे काम बेळगाव गणेशोत्सव फेस्टिव्हलच्या माध्यमातून सातत्याने झाले आहे.बेळगाव गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून अनेक नामवंत कलाकारांबरोबरच अशा स्थानिक कलाकारांना कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे …

Read More »